1बंधूंनो, मला आता तुम्हाला काही इतर गोष्टीविषयी सांगायचे आहे; प्रभु येशूचे अनुयायी या नात्याने आम्ही तुम्हाला विनंति करतो व बोध करतो की, देवाला कसे संतोषवायचे याचे शिक्षण तुम्हांला आमच्याकडून जसे मिळाले, तसे तुम्ही खरोखरच जगत आहात, आणि तुम्ही ते जास्तीत जास्त करा.
1ܡܟܝܠ ܐܚܝ ܒܥܝܢܢ ܡܢܟܘܢ ܘܡܬܟܫܦܝܢܢ ܠܟܘܢ ܒܡܪܢ ܝܫܘܥ ܕܐܝܟ ܕܩܒܠܬܘܢ ܡܢܢ ܐܝܟܢ ܘܠܐ ܠܟܘܢ ܕܬܗܠܟܘܢ ܘܬܫܦܪܘܢ ܠܐܠܗܐ ܕܝܬܝܪܐܝܬ ܬܘܤܦܘܢ ܀
2कारण तुम्हांला हे माहीत आहे की, प्रभु येशूच्या अधिकाराने कोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांस दिल्या होत्या.
2ܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܓܝܪ ܐܝܠܝܢ ܦܘܩܕܢܐ ܝܗܒܢ ܠܟܘܢ ܒܡܪܢ ܝܫܘܥ ܀
3आणि हेच देवाला पाहिजे आहे. तुम्ही पवित्र असावे ही त्याची इच्छा आहे. तुम्ही जारकर्मपासून दूर असावे ही त्याची इच्छा आहे.
3ܗܢܘ ܓܝܪ ܨܒܝܢܗ ܕܐܠܗܐ ܩܕܝܫܘܬܟܘܢ ܘܕܬܗܘܘܢ ܦܪܝܩܝܢ ܡܢ ܟܠ ܙܢܝܘܬܐ ܀
4त्याची अशी इच्छा आहे की, तुम्हातील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळविण्यास शिकावे.
4ܘܢܗܘܐ ܝܕܥ ܐܢܫ ܐܢܫ ܡܢܟܘܢ ܠܡܩܢܐ ܡܐܢܗ ܒܩܕܝܫܘܬܐ ܘܒܐܝܩܪܐ ܀
5आणि ज्यांना देव माहीत नाही, ज्यांना देवाची ओळख नाही त्या विदेशी लोकांप्रमाणे कामवासनेने नव्हे.
5ܘܠܐ ܒܚܫܐ ܕܪܓܬܐ ܐܝܟ ܫܪܟܐ ܕܥܡܡܐ ܗܢܘܢ ܕܠܐ ܝܕܥܝܢ ܠܐܠܗܐ ܀
6त्याची हीसुद्धा इच्छा आहे की, तुम्ही प्रत्येकाने आपआपल्या बंधूचा याबाबतीत गैरफायदा घेऊ नये. कारण जसा आम्ही पूर्वी इशारा देऊन सांगितले होते की, प्रभु या सर्व गोष्टींचा सूड घेणारा आहे.
6ܘܠܐ ܬܗܘܘܢ ܡܫܝܚܝܢ ܠܡܥܒܪ ܘܠܡܥܠܒ ܐܢܫ ܠܐܚܘܗܝ ܒܗܕܐ ܨܒܘܬܐ ܡܛܠ ܕܡܪܢ ܗܘ ܬܒܘܥܐ ܥܠ ܗܠܝܢ ܟܠܗܝܢ ܐܝܟܢܐ ܕܐܦ ܡܢ ܩܕܡ ܙܒܢܐ ܐܡܪܢ ܠܟܘܢ ܘܤܗܕܢ ܀
7कारण देवाने आम्हाला अमंगळ जीवनासाठी नव्हे, तर शुद्ध जीवनासाठी बोलाविले होते.
7ܠܐ ܓܝܪ ܩܪܟܘܢ ܐܠܗܐ ܠܛܢܦܘܬܐ ܐܠܐ ܠܩܕܝܫܘܬܐ ܀
8म्हणून जो कोणी हे शिक्षण नाकारतो, तो मनुष्याला नव्हे तर पवित्र आत्मा देणाऱ्या देवाला नाकारतो.
8ܡܟܝܠ ܡܢ ܕܛܠܡ ܠܐ ܗܘܐ ܠܒܪܢܫܐ ܛܠܡ ܐܠܐ ܠܐܠܗܐ ܗܘ ܕܝܗܒ ܒܟܘܢ ܪܘܚܗ ܩܕܝܫܬܐ ܀
9आता ख्रिस्तातील तुमच्या भाऊ बहिणीच्या प्रीतीविषयी आम्ही तुम्हाला लिहिण्याची गरज आहे असे नाही. कारण एकमेकावर प्रीति करावी असे देवानेच तुम्हांला शिकविले आहे.
9ܥܠ ܚܘܒܐ ܕܝܢ ܕܐܚܐ ܠܐ ܤܢܝܩܝܬܘܢ ܠܡܟܬܒ ܠܟܘܢ ܐܢܬܘܢ ܓܝܪ ܩܢܘܡܟܘܢ ܡܠܦܐ ܐܢܬܘܢ ܕܐܠܗܐ ܕܬܚܒܘܢ ܚܕ ܠܚܕ ܀
10आणि हे खसे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
10ܐܦ ܥܒܕܝܢ ܐܢܬܘܢ ܗܟܢܐ ܠܟܠܗܘܢ ܐܚܐ ܕܒܟܠܗ ܡܩܕܘܢܝܐ ܒܥܐ ܐܢܐ ܕܝܢ ܡܢܟܘܢ ܐܚܝ ܕܬܬܝܬܪܘܢ ܀
11आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वत:च्या हातांनी काम करण्याची इच्छा करा.
11ܘܬܬܚܦܛܘܢ ܕܬܗܘܘܢ ܫܠܝܢ ܘܥܢܝܢ ܒܤܘܥܪܢܝܟܘܢ ܘܗܘܝܬܘܢ ܦܠܚܝܢ ܒܐܝܕܝܟܘܢ ܐܝܟܢܐ ܕܦܩܕܢܟܘܢ ܀
12यासाठी की बाहेरचे लोक तुम्ही ज्या प्रकारे जगता ते पाहून तुमचा आदर करतील आणि यासाठी की, तुमच्या गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागू नये.
12ܕܬܗܘܘܢ ܡܗܠܟܝܢ ܒܐܤܟܡܐ ܠܘܬ ܒܪܝܐ ܘܥܠ ܐܢܫ ܠܐ ܬܤܬܢܩܘܢ ܀
13बंधूंनो, तुम्हाला हे माहीत असावे अशी माझी इच्छा आहे, जे मेलेले आहेत, अशांसाठी इतरांसारखे दु:ख करु नये. कारण इतरांना आशा नाही.
13ܨܒܐ ܐܢܐ ܕܝܢ ܕܬܕܥܘܢ ܐܚܝ ܕܥܠ ܐܝܠܝܢ ܕܕܡܟܝܢ ܠܐ ܬܗܘܐ ܟܪܝܐ ܠܟܘܢ ܐܝܟ ܫܪܟܐ ܕܐܢܫܐ ܕܤܒܪܐ ܠܝܬ ܠܗܘܢ ܀
14कारण जर आम्ही विश्वास ठेवतो की येशू मेला होता आणि नंतर मरणातून पुन्हा जिवंत झाला, तसेच देवही येशूबरोबर, त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून मेलेले आहेत, त्यांना त्याप्रमाणे परत जिवंत करील.
14ܐܢ ܓܝܪ ܡܗܝܡܢܝܢܢ ܕܝܫܘܥ ܡܝܬ ܘܩܡ ܗܟܢܐ ܐܦ ܐܠܗܐ ܠܐܝܠܝܢ ܕܕܡܟܘ ܒܝܫܘܥ ܡܝܬܐ ܥܡܗ ܀
15आता आम्ही जे तुम्हांला सांगत आहोत तो एक संदेश आहे. जे आम्ही जिवंत आहोत, ते आम्ही प्रभूच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेपर्यंत तग धरु. जे मेलेले आहेत त्यांच्या अगोदर आम्ही निश्चितच जाणार नाही.
15ܗܕܐ ܕܝܢ ܐܡܪܝܢܢ ܠܟܘܢ ܒܡܠܬܗ ܕܡܪܢ ܕܚܢܢ ܐܝܠܝܢ ܕܡܫܬܚܪܝܢܢ ܒܡܐܬܝܬܗ ܕܡܪܢ ܕܚܝܝܢܢ ܠܐ ܢܕܪܟ ܠܐܝܠܝܢ ܕܕܡܟܘ ܀
16कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वत: स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील.
16ܡܛܠ ܕܗܘ ܡܪܢ ܒܦܘܩܕܢܐ ܘܒܩܠܐ ܕܪܝܫ ܡܠܐܟܐ ܘܒܩܪܢܐ ܕܐܠܗܐ ܢܚܬ ܡܢ ܫܡܝܐ ܘܡܝܬܐ ܕܒܡܫܝܚܐ ܢܩܘܡܘܢ ܠܘܩܕܡ ܀
17मग आपल्यापैकी जे जिवंत असतील ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर ढगात वर घेतले जातील. आणि अशा प्रकारे आम्ही प्रभूबरोबर सदासर्वकाळ राहू.
17ܘܗܝܕܝܢ ܚܢܢ ܐܝܠܝܢ ܕܡܫܬܚܪܝܢܢ ܕܚܝܝܢܢ ܢܬܚܛܦ ܥܡܗܘܢ ܐܟܚܕܐ ܒܥܢܢܐ ܠܐܘܪܥܗ ܕܡܪܢ ܒܐܐܪ ܘܗܟܢܐ ܒܟܠܙܒܢ ܥܡ ܡܪܢ ܢܗܘܐ ܀
18म्हणून या शब्दांनी एकमेकाचे समाधान करा.
18ܗܘܘ ܗܟܝܠ ܡܒܝܐܝܢ ܚܕ ܠܚܕ ܒܡܠܐ ܗܠܝܢ ܀