Marathi

Syriac: NT

Acts

7

1प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, “हे सर्व खरे आहे काय?”
1ܘܫܐܠܗ ܪܒ ܟܗܢܐ ܕܐܢ ܗܘ ܕܗܠܝܢ ܗܟܢܐ ܐܢܝܢ ܀
2स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते.
2ܗܘ ܕܝܢ ܐܡܪ ܓܒܪܐ ܐܚܝܢ ܘܐܒܗܬܢ ܫܡܥܘ ܐܠܗܐ ܕܬܫܒܘܚܬܐ ܐܬܚܙܝ ܠܐܒܘܢ ܐܒܪܗܡ ܟܕ ܐܝܬܘܗܝ ܗܘܐ ܒܝܬ ܢܗܪܝܢ ܥܕ ܠܐ ܢܐܬܐ ܢܥܡܪ ܒܚܪܢ ܀
3देव अब्राहामाला म्हणाला, ‘तुझा देश व तुझे नातेवाईक सोड. आणि मी दाखवीन त्या देशात जा!’
3ܘܐܡܪ ܗܘܐ ܠܗ ܕܦܘܩ ܡܢ ܐܪܥܟ ܘܡܢ ܠܘܬ ܒܢܝ ܛܘܗܡܟ ܘܬܐ ܠܐܪܥܐ ܐܝܕܐ ܕܐܚܘܝܟ ܀
4म्हणून अब्राहामाने आपले वतन खास्द्यांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला. अब्राहामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात.
4ܘܗܝܕܝܢ ܢܦܩ ܐܒܪܗܡ ܡܢ ܐܪܥܐ ܕܟܠܕܝܐ ܘܐܬܐ ܥܡܪ ܒܚܪܢ ܘܡܢ ܬܡܢ ܟܕ ܡܝܬ ܐܒܘܗܝ ܫܢܝܗ ܐܠܗܐ ܠܐܪܥܐ ܗܕܐ ܕܒܗ ܥܡܪܝܢ ܐܢܬܘܢ ܝܘܡܢܐ ܀
5परंतु देवाने अब्राहामाला या जमिनीतील काही दिले नाही. देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुध्दा जमीन त्याला दिली नाही. परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल. व त्याच्या मुलांनाही देईल. अब्राहामाला संतान होण्यापूर्वी हे घडले.
5ܘܠܐ ܝܗܒ ܠܗ ܝܪܬܘܬܐ ܒܗ ܐܦ ܠܐ ܕܘܪܟܬܐ ܕܪܓܠܐ ܘܐܫܬܘܕܝ ܗܘܐ ܕܢܬܠܝܗ ܠܗ ܐܝܟ ܕܠܡܐܪܬܗ ܠܗ ܘܠܙܪܥܗ ܟܕ ܠܝܬ ܗܘܐ ܠܗ ܒܪܐ ܀
6देव त्याला म्हणाला, ‘तुझी संतती उपरी होईल. ते दुसऱ्या देशात राहतील. तेथील लोक तुइयावंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना चारशे वर्षे वाईट रीतीने वागवतील.
6ܘܡܠܠ ܗܘܐ ܥܡܗ ܐܠܗܐ ܟܕ ܐܡܪ ܠܗ ܕܢܗܘܐ ܙܪܥܟ ܬܘܬܒܐ ܒܐܪܥܐ ܢܘܟܪܝܬܐ ܘܢܫܥܒܕܘܢܝܗܝ ܘܢܒܐܫܘܢ ܠܗ ܐܪܒܥܡܐܐ ܫܢܝܢ ܀
7परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन.’ देव असे सुद्धा म्हणाला, ‘त्या गोष्टी घडल्यानंतर, तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील.’
7ܘܠܥܡܐ ܕܢܦܠܚܘܢ ܥܒܕܘܬܐ ܐܕܘܢܝܘܗܝ ܐܢܐ ܐܡܪ ܐܠܗܐ ܘܡܢ ܒܬܪ ܗܠܝܢ ܢܦܩܘܢ ܘܢܦܠܚܘܢ ܠܝ ܒܐܬܪܐ ܗܢܐ ܀
8देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.
8ܘܝܗܒ ܠܗ ܕܝܬܩܐ ܕܓܙܘܪܬܐ ܘܗܝܕܝܢ ܐܘܠܕ ܠܐܝܤܚܩ ܘܓܙܪܗ ܒܝܘܡܐ ܬܡܝܢܝܐ ܘܐܝܤܚܩ ܐܘܠܕ ܠܝܥܩܘܒ ܘܝܥܩܘܒ ܐܘܠܕ ܠܬܪܥܤܪ ܐܒܗܬܢ ܀
9“या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता.
9ܘܗܢܘܢ ܐܒܗܬܢ ܛܢܘ ܒܝܘܤܦ ܘܙܒܢܘܗܝ ܠܡܨܪܝܢ ܘܐܠܗܐ ܥܡܗ ܗܘܐ ܀
10योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले.
10ܘܦܪܩܗ ܗܘܐ ܡܢ ܟܠܗܘܢ ܐܘܠܨܢܘܗܝ ܘܝܗܒ ܠܗ ܛܝܒܘܬܐ ܘܚܟܡܬܐ ܩܕܡ ܦܪܥܘܢ ܡܠܟܐ ܕܡܨܪܝܢ ܘܐܩܝܡܗ ܪܫܐ ܥܠ ܡܨܪܝܢ ܘܥܠ ܒܝܬܗ ܟܠܗ ܀
11मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.
11ܘܗܘܐ ܟܦܢܐ ܘܐܘܠܨܢܐ ܪܒܐ ܒܟܠܗ ܡܨܪܝܢ ܘܒܐܪܥܐ ܕܟܢܥܢ ܘܠܝܬ ܗܘܐ ܠܗܘܢ ܠܡܤܒܥ ܠܐܒܗܬܢ ܀
12जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती.
12ܘܟܕ ܫܡܥ ܝܥܩܘܒ ܕܐܝܬ ܥܒܘܪܐ ܒܡܨܪܝܢ ܫܕܪ ܗܘܐ ܠܐܒܗܬܢ ܠܘܩܕܡ ܀
13ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली.
13ܘܟܕ ܐܙܠܘ ܕܬܪܬܝܢ ܙܒܢܝܢ ܐܘܕܥ ܝܘܤܦ ܢܦܫܗ ܠܐܚܘܗܝ ܘܐܬܝܕܥ ܠܦܪܥܘܢ ܛܘܗܡܗ ܕܝܘܤܦ ܀
14मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे. बोलावण्यासाठी पाठविले.
14ܘܫܕܪ ܗܘܐ ܝܘܤܦ ܘܐܝܬܝܗ ܠܐܒܘܗܝ ܝܥܩܘܒ ܘܠܟܠܗ ܛܘܗܡܗ ܘܗܘܝܢ ܗܘܘ ܒܡܢܝܢܐ ܫܒܥܝܢ ܘܚܡܫ ܢܦܫܢ ܀
15मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले.
15ܘܢܚܬ ܝܥܩܘܒ ܠܡܨܪܝܢ ܘܡܝܬ ܬܡܢ ܗܘ ܘܐܒܗܬܢ ܀
16नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.
16ܘܐܫܬܢܝ ܠܫܟܝܡ ܘܐܬܬܤܝܡ ܒܩܒܪܐ ܕܙܒܢ ܗܘܐ ܐܒܪܗܡ ܒܟܤܦܐ ܡܢ ܒܢܝ ܚܡܘܪ ܀
17देवाने अब्राहामाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली.
17ܘܟܕ ܡܛܝ ܗܘܐ ܙܒܢܐ ܕܡܕܡ ܕܐܫܬܘܕܝ ܗܘܐ ܒܡܘܡܬܐ ܐܠܗܐ ܠܐܒܪܗܡ ܤܓܝ ܗܘܐ ܥܡܐ ܘܬܩܦ ܒܡܨܪܝܢ ܀
18शेवटी, ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा इजिप्तवर राज्य करु लागला.
18ܥܕܡܐ ܕܩܡ ܡܠܟܐ ܐܚܪܢܐ ܥܠ ܡܨܪܝܢ ܐܝܢܐ ܕܠܐ ܝܕܥ ܗܘܐ ܠܗ ܠܝܘܤܦ ܀
19त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.
19ܘܐܨܛܢܥ ܥܠ ܛܘܗܡܢ ܘܐܒܐܫ ܠܐܒܗܬܢ ܘܦܩܕ ܕܢܗܘܘܢ ܡܫܬܕܝܢ ܝܠܘܕܝܗܘܢ ܕܠܐ ܢܚܘܢ ܀
20त्या काळात मोशेचा जन्म झाला. आणि तो (देवाच्या नजरेत) फार सुंदर बालक होता. तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला.
20ܒܗ ܒܙܒܢܐ ܗܘ ܐܬܝܠܕ ܡܘܫܐ ܘܪܚܝܡ ܗܘܐ ܠܐܠܗܐ ܘܐܬܪܒܝ ܝܪܚܐ ܬܠܬܐ ܒܝܬ ܐܒܘܗܝ ܀
21आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारख वाढवल.
21ܘܟܕ ܐܫܬܕܝ ܡܢ ܐܡܗ ܐܫܟܚܬܗ ܒܪܬ ܦܪܥܘܢ ܘܪܒܝܬܗ ܠܗ ܠܒܪܐ ܀
22इजिप्तच्या लोकांनी त्याला सर्व प्रकारच्या ज्ञानात सुशिक्षित केले. तसेच तो बोलण्यात व कृतीत भारदस्त झाला.
22ܘܐܬܪܕܝ ܡܘܫܐ ܒܟܠܗ ܚܟܡܬܐ ܕܡܨܪܝܐ ܘܥܬܝܕ ܗܘܐ ܒܡܠܘܗܝ ܘܐܦ ܒܥܒܕܘܗܝ ܀
23“जेव्हा तो चाळीस वर्षांचा झाला, त्याने विचार केला की, आपले बांधव, जे यहूदी लोक त्यांना जाऊन भेटावे,
23ܘܟܕ ܗܘܐ ܒܪ ܐܪܒܥܝܢ ܫܢܝܢ ܤܠܩ ܗܘܐ ܥܠ ܠܒܗ ܕܢܤܥܘܪ ܠܐܚܘܗܝ ܒܢܝ ܐܝܤܪܝܠ ܀
24आणि जेव्हा त्याने आपल्या इस्राएली बांधवांपैकी एकाला वाईट वागविले जाताना पाहिले, तेव्हा त्याने त्या इजिप्तच्या रहिवाश्याला मारले, व आपल्या बांधवाची सुटका केली; छळ केला जाणाऱ्या यहूदी मनुष्याच्या वतीने त्याने बदला घेतला.
24ܘܚܙܐ ܠܚܕ ܡܢ ܒܢܝ ܫܪܒܬܗ ܕܡܬܕܒܪ ܒܩܛܝܪܐ ܘܬܒܥܗ ܘܥܒܕ ܠܗ ܕܝܢܐ ܘܩܛܠܗ ܠܡܨܪܝܐ ܗܘ ܕܡܤܟܠ ܗܘܐ ܒܗ ܀
25देव त्याच्या हातून यहूदी लोकांची सुटका करीत आहे, हे यहूदी लोकांना कळेल असे मोशेला वाटले, परंतु त्यांना ते कळले नाही.
25ܘܤܒܪ ܕܡܤܬܟܠܝܢ ܐܚܘܗܝ ܒܢܝ ܐܝܤܪܝܠ ܕܐܠܗܐ ܒܐܝܕܗ ܝܗܒ ܠܗܘܢ ܦܘܪܩܢܐ ܘܠܐ ܐܤܬܟܠܘ ܀
26दुसऱ्या दिवशी दोन यहूदी माणसे भांडण करताना मोशेने पाहिली, ते पाहून मोशे त्यांच्यात मध्यस्थी करु लागला. तो त्यांना म्हणाला, ‘पुरुषांनो, तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात, तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात?’
26ܘܠܝܘܡܐ ܐܚܪܢܐ ܐܬܚܙܝ ܠܗܘܢ ܟܕ ܢܨܝܢ ܗܢܘܢ ܚܕ ܥܡ ܚܕ ܘܡܦܝܤ ܗܘܐ ܠܗܘܢ ܕܢܫܬܝܢܘܢ ܟܕ ܐܡܪ ܓܒܪܐ ܐܚܐ ܐܢܬܘܢ ܡܛܠ ܡܢܐ ܡܤܟܠܝܢ ܐܢܬܘܢ ܚܕ ܒܚܕ ܀
27परंतु जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याशी वाईट रीतीने वागत होता, त्याने मोशेला एका बाजूला सारुन म्हटले, ‘आमच्यावर अधिकार गाजवायला आणि आमचा न्यायनिवाडा करायला तुला कोणी नेमिले?
27ܗܘ ܕܝܢ ܕܡܤܟܠ ܗܘܐ ܒܚܒܪܗ ܕܚܩܗ ܡܢ ܠܘܬܗ ܘܐܡܪ ܠܗ ܡܢܘ ܐܩܝܡܟ ܥܠܝܢ ܪܫܐ ܘܕܝܢܐ ܀
28काल तू त्या इजिप्तच्या माणसाला ठार मारलेस; तसाच माझाही जीव घेण्याचे तुइया मनात आहे का?’
28ܕܠܡܐ ܠܡܩܛܠܢܝ ܒܥܐ ܐܢܬ ܐܝܟ ܕܩܛܠܬ ܐܬܡܠܝ ܠܡܨܪܝܐ ܀
29‘जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला. आणि मिद्यान्यांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले,
29ܘܥܪܩ ܡܘܫܐ ܒܡܠܬܐ ܗܕܐ ܘܗܘܐ ܬܘܬܒܐ ܒܐܪܥܐ ܕܡܕܝܢ ܘܗܘܘ ܠܗ ܬܪܝܢ ܒܢܝܢ ܀
30चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले.
30ܘܟܕ ܡܠܝ ܠܗ ܬܡܢ ܐܪܒܥܝܢ ܫܢܝܢ ܐܬܚܙܝ ܠܗ ܒܡܕܒܪܐ ܕܛܘܪ ܤܝܢܝ ܡܠܐܟܗ ܕܡܪܝܐ ܒܢܘܪܐ ܕܝܩܕܐ ܒܤܢܝܐ ܀
31जेव्हा मोशेने हे पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. नीट पाहता यावे म्हणून तो त्या जळत्या झुडपाजवळ गेला. मोशेने एक वाणी ऐकली, तो आवाज प्रभूचा होता.
31ܘܟܕ ܚܙܐ ܡܘܫܐ ܐܬܕܡܪ ܒܚܙܘܐ ܘܟܕ ܐܬܩܪܒ ܕܢܚܙܐ ܐܡܪ ܠܗ ܡܪܝܐ ܒܩܠܐ ܀
32प्रभु म्हणाला, ‘मी तुझ्या वाडवडिलांचा देव आहे - अब्राहाम, इसहाक, याकोब यांचा देव आहे.’ मोशे भीतीने थरथर कापू लागला. डोळे वर करुन पाहण्याचे धाडस त्याला होईना.
32ܐܢܐ ܐܢܐ ܐܠܗܐ ܕܐܒܗܝܟ ܐܠܗܗ ܕܐܒܪܗܡ ܘܕܐܝܤܚܩ ܘܕܝܥܩܘܒ ܘܟܕ ܪܬܝܬ ܗܘܐ ܡܘܫܐ ܠܐ ܡܡܪܚ ܗܘܐ ܕܢܚܘܪ ܒܚܙܘܐ ܀
33देव त्याला म्हणाला, ‘तुझ्या पायातील वहाणा काढ! कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे.
33ܘܐܡܪ ܠܗ ܡܪܝܐ ܫܪܝ ܡܤܢܝܟ ܡܢ ܪܓܠܝܟ ܐܪܥܐ ܓܝܪ ܕܩܐܡ ܐܢܬ ܒܗ ܩܕܝܫܐ ܗܝ ܀
34माझ्या लोकांचा इजिप्त देशात होणारा छळ मी पाहिला आहे. आणि त्यांचे विव्हळ्णे माझ्या कानी आले आहे. म्हणून त्यांची सुटका करण्यास मी खाली आलो आहे. आता ये, मी तुला परत इजिप्त देशाला पाठवीत आहे.’
34ܡܚܙܐ ܚܙܝܬ ܐܘܠܨܢܗ ܕܥܡܝ ܕܒܡܨܪܝܢ ܘܬܢܚܬܗ ܫܡܥܬ ܘܢܚܬܬ ܕܐܦܪܘܩ ܐܢܘܢ ܘܗܫܐ ܬܐ ܐܫܕܪܟ ܠܡܨܪܝܢ ܀
35“मोशे हाच तो मनुष्य होता, ज्याला यहूदी लोकांनी नाकारले. ‘तुला कोणी आमच्यावर अधिकार गाजवायला आणि न्याय करायला निवडले आहे काय?’ असे ते त्याला म्हणाले. मोशे हाच मनुष्य आहे की ज्याला देवाने शासनकर्ता व तारणारा म्हणून पाठविले. देवाने मोशेला देवदूताच्या मदतीने पाठविले. याच देवदूताला मोशेने जळत्या झुडपात पाहिले होते.
35ܠܗܢܐ ܡܘܫܐ ܕܟܦܪܘ ܒܗ ܟܕ ܐܡܪܝܢ ܕܡܢܘ ܐܩܝܡܟ ܥܠܝܢ ܪܫܐ ܘܕܝܢܐ ܠܗ ܠܗܢܐ ܐܠܗܐ ܪܫܐ ܘܦܪܘܩܐ ܫܕܪ ܠܗܘܢ ܒܐܝܕܝ ܡܠܐܟܐ ܗܘ ܕܐܬܚܙܝ ܠܗ ܒܤܢܝܐ ܀
36म्हणून मोशेने लोकांना बाहेर काढले. त्याने सामर्थ्यशाली कृत्ये व चमत्कार केले. मोशेने ह्या गोष्टी इजिप्तमध्ये, तांबड्या समुद्राजवळ, आणि वाळवंटात चाळीस वर्षे केल्या.
36ܗܢܘ ܕܐܦܩ ܐܢܘܢ ܟܕ ܥܒܕ ܐܬܘܬܐ ܘܬܕܡܪܬܐ ܘܓܒܪܘܬܐ ܒܐܪܥܐ ܕܡܨܪܝܢ ܘܒܝܡܐ ܕܤܘܦ ܘܒܡܕܒܪܐ ܫܢܝܢ ܐܪܒܥܝܢ ܀
37हा तोच मोशे आहे, ज्याने यहूदी लोकांना असे म्हटले: ‘देव तुम्हाला एक भविष्यवादी देईल. तो भविष्यवादी तुमच्याच लोकांमधून येईल. तो माइयासारखाच भविष्यवादी असेल’
37ܗܢܘ ܡܘܫܐ ܗܘ ܕܐܡܪ ܠܒܢܝ ܐܝܤܪܝܠ ܕܢܒܝܐ ܢܩܝܡ ܠܟܘܢ ܡܪܝܐ ܐܠܗܐ ܡܢ ܐܚܝܟܘܢ ܐܟܘܬܝ ܠܗ ܬܫܡܥܘܢ ܀
38जो अरण्यात यहूद्दांबरोबर होता, सीनाय पर्वतावर आपणाबरोबर बोलणाऱ्या देवदूताबरोबर व आपल्या वाडवडीलांबरोबर होता ज्याला आम्हास देण्यासठी जीवनदायी वचने मिळाली होती, तोच हा मोशे होय,
38ܗܢܘ ܕܗܘܐ ܒܟܢܘܫܬܐ ܒܡܕܒܪܐ ܥܡ ܡܠܐܟܐ ܗܘ ܕܡܠܠ ܗܘܐ ܥܡܗ ܘܥܡ ܐܒܗܬܢ ܒܛܘܪܐ ܕܤܝܢܝ ܘܗܘܝܘ ܕܩܒܠ ܡܠܐ ܚܝܬܐ ܕܠܢ ܢܬܠ ܀
39“परंतु आपले वाडवडील त्याचे ऐकायला तयार नव्हते. त्यांनी त्याचे ऐकले नाही. आणि त्यांनी त्याला नाकारले. त्यांची मने इजिप्त देशाकडे परत ओढ घेऊ लागली.
39ܘܠܐ ܨܒܘ ܠܡܬܕܢܝܘ ܠܗ ܐܒܗܬܢ ܐܠܐ ܫܒܩܘܗܝ ܘܒܠܒܘܬܗܘܢ ܗܦܟܘ ܠܗܘܢ ܠܡܨܪܝܢ ܀
40आपले वाडवडील अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर. कारण इजिप्त देशातून काढून आम्हांला बाहेर घेऊन येणारा हा मोशे, त्याचे काय झाले हे आम्हांला माहीत नाही’.
40ܟܕ ܐܡܪܝܢ ܠܐܗܪܘܢ ܥܒܕ ܠܢ ܐܠܗܐ ܕܢܐܙܠܘܢ ܩܕܡܝܢ ܡܛܠ ܕܗܢܐ ܡܘܫܐ ܕܐܦܩܢ ܡܢ ܐܪܥܐ ܕܡܨܪܝܢ ܠܐ ܝܕܥܝܢ ܚܢܢ ܡܢܐ ܗܘܝܗܝ ܀
41त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हातांनी घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला!
41ܘܥܒܕܘ ܠܗܘܢ ܥܓܠܐ ܒܝܘܡܬܐ ܗܢܘܢ ܘܕܒܚܘ ܕܒܚܐ ܠܦܬܟܪܐ ܘܡܬܒܤܡܝܢ ܗܘܘ ܒܥܒܕ ܐܝܕܝܗܘܢ ܀
42पण देवाने त्या लोकांकडे पाठ फिरविली आणि आकाशातील समूहांची (तारे, नक्षत्र, अशा खोट्या देवांची) भक्ति करीत राहण्यासाठी मोकळे सोडले. कारण भविष्याद्यांच्या पुस्तकात असे लिहिले आहे:देव म्हणतो, ‘अहो यहूदी लोकांनो, तुम्ही वधलेल्या पशूंची अर्पणे मला आणली नाहीत, रानातील चाळीस वर्षांत.
42ܘܗܦܟ ܐܠܗܐ ܘܐܫܠܡ ܐܢܘܢ ܕܢܗܘܘܢ ܦܠܚܝܢ ܠܚܝܠܘܬܐ ܕܫܡܝܐ ܐܝܟ ܕܟܬܝܒ ܒܟܬܒܐ ܕܢܒܝܐ ܠܡܐ ܐܪܒܥܝܢ ܫܢܝܢ ܒܡܕܒܪܐ ܢܟܤܬܐ ܐܘ ܕܒܚܬܐ ܩܪܒܬܘܢ ܠܝ ܒܢܝ ܐܝܤܪܝܠ ܀
43तुम्ही तुमच्याबरोबर मोलेखासाठी तंबू (उपासनेचे स्थळ) आणि तुमचा देव रेफान यासाठी तान्यांच्या मूर्ती नेल्यात या मूर्ती तुम्ही केल्या यासाठी की तुम्हांला उपासना करता यावी म्हणून मी तुम्हांला दूर बाबेलोनपलीकडे पाठवीन’ आमोस 5:24-27
43ܐܠܐ ܫܩܠܬܘܢ ܡܫܟܢܗ ܕܡܠܟܘܡ ܘܟܘܟܒܗ ܕܐܠܗܐ ܕܪܦܢ ܕܡܘܬܐ ܕܥܒܕܬܘܢ ܕܬܗܘܘܢ ܤܓܕܝܢ ܠܗܝܢ ܐܫܢܝܟܘܢ ܠܗܠ ܡܢ ܒܒܠ ܀
44“अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला.
44ܗܐ ܡܫܟܢܐ ܕܤܗܕܘܬܐ ܕܐܒܗܬܢ ܒܡܕܒܪܐ ܐܝܬܘܗܝ ܗܘܐ ܐܝܟ ܡܐ ܕܦܩܕ ܗܘ ܕܡܠܠ ܥܡ ܡܘܫܐ ܠܡܥܒܕܗ ܒܕܡܘܬܐ ܕܚܘܝܗ ܀
45नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करुन इतर देशांच्या जमिनी काबिज केल्या. ती राष्टे परमेश्वरानेे आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दावीदाच्या काळापर्यंत तो ठेवला.
45ܘܠܗ ܠܗܢܐ ܡܫܟܢܐ ܐܦ ܡܥܠܘ ܐܥܠܘܗܝ ܐܒܗܬܢ ܥܡ ܝܫܘܥ ܠܐܪܥܐ ܕܝܗܒ ܠܗܘܢ ܐܠܗܐ ܝܘܪܬܢܐ ܡܢ ܥܡܡܐ ܗܢܘܢ ܕܫܕܐ ܡܢ ܩܕܡܝܗܘܢ ܘܐܬܝܒܠ ܥܕܡܐ ܠܝܘܡܘܗܝ ܕܕܘܝܕ ܀
46दावीद देवाच्या मर्जीचा असल्याने, याकोबाच्या देवासाठी मंदीर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली.
46ܗܘ ܕܐܫܟܚ ܪܚܡܐ ܩܕܡܘܗܝ ܕܐܠܗܐ ܘܫܐܠ ܕܢܫܟܚ ܡܫܟܢܐ ܠܐܠܗܗ ܕܝܥܩܘܒ ܀
47परंतु देवाचे मंदिर शलमोनाने बांधले.
47ܫܠܝܡܘܢ ܕܝܢ ܒܢܐ ܠܗ ܒܝܬܐ ܀
48“कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितात:
48ܘܡܪܝܡܐ ܠܐ ܫܪܐ ܒܥܒܕ ܐܝܕܝܐ ܐܝܟ ܕܐܡܪ ܢܒܝܐ ܀
49‘प्रभु म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे. पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. तुम्ही माइयासाठी कसले घर बांधू शकता? मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही.
49ܕܫܡܝܐ ܟܘܪܤܝ ܘܐܪܥܐ ܟܘܒܫܐ ܕܬܚܝܬ ܪܓܠܝ ܐܝܢܘ ܒܝܬܐ ܕܬܒܢܘܢ ܠܝ ܐܡܪ ܡܪܝܐ ܐܘ ܐܝܢܘ ܐܬܪܐ ܕܢܝܚܬܝ ܀
50माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’ यशया 66:1-2
50ܠܐ ܗܐ ܐܝܕܐ ܕܝܠܝ ܥܒܕܬ ܗܠܝܢ ܟܠܗܝܢ ܀
51“तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात.
51ܐܘ ܩܫܝܝ ܩܕܠܐ ܘܕܠܐ ܓܙܝܪܝܢ ܒܠܒܗܘܢ ܘܒܡܫܡܥܬܗܘܢ ܐܢܬܘܢ ܒܟܠܙܒܢ ܠܘܩܒܠ ܪܘܚܐ ܕܩܘܕܫܐ ܩܝܡܝܢ ܐܢܬܘܢ ܐܝܟ ܐܒܗܝܟܘܢ ܐܦ ܐܢܬܘܢ ܀
52तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (रिव्रस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (रिव्रस्ताचा) विश्वासघात व खून केलात.
52ܠܐܝܢܐ ܓܝܪ ܡܢ ܢܒܝܐ ܕܠܐ ܪܕܦܘ ܘܩܛܠܘ ܐܒܗܝܟܘܢ ܠܐܝܠܝܢ ܕܩܕܡܘ ܒܕܩܘ ܥܠ ܡܐܬܝܬܗ ܕܙܕܝܩܐ ܗܘ ܕܐܢܬܘܢ ܐܫܠܡܬܘܢ ܘܩܛܠܬܘܢܝܗܝ ܀
53तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”
53ܘܩܒܠܬܘܢ ܢܡܘܤܐ ܒܝܕ ܦܘܩܕܢܐ ܕܡܠܐܟܐ ܘܠܐ ܢܛܪܬܘܢܝܗܝ ܀
54यहूदी लोकांनी स्तेफनाला हे बोलताला ऐकले व त्यांना फार राग आला, ते त्याच्याविरुद्ध दातओठ खाऊ लागले.
54ܘܟܕ ܫܡܥܘ ܗܘܘ ܗܠܝܢ ܐܬܡܠܝܘ ܚܡܬܐ ܒܢܦܫܗܘܢ ܘܡܚܪܩܝܢ ܗܘܘ ܫܢܝܗܘܢ ܥܠܘܗܝ ܀
55परंतु स्तेफन पवित्र आत्म्याने भरलेला होता. त्याने आपली नजर वर स्वर्गाकडे लावली. देवाचा गौरव त्याने पाहिला. त्याने येशूला देवाच्या उजवीकडे उभे असलेले पाहिले.
55ܘܗܘ ܟܕ ܡܠܐ ܗܘܐ ܗܝܡܢܘܬܐ ܘܪܘܚܐ ܕܩܘܕܫܐ ܚܪ ܒܫܡܝܐ ܘܚܙܐ ܬܫܒܘܚܬܐ ܕܐܠܗܐ ܘܠܝܫܘܥ ܟܕ ܩܐܡ ܡܢ ܝܡܝܢܐ ܕܐܠܗܐ ܀
56तो म्हणाला, “पहा! स्वर्ग उघडलेला मला दिसत आहे. व मी मनुष्याच्या पुत्राला देवाच्या उजवीकडे उभा असलेला पाहत आह!”
56ܘܐܡܪ ܗܐ ܚܙܐ ܐܢܐ ܫܡܝܐ ܟܕ ܦܬܝܚܝܢ ܘܠܒܪܗ ܕܐܢܫܐ ܟܕ ܩܐܡ ܡܢ ܝܡܝܢܐ ܕܐܠܗܐ ܀
57स्तेफनाचे हे शब्द ऐकून यहूदी मोठ्याने ओरडले. त्यांनी आपले कान स्वत;च्या हातांनी झाकून घेतले. नंतर ते सर्व मिळून स्तेफनावर धावून गेले.
57ܘܩܥܘ ܒܩܠܐ ܪܡܐ ܘܤܟܪܘ ܐܕܢܝܗܘܢ ܘܓܙܡܘ ܥܠܘܗܝ ܟܠܗܘܢ ܀
58त्यानी स्तेफनाला धरुन ओढीत शहराच्या बाहेर नेले व त्याला दगडमार करु लागले. जे साक्षी होते, त्यांनी आपले कपडे शौल नावाच्या एका तरुण मनुष्यापाशी ठेवले होते.
58ܘܐܚܕܘ ܐܦܩܘܗܝ ܠܒܪ ܡܢ ܡܕܝܢܬܐ ܘܪܓܡܝܢ ܗܘܘ ܠܗ ܘܐܝܠܝܢ ܕܐܤܗܕܘ ܥܠܘܗܝ ܤܡܘ ܢܚܬܝܗܘܢ ܠܘܬ ܪܓܠܘܗܝ ܕܥܠܝܡܐ ܚܕ ܕܡܬܩܪܐ ܫܐܘܠ ܀
59ते स्तेफनावर दगडमार करीत असताना तो मोठ्याने प्रार्थना करीत म्हणाला, “हे प्रभु येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर!”
59ܘܪܓܡܝܢ ܗܘܘ ܠܗ ܠܐܤܛܦܢܘܤ ܟܕ ܡܨܠܐ ܘܐܡܪ ܡܪܢ ܝܫܘܥ ܩܒܠ ܪܘܚܝ ܀
60नंतर स्तेफनाने आपले गुडघे टेकले व मोठ्याने ओरडून म्हणाला, “प्रभु, यांचे हे करणे त्यांच्या माथी पाप असे मानू नको!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
60ܘܟܕ ܤܡ ܒܘܪܟܐ ܩܥܐ ܒܩܠܐ ܪܡܐ ܘܐܡܪ ܡܪܢ ܠܐ ܬܩܝܡ ܠܗܘܢ ܗܕܐ ܚܛܝܬܐ ܘܟܕ ܗܕܐ ܐܡܪ ܫܟܒ ܀