1कारण माझी अशी इच्छा आहे की, तुमच्यावतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावातिकीयात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिश: भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हांला माहीत व्हावा.
1ܨܒܐ ܐܢܐ ܕܝܢ ܕܬܕܥܘܢ ܐܝܢܐ ܐܓܘܢܐ ܐܝܬ ܠܝ ܚܠܦܝܟܘܢ ܘܚܠܦ ܗܢܘܢ ܕܒܠܕܝܩܝܐ ܘܚܠܦ ܫܪܟܐ ܐܝܠܝܢ ܕܦܪܨܘܦܝ ܠܐ ܚܙܘ ܒܒܤܪ ܀
2यासाठी की, त्यांच्या मनाला समाधान वाटावे. आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत, आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समजबुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे.
2ܕܢܬܒܝܐܘܢ ܠܒܘܬܗܘܢ ܘܢܬܩܪܒܘܢ ܒܚܘܒܐ ܠܟܠܗ ܥܘܬܪܐ ܕܦܝܤܐ ܘܠܤܘܟܠܐ ܕܝܕܥܬܗ ܕܐܪܙܐ ܕܐܠܗܐ ܐܒܐ ܘܕܡܫܝܚܐ ܀
3ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे.
3ܗܘ ܕܒܗ ܟܤܝܢ ܟܠܗܝܢ ܤܝܡܬܐ ܕܚܟܡܬܐ ܘܕܝܕܥܬܐ ܀
4मी हे म्हणत आहे ते यासाठी की, तुम्हांला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसवू नये.
4ܗܕܐ ܕܝܢ ܐܡܪ ܐܢܐ ܕܠܐ ܐܢܫ ܢܗܘܐ ܡܛܥܐ ܠܟܘܢ ܒܦܝܤܐ ܕܡܠܐ ܀
5कारण मी जरी शरीराने तुम्हांपासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदीत आहे.
5ܐܦܢ ܒܒܤܪ ܓܝܪ ܦܪܝܩ ܐܢܐ ܡܢܟܘܢ ܐܠܐ ܒܪܘܚ ܥܡܟܘܢ ܐܢܐ ܘܚܕܐ ܐܢܐ ܕܚܙܐ ܐܢܐ ܡܛܟܤܘܬܟܘܢ ܘܫܪܝܪܘܬܐ ܕܗܝܡܢܘܬܟܘܢ ܕܒܡܫܝܚܐ ܀
6म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला.
6ܐܝܟܢܐ ܗܟܝܠ ܕܩܒܠܬܘܢ ܠܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܡܪܢ ܒܗ ܗܠܟܘ ܀
7त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुति करीत ओसंडून जा.
7ܟܕ ܡܫܪܪܝܢ ܥܩܪܝܟܘܢ ܘܡܬܒܢܝܢ ܐܢܬܘܢ ܒܗ ܘܡܬܩܝܡܝܢ ܐܢܬܘܢ ܒܗܝܡܢܘܬܐ ܗܝ ܕܝܠܦܬܘܢ ܕܒܗ ܬܬܝܬܪܘܢ ܒܬܘܕܝܬܐ ܀
8मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्त्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हांला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा.
8ܐܙܕܗܪܘ ܕܠܡܐ ܐܢܫ ܢܚܠܨܟܘܢ ܒܦܝܠܤܦܘܬܐ ܘܒܛܥܝܘܬܐ ܤܪܝܩܬܐ ܐܝܟ ܝܘܠܦܢܐ ܕܒܢܝܢܫܐ ܘܐܝܟ ܐܤܛܘܟܤܘܗܝ ܕܥܠܡܐ ܘܠܐ ܐܝܟ ܡܫܝܚܐ ܀
9कारण देवाचे पूर्णत्व त्याच्यात शरीरात राहते.
9ܕܒܗ ܥܡܪ ܟܠܗ ܡܘܠܝܐ ܕܐܠܗܘܬܐ ܓܘܫܡܢܐܝܬ ܀
10आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात.
10ܘܒܗ ܐܦ ܐܢܬܘܢ ܡܫܬܡܠܝܬܘܢ ܕܗܘ ܐܝܬܘܗܝ ܪܫܐ ܕܟܠܗܝܢ ܐܪܟܘܤ ܘܫܘܠܛܢܐ ܀
11मानवी हातांनी न केलेल्या सुंतेने तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुंता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुंतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता,
11ܘܒܗ ܐܬܓܙܪܬܘܢ ܓܙܘܪܬܐ ܕܠܐ ܒܐܝܕܝܢ ܒܫܠܚ ܒܤܪܐ ܕܚܛܗܐ ܒܓܙܘܪܬܗ ܕܡܫܝܚܐ ܀
12हे असेच घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये देवाच्या कृतीमध्ये तुमच्या विश्वासाद्वारे उठविले गेला, ज्याने (देवाने) ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले.
12ܘܐܬܩܒܪܬܘܢ ܥܡܗ ܒܡܥܡܘܕܝܬܐ ܘܒܗ ܩܡܬܘܢ ܥܡܗ ܕܗܝܡܢܬܘܢ ܒܚܝܠܐ ܕܐܠܗܐ ܕܐܩܝܡܗ ܡܢ ܒܝܬ ܡܝܬܐ ܀
13तुमच्या पापांमुळे आणि तुमची सुंता न झाल्याने तुम्ही आध्यात्मिकरीत्या मृत झाला होता, परंतु देवाने ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जीवान दिले आणि त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केली.
13ܘܠܟܘܢ ܕܡܝܬܝܢ ܗܘܝܬܘܢ ܒܚܛܗܝܟܘܢ ܘܒܥܘܪܠܘܬ ܒܤܪܟܘܢ ܐܚܝܟܘܢ ܥܡܗ ܘܫܒܩ ܠܢ ܟܠܗܘܢ ܚܛܗܝܢ ܀
14त्याने आमच्याविरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हांला विरोध होता, तो त्याने आमच्यातून काढून घेतला, आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला.
14ܘܥܛܐ ܒܦܘܩܕܢܘܗܝ ܫܛܪ ܚܘܒܝܢ ܗܘ ܕܐܝܬܘܗܝ ܗܘܐ ܤܩܘܒܠܢ ܘܫܩܠܗ ܡܢ ܡܨܥܬܐ ܘܩܒܥܗ ܒܙܩܝܦܗ ܀
15त्याने स्वत: वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हाणून पाडून त्यांवर विजय मिळविला आहे.
15ܘܒܫܠܚ ܦܓܪܗ ܦܪܤܝ ܠܐܪܟܘܤ ܘܠܫܠܝܛܢܐ ܘܐܒܗܬ ܐܢܘܢ ܓܠܝܐܝܬ ܒܩܢܘܡܗ ܀
16म्हणून कोणीहा तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी, नवचंद्रोउत्सवाविषयी किंवा शब्बाथ दिवसांविषयी टीका करु नये.
16ܠܐ ܗܟܝܠ ܐܢܫ ܢܕܘܕܟܘܢ ܒܡܐܟܠܐ ܘܒܡܫܬܝܐ ܐܘ ܒܦܘܠܓܐ ܕܥܐܕܐ ܘܕܪܝܫ ܝܪܚܐ ܘܕܫܒܐ ܀
17कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे.
17ܗܠܝܢ ܕܐܝܬܝܗܝܢ ܛܠܢܝܬܐ ܕܐܝܠܝܢ ܕܥܬܝܕܢ ܦܓܪܐ ܕܝܢ ܡܫܝܚܐ ܗܘ ܀
18कोणीही जो स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंत:करणामुळे गर्वाने फुगलेला असतो.
18ܘܠܡܐ ܐܢܫ ܢܨܒܐ ܒܡܟܝܟܘܬ ܪܥܝܢܐ ܠܡܚܝܒܘܬܟܘܢ ܕܬܫܬܥܒܕܘܢ ܠܦܘܠܚܢܐ ܕܡܠܐܟܐ ܒܕܤܥܐ ܥܠ ܡܕܡ ܕܠܐ ܚܙܐ ܘܤܪܝܩܐܝܬ ܡܬܚܬܪ ܒܪܥܝܢܐ ܕܒܤܪܗ ܀
19आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही. संपर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू, स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते त्याबद्दल त्याला धन्यवाद असो.
19ܘܠܐ ܐܚܕ ܪܫܐ ܕܡܢܗ ܟܠܗ ܦܓܪܐ ܡܬܪܟܒ ܘܡܬܩܝܡ ܒܫܪܝܢܐ ܘܒܗܕܡܐ ܘܪܒܐ ܬܪܒܝܬܐ ܕܐܠܗܐ ܀
20जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमांच्या अधीन राहाता.
20ܐܢ ܓܝܪ ܡܝܬܬܘܢ ܥܡ ܡܫܝܚܐ ܡܢ ܐܤܛܘܟܤܘܗܝ ܕܥܠܡܐ ܠܡܢܐ ܐܝܟ ܗܘ ܕܚܝܝܢ ܐܢܬܘܢ ܒܥܠܡܐ ܡܬܕܝܢܝܢ ܐܢܬܘܢ ܀
21“याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!”
21ܠܐ ܠܡ ܬܩܪܘܒ ܘܠܐ ܬܛܥܡ ܘܠܐ ܬܩܦ ܀
22या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना, तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता.
22ܕܐܝܬܝܗܝܢ ܗܠܝܢ ܚܫܚܬܐ ܕܡܬܚܒܠܐ ܘܦܘܩܕܐ ܐܢܝܢ ܘܝܘܠܦܢܐ ܕܒܢܝܢܫܐ ܀
23खरोखर, मनुष्यांनो केलेला धर्म, स्वत:चा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ, या विषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ति आहे, परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किंमतीचे नाहीत.
23ܘܡܬܚܙܝܢ ܕܐܝܬ ܒܗܝܢ ܡܠܬܐ ܕܚܟܡܬܐ ܒܦܪܨܘܦ ܡܟܝܟܘܬܐ ܘܕܚܠܬ ܐܠܗܐ ܘܕܠܐ ܚܝܤܝܢ ܥܠ ܦܓܪܐ ܠܘ ܒܡܕܡ ܕܡܝܩܪ ܐܠܐ ܒܐܝܠܝܢ ܕܚܫܚܬܐ ܐܢܝܢ ܕܒܤܪܐ ܀