1श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
1ܐܘ ܥܬܝܪܐ ܐܝܠܠܘ ܘܒܟܘ ܥܠ ܕܘܘܢܐ ܕܐܬܝܢ ܥܠܝܟܘܢ ܀
2तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
2ܥܘܬܪܟܘܢ ܓܝܪ ܐܬܚܒܠ ܘܤܪܝ ܘܡܐܢܝܟܘܢ ܐܬܐܟܠܘ ܡܢ ܤܤܐ ܀
3तुमच्या सोन्याचांदीवर गंज चढला आहे. त्याच्यावर चढलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. अशा युगामध्ये तुम्ही तुमचे धन साठवून वेगळे ठेवले आहे, ज्याचा शेवट जवळ आला आहे!
3ܘܕܗܒܟܘܢ ܘܤܐܡܟܘܢ ܐܫܚܬ ܠܗ ܘܫܘܚܬܗܘܢ ܗܘܝܐ ܠܤܗܕܘܬܐ ܥܠܝܟܘܢ ܘܗܝ ܥܬܝܕܐ ܕܬܐܟܘܠ ܒܤܪܟܘܢ ܢܘܪܐ ܟܢܫܬܘܢ ܠܟܘܢ ܠܝܘܡܬܐ ܐܚܪܝܐ ܀
4पहा! तुमच्या शेतात कापणी करणाऱ्या मजुरांची मजुरी जी तुम्ही अडवून धरलीत ती ओरडून दु:ख करीत आहे आणि कापणी करणाऱ्यांचे रडणे प्रभु परमेश्वारच्या सैन्याच्या कानी पोहोंचले आहे.
4ܗܐ ܐܓܪܐ ܕܦܥܠܐ ܕܚܨܕܘ ܐܪܥܬܟܘܢ ܗܘ ܕܛܠܡܬܘܢ ܩܥܐ ܘܓܥܬܐ ܕܚܨܘܕܐ ܠܐܕܢܘܗܝ ܕܡܪܝܐ ܨܒܐܘܬ ܥܠܬ ܀
5जगात असताना तुम्ही ऐषरामात जगला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या पशूसारखे तुम्ही पुष्ट झालात.
5ܒܤܡܬܘܢ ܓܝܪ ܥܠ ܐܪܥܐ ܘܐܬܠܥܒܬܘܢ ܘܬܪܤܝܬܘܢ ܦܓܪܝܟܘܢ ܐܝܟ ܕܠܝܘܡܐ ܕܢܟܤܬܐ ܀
6जे लोक तुम्हांला काहीही विरोध करीत नाही अशा निरपराध लोकांना तुम्ही दोषी ठरविले आहे आणि त्यांची हत्या केली आहे.
6ܚܝܒܬܘܢ ܘܩܛܠܬܘܢ ܠܙܕܝܩܐ ܘܠܐ ܩܡ ܠܘܩܒܠܟܘܢ ܀
7यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
7ܐܢܬܘܢ ܕܝܢ ܐܚܝ ܐܓܪܘ ܪܘܚܟܘܢ ܥܕܡܐ ܠܡܐܬܝܬܗ ܕܡܪܝܐ ܐܝܟ ܐܟܪܐ ܕܡܤܟܐ ܠܦܐܪܐ ܝܩܝܪܐ ܕܐܪܥܗ ܘܡܓܪ ܪܘܚܗ ܥܠܝܗܘܢ ܥܕܡܐ ܕܢܤܒ ܡܛܪܐ ܒܟܝܪܝܐ ܘܠܩܝܫܝܐ ܀
8तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. धैर्य धरा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
8ܗܟܢܐ ܐܦ ܐܢܬܘܢ ܐܓܪܘ ܪܘܚܟܘܢ ܘܠܒܘܬܟܘܢ ܫܪܪܘ ܩܪܒܬ ܠܗ ܓܝܪ ܡܐܬܝܬܗ ܕܡܪܢ ܀
9[This verse may not be a part of this translation]
9ܠܐ ܬܬܢܚܘܢ ܚܕ ܥܠ ܚܕ ܐܚܝ ܕܠܐ ܬܬܕܝܢܘܢ ܗܐ ܓܝܪ ܕܝܢܐ ܩܕܡ ܬܪܥܐ ܩܐܡ ܀
10बंधूंनो, दु:ख सहन करीत देवाच्या नावाने लोकांशी धीर धरून बोलणाऱ्या संदेष्ट्याचे उदाहरण तुम्ही आपल्यासमोर ठेवा.
10ܕܡܘܬܐ ܠܢܒܝܐ ܤܒܘ ܠܟܘܢ ܐܚܝ ܠܡܓܪܬ ܪܘܚܐ ܕܐܘܠܨܢܝܟܘܢ ܗܢܘܢ ܕܡܠܠܘ ܒܫܡܗ ܕܡܪܝܐ ܀
11त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.
11ܗܐ ܓܝܪ ܝܗܒܝܢܢ ܛܘܒܐ ܠܐܝܠܝܢ ܕܤܝܒܪܘ ܫܡܥܬܘܢ ܡܤܝܒܪܢܘܬܗ ܕܐܝܘܒ ܘܚܪܬܐ ܕܥܒܕ ܠܗ ܡܪܝܐ ܚܙܝܬܘܢ ܡܛܠ ܕܡܪܚܡܢ ܗܘ ܡܪܝܐ ܘܡܪܚܦܢ ܀
12याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे बंधूंनो, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ वाहायचे थांबवा किंवा इतर कोणत्याही प्रकारची शपथ वाहू नका. तुमचे “होय” हे “होयच” असू द्या. तुमचे “नाही” हे “नाहीच” असू द्या, यासाठी की तुम्ही देवाच्या परीक्षेत येऊ नये.
12ܩܕܡ ܟܠ ܡܕܡ ܕܝܢ ܐܚܝ ܠܐ ܗܘܝܬܘܢ ܝܡܝܢ ܠܐ ܒܫܡܝܐ ܘܠܐ ܒܐܪܥܐ ܐܦܠܐ ܒܡܘܡܬܐ ܐܚܪܬܐ ܐܠܐ ܬܗܘܐ ܡܠܬܟܘܢ ܐܝܢ ܐܝܢ ܘܠܐ ܠܐ ܕܠܐ ܬܬܚܝܒܘܢ ܬܚܝܬ ܕܝܢܐ ܀
13तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
13ܘܐܢ ܐܢܫ ܡܢܟܘܢ ܢܗܘܐ ܒܐܘܠܨܢܐ ܢܗܘܐ ܡܨܠܐ ܘܐܢ ܚܕܐ ܢܗܘܐ ܡܙܡܪ ܀
14तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडिलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे, आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे
14ܘܐܢ ܟܪܝܗ ܢܩܪܐ ܠܩܫܝܫܐ ܕܥܕܬܐ ܘܢܨܠܘܢ ܥܠܘܗܝ ܘܢܡܫܚܘܢܗ ܡܫܚܐ ܒܫܡܗ ܕܡܪܢ ܀
15विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठविल. जर त्याने पापे केली असतील तर प्रभु त्याची क्षमा करील.
15ܘܨܠܘܬܐ ܕܗܝܡܢܘܬܐ ܡܚܠܡܐ ܠܗ ܠܗܘ ܕܟܪܝܗ ܘܡܩܝܡ ܠܗ ܡܪܢ ܘܐܢ ܚܛܗܐ ܥܒܝܕܝܢ ܠܗ ܡܫܬܒܩܝܢ ܠܗ ܀
16म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
16ܗܘܝܬܘܢ ܕܝܢ ܡܘܕܝܢ ܤܟܠܘܬܟܘܢ ܚܕ ܠܚܕ ܘܗܘܝܬܘܢ ܡܨܠܝܢ ܚܕ ܥܠ ܚܕ ܕܬܬܐܤܘܢ ܪܒ ܗܘ ܓܝܪ ܚܝܠܗ ܕܨܠܘܬܐ ܐܝܕܐ ܕܙܕܝܩܐ ܡܨܠܐ ܠܗ ܀
17एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतरची सोडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
17ܐܦ ܐܠܝܐ ܒܪܢܫܐ ܗܘܐ ܚܫܘܫܐ ܐܟܘܬܢ ܘܨܠܝ ܕܠܐ ܢܚܘܬ ܡܛܪܐ ܥܠ ܐܪܥܐ ܘܠܐ ܢܚܬ ܬܠܬ ܫܢܝܢ ܘܫܬܐ ܝܪܚܝܢ ܀
18मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजविले.
18ܘܬܘܒ ܨܠܝ ܘܫܡܝܐ ܝܗܒܘ ܡܛܪܐ ܘܐܪܥܐ ܝܗܒܬ ܦܐܪܝܗ ܀
19माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो.
19ܐܚܝ ܐܢ ܐܢܫ ܡܢܟܘܢ ܢܛܥܐ ܡܢ ܐܘܪܚܐ ܕܩܘܫܬܐ ܘܢܦܢܝܘܗܝ ܐܢܫ ܡܢ ܛܥܝܘܬܗ ܀
20तो त्याचा जीव मरणाच्या दाढेतून सोडवितो. आणि त्याच्या पुष्कळ पापांची क्षमा होते.
20ܢܕܥ ܕܗܘ ܕܡܗܦܟ ܠܚܛܝܐ ܡܢ ܛܥܝܘܬܐ ܕܐܘܪܚܗ ܡܚܐ ܢܦܫܗ ܡܢ ܡܘܬܐ ܘܥܛܐ ܤܘܓܐܐ ܕܚܛܗܘܗܝ ܀