Marathi

Syriac: NT

Matthew

26

1येशूने या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,
1ܘܗܘܐ ܕܟܕ ܫܠܡ ܝܫܘܥ ܟܠܗܝܢ ܡܠܐ ܗܠܝܢ ܐܡܪ ܠܬܠܡܝܕܘܗܝ ܀
2“परवा वल्हांडणाचा सण आहे हे तुम्हांला माहीत आहे. आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जिवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल.”
2ܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܕܒܬܪ ܬܪܝܢ ܝܘܡܝܢ ܗܘܐ ܦܨܚܐ ܘܒܪܗ ܕܐܢܫܐ ܡܫܬܠܡ ܕܢܙܕܩܦ ܀
3मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील, प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कयफा होते.
3ܗܝܕܝܢ ܐܬܟܢܫܘ ܪܒܝ ܟܗܢܐ ܘܤܦܪܐ ܘܩܫܝܫܐ ܕܥܡܐ ܠܕܪܬܗ ܕܪܒ ܟܗܢܐ ܕܡܬܩܪܐ ܩܝܦܐ ܀
4सभेत त्यांनी धूर्तपणे येशूला अटक करण्याचा आणि जिवे मारण्याच्या कट केला.
4ܘܐܬܡܠܟܘ ܥܠ ܝܫܘܥ ܕܒܢܟܠܐ ܢܐܚܕܘܢܝܗܝ ܘܢܩܛܠܘܢܝܗܝ ܀
5तरीही ते म्हणत होते, “वल्हांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल.”
5ܘܐܡܪܝܢ ܗܘܘ ܠܐ ܒܥܕܥܕܐ ܕܠܐ ܢܗܘܐ ܫܓܘܫܝܐ ܒܥܡܐ ܀
6येशू बेथानीमध्ये होता, तो शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात होता.
6ܘܟܕ ܗܘܐ ܝܫܘܥ ܒܒܝܬ ܥܢܝܐ ܒܒܝܬܗ ܕܫܡܥܘܢ ܓܪܒܐ ܀
7येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अत्तराने भरलेली अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुपी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली.
7ܩܪܒܬ ܠܗ ܐܢܬܬܐ ܕܐܝܬ ܥܠܝܗ ܫܛܝܦܬܐ ܕܡܫܚܐ ܕܒܤܡܐ ܤܓܝ ܕܡܝܐ ܘܐܫܦܥܬܗ ܥܠ ܪܫܗ ܕܝܫܘܥ ܟܕ ܤܡܝܟ ܀
8त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, “या अत्तराचा असा नाश का व्हावा?
8ܚܙܘ ܕܝܢ ܬܠܡܝܕܘܗܝ ܘܐܬܒܐܫ ܠܗܘܢ ܘܐܡܪܘ ܠܡܢܐ ܐܒܕܢܐ ܗܢܐ ܀
9ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.
9ܡܫܟܚ ܗܘܐ ܓܝܪ ܕܢܙܕܒܢ ܗܢܐ ܒܤܓܝ ܘܢܬܝܗܒ ܠܡܤܟܢܐ ܀
10येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते, त्याने त्यांना विचारले, “तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहा? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे.
10ܝܫܘܥ ܕܝܢ ܝܕܥ ܘܐܡܪ ܠܗܘܢ ܡܢܐ ܡܠܐܝܢ ܐܢܬܘܢ ܠܗ ܠܐܢܬܬܐ ܥܒܕܐ ܫܦܝܪܐ ܥܒܕܬ ܠܘܬܝ ܀
11गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.
11ܒܟܠܙܒܢ ܓܝܪ ܡܤܟܢܐ ܐܝܬ ܠܟܘܢ ܥܡܟܘܢ ܠܝ ܕܝܢ ܠܐ ܒܟܠܙܒܢ ܐܝܬ ܠܟܘܢ ܀
12या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याचा वेळेची तयारी तिने केली.
12ܗܕܐ ܕܝܢ ܕܐܪܡܝܬ ܒܤܡܐ ܗܢܐ ܥܠ ܓܘܫܡܝ ܐܝܟ ܕܠܡܩܒܪܢܝ ܥܒܕܬ ܀
13मी तुम्हांला खरे सांगतो, सर्व जगातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल आणि जेथे सुवार्ता सांगण्यात येईल तेथे या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल.”
13ܘܐܡܝܢ ܐܡܪ ܐܢܐ ܠܟܘܢ ܕܐܝܟܐ ܕܬܬܟܪܙ ܤܒܪܬܝ ܗܕܐ ܒܟܠܗ ܥܠܡܐ ܢܬܡܠܠ ܐܦ ܡܕܡ ܕܥܒܕܬ ܗܕܐ ܠܕܘܟܪܢܗ ܀
14बारा शिष्यांपैकी एक यहूदा इस्कार्योत मुख्य याजकांकडे गेला.
14ܗܝܕܝܢ ܐܙܠ ܚܕ ܡܢ ܬܪܥܤܪ ܕܡܬܩܪܐ ܝܗܘܕܐ ܤܟܪܝܘܛܐ ܠܘܬ ܪܒܝ ܟܗܢܐ ܀
15यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही महा काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.
15ܘܐܡܪ ܠܗܘܢ ܡܢܐ ܨܒܝܢ ܐܢܬܘܢ ܠܡܬܠ ܠܝ ܘܐܢܐ ܡܫܠܡ ܐܢܐ ܠܗ ܠܟܘܢ ܗܢܘܢ ܕܝܢ ܐܩܝܡܘ ܠܗ ܬܠܬܝܢ ܕܟܤܦܐ ܀
16तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
16ܘܡܢ ܗܝܕܝܢ ܒܥܐ ܗܘܐ ܠܗ ܦܠܥܐ ܕܢܫܠܡܝܘܗܝ ܀
17बेखमीर भाकारीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, “वल्हांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वल्हांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
17ܒܝܘܡܐ ܕܝܢ ܩܕܡܝܐ ܕܦܛܝܪܐ ܩܪܒܘ ܬܠܡܝܕܐ ܠܘܬ ܝܫܘܥ ܘܐܡܪܘ ܠܗ ܐܝܟܐ ܨܒܐ ܐܢܬ ܕܢܛܝܒ ܠܟ ܕܬܠܥܤ ܦܨܚܐ ܀
18येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतात: माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.”‘
18ܗܘ ܕܝܢ ܐܡܪ ܠܗܘܢ ܙܠܘ ܠܡܕܝܢܬܐ ܠܘܬ ܦܠܢ ܘܐܡܪܘ ܠܗ ܪܒܢ ܐܡܪ ܙܒܢܝ ܡܛܐ ܠܗ ܠܘܬܟ ܥܒܕ ܐܢܐ ܦܨܚܐ ܥܡ ܬܠܡܝܕܝ ܀
19येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वल्हांडण सणाचे जेवण तयार केले.
19ܘܬܠܡܝܕܘܗܝ ܥܒܕܘ ܐܝܟܢܐ ܕܦܩܕ ܠܗܘܢ ܝܫܘܥ ܘܛܝܒܘ ܦܨܚܐ ܀
20संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला.
20ܘܟܕ ܗܘܐ ܪܡܫܐ ܤܡܝܟ ܗܘܐ ܥܡ ܬܪܥܤܪ ܬܠܡܝܕܘܗܝ ܀
21जेवण करीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो: तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”
21ܘܟܕ ܠܥܤܝܢ ܐܡܪ ܐܡܝܢ ܐܡܪ ܐܢܐ ܠܟܘܢ ܕܚܕ ܡܢܟܘܢ ܡܫܠܡ ܠܝ ܀
22ते खूप दु:खी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण त्याला विचारु लागला, “तो मी नाही ना प्रभु?”
22ܘܟܪܝܬ ܠܗܘܢ ܛܒ ܘܫܪܝܘ ܠܡܐܡܪ ܠܗ ܚܕ ܚܕ ܡܢܗܘܢ ܠܡܐ ܐܢܐ ܡܪܝ ܀
23मग येशूने उत्तर दिले, “जो माझ्याबरोबर ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील.
23ܗܘ ܕܝܢ ܥܢܐ ܘܐܡܪ ܡܢ ܕܨܒܥ ܐܝܕܗ ܥܡܝ ܒܠܓܬܐ ܗܘ ܢܫܠܡܢܝ ܀
24जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल, पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दु:ख वाटते! तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते.”
24ܘܒܪܗ ܕܐܢܫܐ ܐܙܠ ܐܝܟܢܐ ܕܟܬܝܒ ܥܠܘܗܝ ܘܝ ܠܗ ܕܝܢ ܠܓܒܪܐ ܗܘ ܕܒܐܝܕܗ ܒܪܗ ܕܐܢܫܐ ܡܫܬܠܡ ܦܩܚ ܗܘܐ ܠܗ ܠܓܒܪܐ ܗܘ ܐܠܘ ܠܐ ܐܬܝܠܕ ܀
25मग यहूदा, जो त्याचा विश्वासघात करणार होता, तो येशूकडे वळून म्हणाला, “तो मी आहे का, गुरूजी?” येशू त्याला म्हणाला, “तू म्हणालास, तसेच आहे (म्हणजे होय तो तूच आहेस.”)
25ܥܢܐ ܝܗܘܕܐ ܡܫܠܡܢܐ ܘܐܡܪ ܕܠܡܐ ܐܢܐ ܗܘ ܪܒܝ ܐܡܪ ܠܗ ܝܫܘܥ ܐܢܬ ܐܡܪܬ ܀
26ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले. आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “हे घ्या आणी खा. हे माझे शरीर आहे.”
26ܟܕ ܕܝܢ ܠܥܤܝܢ ܫܩܠ ܝܫܘܥ ܠܚܡܐ ܘܒܪܟ ܘܩܨܐ ܘܝܗܒ ܠܬܠܡܝܕܘܗܝ ܘܐܡܪ ܤܒܘ ܐܟܘܠܘ ܗܢܘ ܦܓܪܝ ܀
27नंतर येशूने द्राक्षारसाचा प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यातील प्यावे. कारण हे माझे रक्त आहे,
27ܘܫܩܠ ܟܤܐ ܘܐܘܕܝ ܘܝܗܒ ܠܗܘܢ ܘܐܡܪ ܤܒܘ ܐܫܬܘ ܡܢܗ ܟܠܟܘܢ ܀
28हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे. यासाठी की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी.
28ܗܢܘ ܕܡܝ ܕܕܝܬܩܐ ܚܕܬܐ ܕܚܠܦ ܤܓܝܐܐ ܡܬܐܫܕ ܠܫܘܒܩܢܐ ܕܚܛܗܐ ܀
29मी तुम्हांला सांगतो: माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षारस पिणार नाही.”
29ܐܡܪ ܐܢܐ ܠܟܘܢ ܕܝܢ ܕܠܐ ܐܫܬܐ ܡܢ ܗܫܐ ܡܢ ܗܢܐ ܝܠܕܐ ܕܓܦܬܐ ܥܕܡܐ ܠܝܘܡܐ ܕܒܗ ܐܫܬܝܘܗܝ ܥܡܟܘܢ ܚܕܬܐ ܒܡܠܟܘܬܗ ܕܐܒܝ ܀
30मग त्यांनी वल्हांडणाचे गीत गाईले. नंतर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
30ܘܫܒܚܘ ܘܢܦܩܘ ܠܛܘܪ ܙܝܬܐ ܀
31येशूने सांगितले, “आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंकाकुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहेले आहे: ‘मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल.’ ज्खऱ्याा 13:7
31ܗܝܕܝܢ ܐܡܪ ܠܗܘܢ ܝܫܘܥ ܐܢܬܘܢ ܟܠܟܘܢ ܬܬܟܫܠܘܢ ܒܝ ܒܗܢܐ ܠܠܝܐ ܟܬܝܒ ܓܝܪ ܕܐܡܚܐ ܠܪܥܝܐ ܘܢܬܒܕܪܘܢ ܥܪܒܐ ܕܥܢܗ ܀
32पण मी मरणातून उठल्यानंतर, तुमच्या अगोदर गालीलात जाईन,
32ܡܢ ܒܬܪ ܕܩܐܡ ܐܢܐ ܕܝܢ ܩܕܡ ܐܢܐ ܠܟܘܢ ܠܓܠܝܠܐ ܀
33उत्तर देताना पेत्र म्हणाला, “इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही!”
33ܥܢܐ ܟܐܦܐ ܘܐܡܪ ܠܗ ܐܦܢ ܟܠܢܫ ܢܬܟܫܠ ܒܟ ܐܢܐ ܡܬܘܡ ܠܐ ܐܬܟܫܠ ܒܟ ܀
34येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो: तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वा तू तीन वेळा म्हणशील.”
34ܐܡܪ ܠܗ ܝܫܘܥ ܐܡܝܢ ܐܡܪ ܐܢܐ ܠܟ ܕܒܗܢܐ ܠܠܝܐ ܩܕܡ ܕܢܩܪܐ ܬܪܢܓܠܐ ܬܠܬ ܙܒܢܝܢ ܬܟܦܘܪ ܒܝ ܀
35पेत्र म्हणाला, “तुम्हांला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा असेच म्हणाले.
35ܐܡܪ ܠܗ ܟܐܦܐ ܐܢ ܢܗܘܐ ܠܝ ܠܡܡܬ ܥܡܟ ܠܐ ܐܟܦܘܪ ܒܟ ܘܗܟܘܬ ܐܦ ܟܠܗܘܢ ܬܠܡܝܕܐ ܐܡܪܘ ܀
36नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.”
36ܗܝܕܝܢ ܐܬܐ ܥܡܗܘܢ ܝܫܘܥ ܠܕܘܟܬܐ ܕܡܬܩܪܝܐ ܓܕܤܡܢ ܘܐܡܪ ܠܬܠܡܝܕܘܗܝ ܬܒܘ ܗܪܟܐ ܥܕ ܐܙܠ ܐܨܠܐ ܀
37येशूने पेत्र आणि दोन जब्दीचे पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दु:खी व व्याकूळ होऊ लागला.
37ܘܕܒܪ ܠܟܐܦܐ ܘܠܬܪܝܗܘܢ ܒܢܝ ܙܒܕܝ ܘܫܪܝ ܠܡܬܟܡܪܘ ܘܠܡܬܥܩܘ ܀
38येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझे दु:ख मला इतके झाले आहे की, ते मला मारून टाकील. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”
38ܘܐܡܪ ܠܗܘܢ ܟܪܝܐ ܗܝ ܠܗ ܠܢܦܫܝ ܥܕܡܐ ܠܡܘܬܐ ܩܘܘ ܠܝ ܗܪܟܐ ܘܫܗܪܘ ܥܡܝ ܀
39तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दु:खाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
39ܘܦܪܩ ܩܠܝܠ ܘܢܦܠ ܥܠ ܐܦܘܗܝ ܘܡܨܠܐ ܗܘܐ ܘܐܡܪ ܐܒܝ ܐܢ ܡܫܟܚܐ ܢܥܒܪܢܝ ܟܤܐ ܗܢܐ ܒܪܡ ܠܐ ܐܝܟ ܕܐܢܐ ܨܒܐ ܐܢܐ ܐܠܐ ܐܝܟ ܕܐܢܬ ܀
40मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय?
40ܘܐܬܐ ܠܘܬ ܬܠܡܝܕܘܗܝ ܘܐܫܟܚ ܐܢܘܢ ܟܕ ܕܡܟܝܢ ܘܐܡܪ ܠܟܐܦܐ ܗܟܢܐ ܠܐ ܐܫܟܚܬܘܢ ܚܕܐ ܫܥܐ ܕܬܫܗܪܘܢ ܥܡܝ ܀
41आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा. आणि प्रार्थना करीत राहा. यासाठी की तुम्ही मोहात पडू नये. जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करी इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे.”
41ܐܬܬܥܝܪܘ ܘܨܠܘ ܕܠܐ ܬܥܠܘܢ ܠܢܤܝܘܢܐ ܪܘܚܐ ܡܛܝܒܐ ܦܓܪܐ ܕܝܢ ܟܪܝܗ ܀
42नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दु:खाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”
42ܬܘܒ ܐܙܠ ܕܬܪܬܝܢ ܙܒܢܝܢ ܨܠܝ ܘܐܡܪ ܐܒܝ ܐܢ ܠܐ ܡܫܟܚ ܗܢܐ ܟܤܐ ܕܢܥܒܪ ܐܠܐ ܐܢ ܐܫܬܝܬܗ ܢܗܘܐ ܨܒܝܢܟ ܀
43नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की, त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते.
43ܘܐܬܐ ܬܘܒ ܐܫܟܚ ܐܢܘܢ ܟܕ ܕܡܟܝܢ ܥܝܢܝܗܘܢ ܓܝܪ ܝܩܝܪܢ ܗܘܝ ܀
44नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हेच शब्द उच्चारले.
44ܘܫܒܩ ܐܢܘܢ ܘܐܙܠ ܬܘܒ ܨܠܝ ܕܬܠܬ ܙܒܢܝܢ ܘܠܗ ܠܡܠܬܐ ܐܡܪ ܀
45यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विश्रांतिच घेत आहात का? ऐका! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे.
45ܗܝܕܝܢ ܐܬܐ ܠܘܬ ܬܠܡܝܕܘܗܝ ܘܐܡܪ ܠܗܘܢ ܕܡܟܘ ܡܟܝܠ ܘܐܬܬܢܝܚܘ ܗܐ ܡܛܬ ܫܥܬܐ ܘܒܪܗ ܕܐܢܫܐ ܡܫܬܠܡ ܒܐܝܕܝܗܘܢ ܕܚܛܝܐ ܀
46उठा! आपल्याला निघालेच पाहिजे. हा पाहा, मला धरून शत्रूंच्या हाती देणारा येत आहे.”
46ܩܘܡܘ ܢܐܙܠ ܗܐ ܡܛܐ ܗܘ ܕܡܫܠܡ ܠܝ ܀
47येशू हे बोलत असतानाच बारा जणांपैकी एक जो यहूदा, तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजन यांनी त्यांना पाढविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते.
47ܘܥܕ ܗܘ ܡܡܠܠ ܗܐ ܝܗܘܕܐ ܡܫܠܡܢܐ ܚܕ ܡܢ ܬܪܥܤܪܬܐ ܐܬܐ ܘܟܢܫܐ ܥܡܗ ܤܓܝܐܐ ܥܡ ܤܦܤܪܐ ܘܚܘܛܪܐ ܡܢ ܠܘܬ ܪܒܝ ܟܗܢܐ ܘܩܫܝܫܐ ܕܥܡܐ ܀
48येशूला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहूदा याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती. यहूदा म्हणाला, “ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय; त्याला तुम्ही धरा,”
48ܘܝܗܒ ܗܘܐ ܠܗܘܢ ܐܬܐ ܝܗܘܕܐ ܡܫܠܡܢܐ ܘܐܡܪ ܠܗܘ ܕܢܫܩ ܐܢܐ ܗܘܝܘ ܠܗ ܐܚܘܕܘ ܀
49मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
49ܘܡܚܕܐ ܩܪܒ ܠܘܬ ܝܫܘܥ ܘܐܡܪ ܫܠܡ ܪܒܝ ܘܢܫܩܗ ܀
50येशू त्याला म्हणाला, “मित्रा, जे करण्यास आलास ते कर!” मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले.
50ܗܘ ܕܝܢ ܝܫܘܥ ܐܡܪ ܠܗ ܥܠ ܗܝ ܕܐܬܝܬ ܚܒܪܝ ܗܝܕܝܢ ܐܬܩܪܒܘ ܘܐܪܡܝܘ ܐܝܕܝܗܘܢ ܥܠ ܝܫܘܥ ܘܐܚܕܘܗܝ ܀
51हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने प्रमुख याजकाच्या नोकराचा कान कापला.
51ܘܗܐ ܚܕ ܡܢ ܗܢܘܢ ܕܥܡ ܝܫܘܥ ܐܘܫܛ ܐܝܕܗ ܘܫܡܛ ܤܦܤܪܐ ܘܡܚܝܗܝ ܠܥܒܕܗ ܕܪܒ ܟܗܢܐ ܘܫܩܠܗ ܐܕܢܗ ܀
52येशू त्या मनुष्याला म्हणाला, “तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात.
52ܗܝܕܝܢ ܐܡܪ ܠܗ ܝܫܘܥ ܐܗܦܟ ܤܦܤܪܐ ܠܕܘܟܬܗ ܟܠܗܘܢ ܓܝܪ ܗܢܘܢ ܕܢܤܒܘ ܤܝܦܐ ܒܤܝܦܐ ܢܡܘܬܘܢ ܀
53मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या बारापेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हांला कळत नाही काय?
53ܐܘ ܤܒܪ ܐܢܬ ܕܠܐ ܡܫܟܚ ܐܢܐ ܕܐܒܥܐ ܡܢ ܐܒܝ ܘܢܩܝܡ ܠܝ ܗܫܐ ܝܬܝܪ ܡܢ ܬܪܬܥܤܪܐ ܠܓܝܘܢܝܢ ܕܡܠܐܟܐ ܀
54परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिले असा पवित्र शास्त्रात जो लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल?”
54ܐܝܟܢܐ ܗܟܝܠ ܢܬܡܠܘܢ ܟܬܒܐ ܕܗܟܢܐ ܘܠܐ ܕܢܗܘܐ ܀
55यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, “जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही.
55ܒܗܝ ܫܥܬܐ ܐܡܪ ܝܫܘܥ ܠܟܢܫܐ ܐܝܟ ܕܥܠ ܓܝܤܐ ܢܦܩܬܘܢ ܒܤܦܤܪܐ ܘܒܚܘܛܪܐ ܕܬܐܚܕܘܢܢܝ ܟܠܝܘܡ ܠܘܬܟܘܢ ܒܗܝܟܠܐ ܝܬܒ ܗܘܝܬ ܘܡܠܦ ܘܠܐ ܐܚܕܬܘܢܢܝ ܀
56परंतु या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की, संदेष्ट्यानी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे.” नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
56ܗܕܐ ܕܝܢ ܕܗܘܬ ܕܢܬܡܠܘܢ ܟܬܒܐ ܕܢܒܝܐ ܗܝܕܝܢ ܬܠܡܝܕܐ ܟܠܗܘܢ ܫܒܩܘܗܝ ܘܥܪܩܘ ܀
57त्या लोकांनी येशूला धरले, त्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र जमले होते.
57ܘܗܢܘܢ ܕܐܚܕܘܗܝ ܠܝܫܘܥ ܐܘܒܠܘܗܝ ܠܘܬ ܩܝܦܐ ܪܒ ܟܗܢܐ ܐܝܟܐ ܕܤܦܪܐ ܘܩܫܝܫܐ ܟܢܝܫܝܢ ܗܘܘ ܀
58पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला.
58ܫܡܥܘܢ ܕܝܢ ܟܐܦܐ ܐܙܠ ܗܘܐ ܒܬܪܗ ܡܢ ܪܘܚܩܐ ܥܕܡܐ ܠܕܪܬܗ ܕܪܒ ܟܗܢܐ ܘܥܠ ܝܬܒ ܠܓܘ ܥܡ ܕܚܫܐ ܕܢܚܙܐ ܚܪܬܐ ܀
59येशूला मरणदंड द्यावा म्हणून मूख्य याजक आणि सर्व यहूदी सभा त्याच्याविरूद्ध काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
59ܪܒܝ ܟܗܢܐ ܕܝܢ ܘܩܫܝܫܐ ܘܟܢܘܫܬܐ ܟܠܗ ܒܥܝܢ ܗܘܘ ܥܠ ܝܫܘܥ ܤܗܕܐ ܐܝܟ ܕܢܡܝܬܘܢܝܗܝ ܀
60पुष्कळ लोक पुढे आले आणि येशूविरूद्ध साक्ष देऊ लागले. परंतु येशूला जिवे मारण्याचे काहीही कारण यहूदी सभेला सापडेना. शेवटी दोन माणसे पुढे आली, ती म्हणू लागली,
60ܘܠܐ ܐܫܟܚܘ ܘܐܬܘ ܤܓܝܐܐ ܤܗܕܐ ܕܫܘܩܪܐ ܐܚܪܝܬ ܕܝܢ ܩܪܒܘ ܬܪܝܢ ܀
61“हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.”
61ܘܐܡܪܝܢ ܗܢܐ ܐܡܪ ܕܡܫܟܚ ܐܢܐ ܕܐܫܪܐ ܗܝܟܠܐ ܕܐܠܗܐ ܘܠܬܠܬܐ ܝܘܡܝܢ ܐܒܢܝܘܗܝ ܀
62तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, “हे लोक तुझ्याविरूद्ध साक्ष देत आहेत, तुझ्यविरूद्ध जे आरोप आहेत, त्याविषयी तुला काही सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहेत काय?”
62ܘܩܡ ܪܒ ܟܗܢܐ ܘܐܡܪ ܠܗ ܠܐ ܡܕܡ ܡܦܢܐ ܐܢܬ ܦܬܓܡܐ ܡܢܐ ܡܤܗܕܝܢ ܥܠܝܟ ܗܠܝܢ ܀
63पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परत एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, “जिवंत देवाच्या नावाची शपथ. मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग! तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय?”
63ܝܫܘܥ ܕܝܢ ܫܬܝܩ ܗܘܐ ܘܥܢܐ ܪܒ ܟܗܢܐ ܘܐܡܪ ܠܗ ܡܘܡܐ ܐܢܐ ܠܟ ܒܐܠܗܐ ܚܝܐ ܕܬܐܡܪ ܠܢ ܐܢ ܐܢܬ ܗܘ ܡܫܝܚܐ ܒܪܗ ܕܐܠܗܐ ܀
64येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हांला सांगतो: ह्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल.”
64ܐܡܪ ܠܗ ܝܫܘܥ ܐܢܬ ܐܡܪܬ ܐܡܪܢܐ ܠܟܘܢ ܕܝܢ ܕܡܢ ܗܫܐ ܬܚܙܘܢܝܗܝ ܠܒܪܗ ܕܐܢܫܐ ܕܝܬܒ ܡܢ ܝܡܝܢܐ ܕܚܝܠܐ ܘܐܬܐ ܥܠ ܥܢܢܝ ܫܡܝܐ ܀
65जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले, तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, “याने देवाविरूद्ध दुर्भाषण केले आहे! आम्हांला आणखी साक्षीदारांची गरज राहिली नाही. ह्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले!
65ܗܝܕܝܢ ܪܒ ܟܗܢܐ ܨܪܝ ܡܐܢܘܗܝ ܘܐܡܪ ܗܐ ܓܕܦ ܡܢܐ ܡܟܝܠ ܡܬܒܥܝܢ ܠܢ ܤܗܕܐ ܗܐ ܗܫܐ ܫܡܥܬܘܢ ܓܘܕܦܗ ܀
66तुम्हांला काय वाटते?” यहूद्यांनी उत्तर दिले, “तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे.”
66ܡܢܐ ܨܒܝܢ ܐܢܬܘܢ ܥܢܘ ܘܐܡܪܝܢ ܚܝܒ ܗܘ ܡܘܬܐ ܀
67तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.
67ܗܝܕܝܢ ܪܩܘ ܒܐܦܘܗܝ ܘܡܩܦܚܝܢ ܗܘܘ ܠܗ ܐܚܪܢܐ ܕܝܢ ܡܚܝܢ ܗܘܘ ܠܗ ܀
68ते म्हणाले, “ख्रिस्ता आमच्यासाठी भविष्य सांग! तुला कोणी मारले?ʈ
68ܘܐܡܪܝܢ ܐܬܢܒܐ ܠܢ ܡܫܝܚܐ ܡܢܘ ܗܘ ܕܡܚܟ ܀
69यावेळी पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैंकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, “तू सुद्धा गालीलच्या येशूबरोबर होतास.”
69ܟܐܦܐ ܕܝܢ ܝܬܒ ܗܘܐ ܠܒܪ ܒܕܪܬܐ ܘܩܪܒܬ ܠܘܬܗ ܐܡܬܐ ܚܕܐ ܘܐܡܪܐ ܠܗ ܐܦ ܐܢܬ ܥܡ ܝܫܘܥ ܗܘܝܬ ܢܨܪܝܐ ܀
70पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही!”
70ܗܘ ܕܝܢ ܟܦܪ ܩܕܡ ܟܠܗܘܢ ܘܐܡܪ ܠܐ ܝܕܥ ܐܢܐ ܡܢܐ ܐܡܪܐ ܐܢܬܝ ܀
71मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, “नासरे थकर येशूबरोबर हा होता.”
71ܘܟܕ ܢܦܩ ܠܤܦܐ ܚܙܬܗ ܐܚܪܬܐ ܘܐܡܪܐ ܠܗܘܢ ܕܬܡܢ ܗܘܐ ܐܦ ܗܢܐ ܥܡ ܝܫܘܥ ܢܨܪܝܐ ܀
72पुन्हा एकदा पेत्र शपथ घेऊन येशूला नाकारतांना, म्हणाला, “मी त्याला ओळखत नाही!”
72ܘܬܘܒ ܟܦܪ ܒܡܘܡܬܐ ܕܠܐ ܝܕܥ ܐܢܐ ܠܗ ܠܓܒܪܐ ܀
73काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, “तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस, हे आम्हांला माहीत आहे, तुझ्या बोलण्यावरून हे आम्हांला स्पष्ट दिसून येते.”
73ܡܢ ܒܬܪ ܩܠܝܠ ܕܝܢ ܩܪܒܘ ܗܢܘܢ ܕܩܝܡܝܢ ܘܐܡܪܘ ܠܟܐܦܐ ܫܪܝܪܐܝܬ ܐܦ ܐܢܬ ܡܢܗܘܢ ܐܢܬ ܐܦ ܡܡܠܠܟ ܓܝܪ ܡܘܕܥ ܠܟ ܀
74मग तो स्वत:ला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवाला.
74ܗܝܕܝܢ ܫܪܝ ܠܡܚܪܡܘ ܘܠܡܐܡܐ ܕܠܐ ܝܕܥܢܐ ܠܗ ܠܓܒܪܐ ܘܒܗ ܒܫܥܬܐ ܩܪܐ ܬܪܢܓܠܐ ܀ 75 ܘܐܬܕܟܪ ܟܐܦܐ ܡܠܬܐ ܕܝܫܘܥ ܕܐܡܪ ܠܗ ܕܩܕܡ ܕܢܩܪܐ ܬܪܢܓܠܐ ܬܠܬ ܙܒܢܝܢ ܬܟܦܘܪ ܒܝ ܘܢܦܩ ܠܒܪ ܒܟܐ ܡܪܝܪܐܝܬ ܀
75नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले, “कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील.” यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दु:खतिशयाने रडला.
75