Marathi

Syriac: NT

Philippians

3

1शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी मी पुन्हा लिहिण्यास मला त्रासदायक वाटत नाहीत, आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे.
1ܡܟܝܠ ܐܚܝ ܚܕܘ ܒܡܪܢ ܗܢܝܢ ܟܕ ܗܢܝܢ ܕܐܟܬܘܒ ܠܟܘܢ ܠܐ ܡܐܢܐ ܠܝ ܡܛܠ ܕܠܟܘܢ ܡܙܗܪܢ ܀
2“कुत्र्या” विषयी सावध असा! दुष्कर्माविषयी सावध असा! शरीराला इजा करणाऱ्यांपासून सावध असा,
2ܐܙܕܗܪܘ ܡܢ ܟܠܒܐ ܐܙܕܗܪܘ ܡܢ ܦܥܠܐ ܒܝܫܐ ܐܙܕܗܪܘ ܡܢ ܦܤܩ ܒܤܪܐ ܀
3कारण आम्हीच खरे सुंता झालेले लोक आहोत, आणि आम्ही जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवीत नाही.
3ܓܙܘܪܬܐ ܓܝܪ ܚܢܢ ܐܝܬܝܢ ܐܝܠܝܢ ܕܦܠܚܝܢܢ ܠܐܠܗܐ ܒܪܘܚܐ ܘܡܫܬܒܗܪܝܢܢ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܘܠܐ ܬܟܝܠܝܢܢ ܥܠ ܒܤܪܐ ܀
4जरी मला स्वत:ला जगिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला जगिक गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कारण आहे असे वाटते.
4ܟܕ ܠܝ ܐܝܬ ܗܘܐ ܠܝ ܬܘܟܠܢܐ ܐܦ ܥܠ ܒܤܪܐ ܐܢ ܓܝܪ ܐܢܫ ܤܒܪ ܕܬܘܟܠܢܗ ܒܒܤܪܐ ܗܘ ܝܬܝܪ ܡܢܗ ܐܢܐ ܀
5तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे.
5ܓܙܝܪܐ ܒܪ ܬܡܢܝܐ ܝܘܡܝܢ ܡܢ ܛܘܗܡܐ ܕܐܝܤܪܝܠ ܡܢ ܫܒܛܐ ܕܒܢܝܡܝܢ ܥܒܪܝܐ ܒܪ ܥܒܪܝܐ ܒܢܡܘܤܐ ܦܪܝܫܝܐ ܀
6माझ्या आस्थेविषयी म्हणाला तर मी मंडळीचा छळ केला. नियमशास्त्राने ठरवून दिल ल्या नीतिमत्वाविषयी मी निर्दोष आहे.
6ܒܛܢܢܐ ܪܕܘܦܐ ܕܥܕܬܐ ܘܒܙܕܝܩܘܬܐ ܕܢܡܘܤܐ ܕܠܐ ܪܫܝܢ ܗܘܝܬ ܀
7त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो.
7ܐܠܐ ܗܠܝܢ ܕܝܘܬܪܢܐ ܗܘܝ ܠܝ ܚܘܤܪܢܐ ܚܫܒܬ ܐܢܝܢ ܡܛܠ ܡܫܝܚܐ ܀
8शिवाय माझ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानि समजतो. त्याच्यासाठी सर्व काही मी गमावलेले आहे. ख्रिस्ताला मिळविण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो.
8ܐܦ ܚܫܒ ܐܢܐ ܠܗܝܢ ܟܠܗܝܢ ܚܘܤܪܢܐ ܡܛܠ ܪܒܘܬܐ ܕܝܕܥܬܗ ܕܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܡܪܝ ܗܘ ܕܡܛܠܬܗ ܟܠܡܕܡ ܚܤܪܬ ܘܐܝܟ ܙܒܠܐ ܚܫܒܬ ܕܠܡܫܝܚܐ ܐܬܪ ܀
9आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे.
9ܘܐܫܬܟܚ ܒܗ ܟܕ ܠܝܬ ܠܝ ܙܕܝܩܘܬܐ ܕܢܦܫܝ ܗܝ ܕܡܢ ܢܡܘܤܐ ܐܠܐ ܗܝ ܕܡܢ ܗܝܡܢܘܬܐ ܕܡܫܝܚܐ ܕܐܝܬܝܗ ܙܕܝܩܘܬܐ ܕܡܢ ܐܠܗܐ ܀
10मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे, मला त्याच्या दु:खसहनामध्ये सुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या मरणाशी अनुरुप व्हायचे आहे.
10ܕܒܗ ܐܫܬܘܕܥ ܠܝܫܘܥ ܘܠܚܝܠܐ ܕܩܝܡܬܗ ܘܐܫܬܘܬܦ ܒܚܫܘܗܝ ܘܐܬܕܡܐ ܒܡܘܬܗ ܀
11या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.
11ܕܠܡܐ ܐܫܟܚ ܐܡܛܐ ܠܩܝܡܬܐ ܕܡܢ ܒܝܬ ܡܝܬܐ ܀
12हे असे नाही की मी अगोदरच बक्षिस मिळविले आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालो आहे. ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षिस मिळविण्याचा मी प्रयत्न करतो.
12ܠܐ ܗܘܐ ܡܢ ܟܕܘ ܢܤܒܬ ܐܘ ܡܢ ܟܕܘ ܐܬܓܡܪܬ ܐܠܐ ܪܗܛ ܐܢܐ ܕܠܡܐ ܐܕܪܟ ܠܡܕܡ ܕܡܛܠܬܗ ܐܕܪܟܢܝ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
13बंधूंनो, त मी मिळविले असे मानीत नाही, परंतु एक गोष्ट आहे की, जी करण्याचा मी निश्चय करतो, जे भूतकाळात आहे ते मी विसरतो, आणि ते माझ्यापुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो.
13ܐܚܝ ܐܢܐ ܥܠ ܢܦܫܝ ܠܐ ܪܢܐ ܐܢܐ ܕܐܕܪܟܬ ܚܕܐ ܕܝܢ ܝܕܥ ܐܢܐ ܕܕܒܤܬܪܝ ܛܥܐ ܐܢܐ ܘܠܩܕܡܝ ܡܫܬܘܫܛ ܐܢܐ ܀
14ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.
14ܘܪܗܛ ܐܢܐ ܠܘܩܒܠ ܢܝܫܐ ܕܐܤܒ ܙܟܘܬܐ ܕܩܪܝܢܐ ܕܠܥܠ ܕܐܠܗܐ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
15तेव्हा आपण सर्व जे परिपक्व (प्रौढ) त्या आम्ची एकच प्रवृती आहे आणि एखाद्या मुद्यावर तुम्ही वेगळा विचार केला तरी देव तुम्हांस तेही प्रकट करील.
15ܐܝܠܝܢ ܕܓܡܝܪܝܢ ܗܟܝܠ ܗܠܝܢ ܢܬܪܥܘܢ ܘܐܢ ܡܕܡ ܐܚܪܢܝܐܝܬ ܡܬܪܥܝܢ ܐܢܬܘܢ ܐܦ ܗܕܐ ܐܠܗܐ ܢܓܠܐ ܠܟܘܢ ܀
16फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोंचलो त्याच्याच मागे चालत राहावे.
16ܒܪܡ ܠܗܕܐ ܕܡܛܝܢ ܒܚܕ ܫܒܝܠܐ ܢܫܠܡ ܘܒܚܕܐ ܐܘܝܘܬܐ ܀
17बंधूनो, माझे अनुकरण करण्यासाठी इतरांबरोबर सहभागी व्हा. आणि आम्ही जसे तुमच्यासमोर उदाहरणादाखल आहोत, त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
17ܐܬܕܡܘ ܒܝ ܐܚܝ ܘܗܘܝܬܘܢ ܡܬܒܩܝܢ ܒܐܝܠܝܢ ܕܗܟܢܐ ܡܗܠܟܝܢ ܐܝܟ ܕܡܘܬܐ ܕܒܢ ܚܙܝܬܘܢ ܀
18कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागातात.
18ܐܝܬ ܓܝܪ ܤܓܝܐܐ ܕܐܚܪܢܝܐܝܬ ܡܗܠܟܝܢ ܗܢܘܢ ܕܙܒܢܝܢ ܤܓܝܐܢ ܐܡܪܬ ܠܟܘܢ ܥܠܝܗܘܢ ܗܫܐ ܕܝܢ ܟܕ ܒܟܐ ܐܢܐ ܐܡܪ ܐܢܐ ܗܢܘܢ ܕܒܥܠܕܒܒܐ ܐܢܘܢ ܕܙܩܝܦܗ ܕܡܫܝܚܐ ܀
19नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयीच विचार करतात.
19ܕܚܪܬܗܘܢ ܐܒܕܢܐ ܗܝ ܗܢܘܢ ܕܐܠܗܗܘܢ ܟܪܤܗܘܢ ܘܬܫܒܘܚܬܗܘܢ ܒܗܬܬܗܘܢ ܗܠܝܢ ܕܬܪܥܝܬܗܘܢ ܒܐܪܥܐ ܗܝ ܀
20आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत.
20ܕܝܠܢ ܕܝܢ ܦܘܠܚܢܢ ܒܫܡܝܐ ܗܘ ܘܡܢ ܬܡܢ ܡܤܟܝܢܢ ܠܡܚܝܢܐ ܠܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
21त्याच्या ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्याने तो आपले शरीर बदलून टाकील, आणि त्याच्या वैभवी शरीरासारखे करील.
21ܕܗܘ ܢܚܠܦ ܦܓܪܐ ܕܡܘܟܟܢ ܕܢܗܘܐ ܒܕܡܘܬܐ ܕܦܓܪܐ ܕܫܘܒܚܗ ܐܝܟ ܚܝܠܗ ܪܒܐ ܗܘ ܕܒܗ ܟܠ ܐܫܬܥܒܕ ܠܗ ܀