1“सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जो देवाचे सात आत्मे धरतो व सात तारे धरतो त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, जिवंत असण्याबद्दल तुमचा लौकिक आहे. पण तुम्ही मेलेले आहात.
1ܘܠܡܠܐܟܐ ܕܒܥܕܬܐ ܕܤܪܕܝܤ ܟܬܘܒ ܗܟܢܐ ܐܡܪ ܗܘ ܕܐܝܬ ܠܗ ܫܒܥ ܪܘܚܝܢ ܕܐܠܗܐ ܘܫܒܥܐ ܟܘܟܒܐ ܝܕܥ ܐܢܐ ܥܒܕܝܟ ܘܫܡܐ ܕܐܝܬ ܠܟ ܘܕܚܝܐ ܐܢܬ ܘܕܡܝܬܐ ܐܢܬ ܀
2जागे व्हा! जे उरलेले आहेत आणि मरणाच्या ह्यमार्गावर आहेत त्यांना मजबूत करा. कारण माझ्या देवाच्या दृष्टीने तुमची कृत्ये पूर्ण झाल्याचे मला आढळले नाही.
2ܘܗܘܝ ܥܝܪܐ ܘܩܝܡ ܕܫܪܟܐ ܕܐܝܠܝܢ ܕܥܬܝܕ ܗܘܝܬ ܠܡܡܬ ܠܐ ܓܝܪ ܐܫܟܚܬܟ ܕܡܫܡܠܝܢ ܥܒܕܝܟ ܩܕܡ ܐܠܗܐ ܀
3म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्हाला प्राप्त झालेले आहे आणि जे तुम्ही ऐकले आहे त्याप्रमाणे वागा. आणि पश्चात्ताप करा. पण जर तुम्ही जागे होत नाही, तर मी एखाद्या चोरासारख येईन आणि तुम्हाला हे कळणार नाही की मी नेमक्या कोणत्या वेळेला तुमच्याकडे येईन.
3ܐܬܕܟܪ ܐܝܟܢ ܫܡܥܬ ܘܢܤܒܬ ܐܙܕܗܪ ܘܬܘܒ ܘܐܢܕܝܢ ܠܐ ܬܬܥܝܪ ܐܬܐ ܐܢܐ ܥܠܝܟ ܐܝܟ ܓܢܒܐ ܘܠܐ ܬܕܥ ܐܝܕܐ ܫܥܬܐ ܐܬܐ ܥܠܝܟ ܀
4तरी तुमच्यात थोडे लोक आहेत जे सार्दीसमध्ये आहेत ज्यांनी स्वत:ला स्वच्छ राखले आहे. ते लोक माझ्याबरोबर चालतील. ते पांढरी वस्त्रे घालतील कारण ते पात्र आहेत.
4ܐܠܐ ܐܝܬ ܠܝ ܩܠܝܠ ܫܡܗܐ ܒܤܪܕܝܤ ܐܝܠܝܢ ܕܠܐ ܛܘܫܘ ܡܐܢܝܗܘܢ ܘܡܗܠܟܝܢ ܩܕܡܝ ܒܚܘܪܐ ܘܫܘܝܢ ܐܢܘܢ ܀
5प्रत्येक व्यक्ति जी विजय मिळविते, ती त्यांच्यासारखी पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्या व्यक्तीचे नाव जीवनाच्या पुस्तकातून काढणार तर नाहीच पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या देवदूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
5ܕܙܟܐ ܗܟܢܐ ܡܬܥܛܦ ܡܐܢܐ ܚܘܪܐ ܘܠܐ ܐܠܚܐ ܫܡܗ ܡܢ ܤܦܪܐ ܕܚܝܐ ܘܐܘܕܐ ܒܫܡܗ ܩܕܡ ܐܒܝ ܘܩܕܡ ܡܠܐܟܘܗܝ ܀
6आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
6ܐܝܢܐ ܕܐܝܬ ܠܗ ܐܕܢܐ ܢܫܡܥ ܡܢܐ ܪܘܚܐ ܡܡܠܠ ܠܥܕܬܐ ܀
7“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही: “जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
7ܘܠܡܠܐܟܐ ܕܥܕܬܐ ܕܦܝܠܕܠܦܝܐ ܟܬܘܒ ܗܟܢܐ ܐܡܪ ܩܕܝܫܐ ܫܪܝܪܐ ܗܘ ܕܐܝܬ ܠܗ ܩܠܝܕܐ ܕܕܘܝܕ ܐܝܢܐ ܕܦܬܚ ܘܠܝܬ ܕܐܚܕ ܘܐܚܕ ܘܠܝܬ ܕܦܬܚ ܀
8मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करुन ठेवले आहे. जे कोणीही बंद करु शकणार नाही. मला माहीत आहे की, तू दुर्बळ आहेस, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.
8ܝܕܥ ܐܢܐ ܥܒܕܝܟ ܘܗܐ ܝܗܒܬ ܩܕܡܝܟ ܬܪܥܐ ܦܬܝܚܐ ܐܝܢܐ ܕܠܐ ܐܢܫ ܡܨܐ ܠܡܐܚܕܗ ܡܛܠ ܕܩܠܝܠ ܚܝܠܐ ܐܝܬ ܠܟ ܘܡܠܬܝ ܢܛܪܬ ܘܒܫܡܝ ܠܐ ܟܦܪܬ ܀
9जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वत:ला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीति केली आहे.
9ܘܗܐ ܝܗܒ ܐܢܐ ܡܢ ܟܢܘܫܬܐ ܕܤܛܢܐ ܡܢ ܐܝܠܝܢ ܕܐܡܪܝܢ ܥܠ ܢܦܫܗܘܢ ܕܝܗܘܕܝܐ ܐܢܘܢ ܘܠܐ ܐܝܬܝܗܘܢ ܐܠܐ ܡܕܓܠܝܢ ܗܐ ܐܥܒܕ ܠܗܘܢ ܕܢܐܬܘܢ ܘܢܤܓܕܘܢ ܩܕܡ ܪܓܠܝܟ ܘܢܕܥܘܢ ܕܐܢܐ ܐܚܒܬܟ ܀
10धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हांला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी होईल.
10ܥܠ ܕܢܛܪܬ ܡܠܬܐ ܕܡܤܝܒܪܢܘܬܝ ܘܐܢܐ ܐܛܪܟ ܡܢ ܢܤܝܘܢܐ ܕܥܬܝܕ ܕܢܐܬܐ ܥܠ ܟܠܗ ܬܐܒܝܠ ܕܢܢܤܐ ܠܥܡܘܪܝܗ ܕܐܪܥܐ ܀
11“मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्याला घट्ट धरुन राहा यासाठी की कोणीही तुझा मुगुट घेऊ नये.
11ܐܬܐ ܐܢܐ ܡܚܕܐ ܐܚܘܕ ܗܘ ܡܐ ܕܐܝܬ ܠܟ ܕܠܐ ܐܢܫ ܢܤܒ ܟܠܝܠܟ ܀
12जो विजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येत आहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन.
12ܘܕܙܟܐ ܐܥܒܕܗ ܥܡܘܕܐ ܒܗܝܟܠܐ ܕܐܠܗܐ ܘܠܒܪ ܠܐ ܢܦܘܩ ܬܘܒ ܘܐܟܬܘܒ ܥܠܘܗܝ ܫܡܐ ܕܐܠܗܝ ܘܫܡܐ ܕܡܕܝܢܬܐ ܚܕܬܐ ܐܘܪܫܠܡ ܐܝܕܐ ܕܢܚܬܐ ܡܢ ܐܠܗܝ ܘܫܡܐ ܕܝܠܝ ܚܕܬܐ ܀
13आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
13ܘܕܐܝܬ ܠܗ ܐܕܢܐ ܢܫܡܥ ܡܢܐ ܪܘܚܐ ܡܡܠܠ ܠܥܕܬܐ ܀
14“लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही: “जो आमेन आहे, विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
14ܘܠܡܠܐܟܐ ܕܥܕܬܐ ܕܠܐܝܕܝܩܝܐ ܟܬܘܒ ܗܟܢܐ ܐܡܪ ܐܡܝܢ ܤܗܕܐ ܡܗܝܡܢܐ ܘܫܪܝܪܐ ܘܪܫܝܬܐ ܕܒܪܝܬܗ ܕܐܠܗܐ ܀
15मला तुमची कामे माहीत आहेत तुम्ही थंडही नाही व गरमही नाही. माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी असावे!
15ܝܕܥ ܐܢܐ ܥܒܕܝܟ ܠܐ ܩܪܝܪܐ ܐܢܬ ܘܠܐ ܚܡܝܡܐ ܕܘܠܐ ܗܘܐ ܕܐܘ ܩܪܝܪܐ ܬܗܘܐ ܐܘ ܚܡܝܡܐ ܀
16पण, तुम्ही कोमट असल्याने - मी तुम्हांला तोंडातून (थुंकून) टाकणार आहे.
16ܘܐܝܬܝܟ ܦܫܘܪܐ ܘܠܐ ܩܪܝܪܐ ܘܠܐ ܚܡܝܡܐ ܥܬܝܕ ܐܢܐ ܠܡܬܒܘܬܟ ܡܢ ܦܘܡܝ ܀
17तुम्ही म्हणाता, ‘मी श्रीमंत आहे, मी संपत्ति मिळविली आहे. आणि मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. पण तुम्हाला याची जाणीव होत नाही की, तुम्ही नीच, नराधम, दयनीय, गरीब, आंधळे व ओंगळ आहात.
17ܡܛܠ ܕܐܡܪܬ ܕܥܬܝܪܐ ܐܢܬ ܘܥܬܪܬ ܘܥܠ ܡܕܡ ܠܐ ܤܢܝܩ ܐܢܐ ܘܠܐ ܝܕܥ ܐܢܬ ܕܐܢܬ ܗܘ ܡܚܝܠܐ ܘܕܘܝܐ ܘܡܤܟܢܐ ܘܥܪܛܠܝܐ ܀
18मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घ्या. म्हणजे तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि शुभ्र वस्त्रे विकत घ्या व तुमची लज्जास्पद नग्नता तुम्ही झाका. आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घ्या.
18ܡܠܟ ܐܢܐ ܠܟ ܕܬܙܒܢ ܡܢܝ ܕܗܒܐ ܕܒܚܝܪ ܡܢ ܢܘܪܐ ܕܬܥܬܪ ܘܡܐܢܐ ܚܘܪܐ ܠܡܬܥܛܦܘ ܘܠܐ ܬܬܓܠܐ ܒܗܬܬܐ ܕܥܪܛܠܝܘܬܟ ܘܫܝܦܐ ܟܚܘܠ ܕܬܚܙܐ ܀
19“ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना दटावतो व शिस्त लावतो म्हणून कसोशीचे प्रयत्न करावयास लागा आणि पश्चात्ताप करा.
19ܐܢܐ ܠܐܝܠܝܢ ܕܪܚܡ ܐܢܐ ܡܟܤ ܐܢܐ ܘܪܕܐ ܐܢܐ ܛܢ ܗܟܝܠ ܘܬܘܒ ܀
20मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबोरबर जेवेल.
20ܗܐ ܩܡܬ ܥܠ ܬܪܥܐ ܘܐܩܘܫ ܐܢ ܐܢܫ ܫܡܥ ܒܩܠܝ ܘܢܦܬܚ ܬܪܥܐ ܘܐܥܘܠ ܘܐܚܫܡ ܥܡܗ ܘܗܘ ܥܡܝ ܀
21“जो विजय मिळवील त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन ज्याप्रमाणे मी विजय मिळविला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो.
21ܘܕܙܟܐ ܐܬܠ ܠܗ ܠܡܬܒ ܥܡܝ ܥܠ ܟܘܪܤܝܐ ܕܝܠܝ ܐܝܟܢܐ ܕܐܢܐ ܙܟܝܬ ܘܝܬܒܬ ܥܡ ܐܒܝ ܥܠ ܟܘܪܤܝܐ ܕܝܠܗ ܀
22आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
22ܡܢ ܕܐܝܬ ܠܗ ܐܕܢܐ ܢܫܡܥ ܡܢܐ ܪܘܚܐ ܡܡܠܠ ܠܥܕܬܐ ܀