Marathi

Turkish

1 Samuel

10

1शमुवेलने मग एका खास तेलाची कुपी घेतली आणि शौलच्या मस्तकावर ती ओतली. शौलचे चुंबन घेऊन तो म्हणाला, “परमेश्वराने त्याच्या प्रजेचा नेता म्हणून तुला आभिषिक्त केले (निवडले) आहे. त्यांचा तू अधिपती होशील. भोवतालच्या शत्रूंपासून त्यांचे रक्षण करशील. त्यासाठीच परमेश्वराने तुझा अभिषेक केला आहे हे खरे आहे. याची साक्ष पटवणाऱ्या या खुणा ऐक
1Sonra Samuel yağ kabını alıp yağı Saulun başına döktü. Onu öpüp şöyle dedi: ‹‹RAB seni kendi halkına önder olarak meshetti.
2येथून निघालास की तुला बन्यामीनांच्या हद्दीत सेल्सह येथे राहेलीच्या कबरीजवळ दोन माणसे भेटतील. तुला ती म्हणतील, ‘तुमची गाढवे मिळाली. तेव्हा तुमच्या वडिलांची काळजी मिटली, पण आता ते तुमच्या काळजीत पडले आहेत. आता माझ्या मुलाला कुठे शोधू असे ते म्हणत आहेत.”
2Bugün benden ayrıldıktan sonra Benyamin sınırında, Selsahtaki Rahelin mezarı yanında iki kişiyle karşılaşacaksın. Sana, ‹Aramaya çıktığın eşekler bulundu› diyecekler, ‹Baban eşekleri düşünmekten vazgeçti, oğlum için ne yapsam diye sizin için kaygılanmaya başladı.›
3शमुवेल पुढे म्हणाला, “पुढे गेलास की तुला ताबोरचा एला ओक वृक्ष लागेल. तिथे तुला देवाच्या भक्तीसाठी बेथलकडे निघालेली तीन माणसे भेटतील. त्यातल्या एकाजवळ तीन तान्ही करडं दुसऱ्याजवळ तीन भाकरी आणि तिसऱ्याकडे द्राक्षरसाचा बुधला असेल.
3Oradan daha ilerleyip Tavordaki meşe ağacına varacaksın. Orada biri üç oğlak, biri üç somun ekmek, öbürü de bir tulum şarapla Tanrının huzuruna, Beytele çıkan üç adamla karşılaşacaksın.
4ती माणसे तुझी विचारपूस करतील. त्यांच्याजवळच्या दोन भाकरी ते तुला देतील आणि तू त्या घेशील.
4Seni selamlayıp iki somun ekmek verecekler. Sen de kabul edeceksin.
5मग तू गिबाथ एलोहिम येथे पोचशील. या ठिकाणी पलिष्ट्यांचा किल्ला आहे. या नगरात तू गेल्यावर भक्तीच्या उच्चस्थानाहून खाली येणारे संदेष्टे तुला भेटतील. भविष्य कथन करतील ते चालू असतानाच, परमेश्वराचा संचार झाल्याप्रमाणे ते नृत्य गायनात मशगुल असतील. ते सतार, संबळ, सनई, वीणा ही वाद्ये वाजवत असतील.
5Sonra Filist ordugahının bulunduğu Givat-Elohime varacaksın. Kente girince, önlerinde çenk, tef, kaval ve lir çalanlarla birlikte peygamberlik ederek tapınma yerinden inen bir peygamber topluluğuyla karşılaşacaksın.
6तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तू राहणार नाहीस. अगदी वेगळाच होशील. त्यांच्याबरोबर तूही भविष्यकथन करु लागशील.
6RABbin Ruhu senin üzerine güçlü bir biçimde inecek. Onlarla birlikte peygamberlikte bulunacak ve başka bir kişiliğe bürüneceksin.
7असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.
7Bu belirtiler gerçekleştiğinde, duruma göre gerekeni yap. Çünkü Tanrı seninledir.
8गिलगाल येथे तू माझ्याआधी जा. मग मी तिथे येईन. यज्ञात होमार्पण आणि शांत्यर्पणे करीन. माझी तू सात दिवस वाट पाहा. मग मी तुला भेटेन आणि काय करायचे ते सांगेन.”
8Şimdi benden önce Gilgala git. Yakmalık sunuları sunmak ve esenlik kurbanlarını kesmek için ben de yanına geleceğim. Ancak, ben yanına gelip ne yapacağını bildirene dek yedi gün beklemen gerekecek.››
9शमुवेलला निरोप देऊन शौल जायला निघताच परमेश्वराने त्याचे आयुष्यच बदलून टाकले. सर्व खुणांचा प्रत्यय त्याला त्या दिवशीच आला.
9Saul, Samuelin yanından ayrılmak üzere ona sırtını döner dönmez, Tanrı ona başka bir kişilik verdi. O gün bütün bu belirtiler gerçekleşti.
10शौल आपल्या नोकरासह गिबाथ एलोहिम या टेकडीवर आला. तिथे त्याला इतर संदेष्टे भेटले. परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तो ही इतर संदेष्ट्यां प्रमाणे भविष्य करु लागला.
10Givaya varınca, Saulu bir peygamber topluluğu karşıladı. Tanrının Ruhu güçlü bir biçimde üzerine indi ve Saul onlarla birlikte peygamberlikte bulunmaya başladı.
11त्याला आधीपासून ओळखणाऱ्या लोकांनी हे पाहिले. तेव्हा ते आपापसात याची चर्चा करु लागले. “कीशच्या मुलाला काय झाले? तो ही संदेष्ट्यांपैकीच आहे की काय?” असे म्हणून लागले.
11Onu önceden tanıyanların hepsi, peygamberlerle birlikte peygamberlikte bulunduğunu görünce, birbirlerine, ‹‹Ne oldu Kiş oğluna? Saul da mı peygamber oldu?›› diye sordular.
12तिथे राहणारा एक माणूस म्हणाला, “हो ना! हा यांचा नेता आहे असे दिसते.” तेव्हापासून “शौल संदेष्ट्यांपैकीच आहे की काय” अशी म्हणंच पडली.
12Orada oturanlardan biri, ‹‹Ya onların babası kim?›› dedi. İşte, ‹‹Saul da mı peygamber oldu?›› sözü buradan gelir.
13यानंतर शौल आपल्या घराजवळच्या भक्तीस्थळापाशी पोचला.
13Saul peygamberlikte bulunduktan sonra tapınma yerine çıktı.
14त्याला व त्याच्या नोकराला शौलच्या काकाने इतके दिवस तुम्ही कोठे होतात म्हणून विचारले. शौल म्हणाला, “आम्ही आपली गाढवे शोधायला गेलो होतो. ती मिळाली नाहीत तेव्हा शमुवेलला भेटायला आम्ही गेलो.”
14Amcası, Saul ile hizmetkârına, ‹‹Nerede kaldınız?›› diye sordu. Saul, ‹‹Eşekleri arıyorduk›› diye karşılık verdi, ‹‹Onları bulamayınca, Samuele gittik.››
15तेव्हा काका म्हणाला, “मग काय म्हणाला शमुवेल ते सांग ना!”
15Amcası, ‹‹Samuel sana neler söyledi, lütfen bana da anlat›› dedi.
16शौलने सांगितले, “गाढवांचा शोध लागला आहे असे शमुवेल म्हणाला.” शमुवेलच्या इतर वक्तव्याबद्दल, राज्याबद्दल त्याने काकाला काहीही सांगितले नाही.
16Saul, ‹‹Eşeklerin bulunduğunu bize açıkça bildirdi›› diye yanıtladı. Ama Samuelin krallıkla ilgili sözlerini amcasına açıklamadı.
17शमुवेलने सर्व इस्राएली लोकांना मिस्पा येथे पमरेश्वराजवळ बोलावले.
17Sonra Samuel, İsrail halkını Mispada RAB için bir araya getirip şöyle dedi: ‹‹İsrailin Tanrısı RAB diyor ki, ‹Ben İsraillileri Mısırdan çıkardım. Mısırlıların ve size baskı yapan bütün krallıkların elinden sizi kurtardım.›
18शमुवेल त्यांना तेव्हा म्हणाला, “इस्राएलच्या परमेश्वर देवाचे म्हणणे असे आहे: इस्राएलला मी मिसरमधून बाहेर काढले. मिसर आणि इतर राष्ट्रे यांच्या जाचातून मुक्त केले.
19Ama siz bugün bütün zorluk ve sıkıntılarınızdan sizi kurtaran Tanrınıza sırt çevirdiniz ve, ‹Hayır, bize bir kral ata› dediniz. Şimdi RABbin önünde oymak oymak, boy boy dizilin.››
19सर्व आपत्तीतून तुम्हाला सोडवणाऱ्या परमेश्वराचाच आज तुम्ही त्याग करायला निघालेला आहात. राजा हवा अशी तुमची मागणी आहे. तेव्हा आता आपापल्या वंशांप्रमाणे, घराण्यांसकट परमेश्वरापुढे हजर व्हा.”
20Samuel bütün İsrail oymaklarını bir bir öne çıkardı. Bunlardan Benyamin oymağı kurayla seçildi.
20सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली.
21Sonra Benyamin oymağını boy boy öne çağırdı. Matrinin boyu seçildi. En sonunda da Matri boyundan Kiş oğlu Saul seçildi. Onu aradılarsa da bulamadılar.
21व त्यापैकी प्रत्येक कुळाला क्रमाक्रमाने समोर बोलावले. त्यातून मात्रीच्या कुळाची निवड केली. मग त्यांच्यापैकी प्रत्येकाला समोरुन जायला सांगितले. अशा रीतीने कीशचा मुलगा शौल याची निवड केली. पण लोकांना शौल कुठे दिसेना.
22Yine RABbe, ‹‹O daha buraya gelmedi mi?›› diye sordular. RAB de, ‹‹O burada, eşyaların arasında saklanıyor›› dedi.
22त्यांनी परमेश्वराला विचारले, “शौल इथे आला आहे का?” परमेश्वर म्हणाला, “शौल कोठारामागे लपून बसला आहे.”
23Bunun üzerine koşup Saulu oradan getirdiler. Saul halkın arasına geldi. Boyu hepsinden bir baş uzundu.
23लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून बाहेर आणले. तो सर्वांच्या घोळक्यात उभा राहिला. सगळ्यांपेक्षा तो उंच होता.
24Samuel halka, ‹‹RABbin seçtiği adamı görüyor musunuz?›› dedi, ‹‹Bütün halkın arasında bir benzeri yok.›› Bunun üzerine halk, ‹‹Yaşasın kral!›› diye bağırdı.
24शमुवेल तेव्हा सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “परमेश्वराने निवडलेला माणूस पाहा. याच्यासारखा तुमच्यात कोणीही नाही.” तेव्हा लोकांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयजयकार केला.
25Samuel krallığın ilkelerini halka açıkladı. Bunları kitap haline getirip RABbin önüne koydu. Sonra herkesi evine gönderdi.
25शमुवेलने राज्याचे सर्व नियम लोकांना समजावून सांगितले. राजनीतीचा ग्रंथ लिहून परमेश्वरापुढे ठेवला आणि लोकांना घरोघरी परतायला सागितले.
26Saul da Givaya, kendi evine döndü. Tanrının isteklendirdiği yiğitler ona eşlik ettiler.
26शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले.
27Ama bazı kötü kişiler, ‹‹O bizi nasıl kurtarabilir?›› diyerek Saul'u küçümsediler ve ona armağan vermediler. Saul ise buna aldırmadı.
27पण काही कुरापती काढणारे मात्र म्हणालेच, “हा काय आमचे रक्षण करणार?” शौलवर टीका करत त्यांनी नजराणेही आणले नाहीत. पण शौल काही बोलला नाही. अम्मोन्यांचा राजा नाहाश गादी आणि रुबेनी लोकांचा छळ करत होता. त्याने प्रत्येक इस्राएल माणसाचा उजवा डोळा काढला. कोणालाही त्यांच्या मदतीला जाऊ दिले नाही. यार्देन नदीच्या पुर्वेकडील एकाही इस्राएली पुरुषाची यातून सुटका झाली नाही. पण सात हजार इस्राएली माणसे मात्र अम्मोन्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली आणि याबेश गिलाद येथे आली