Marathi

Turkish

1 Samuel

3

1लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मगन्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.
1Genç Samuel Elinin yönetimi altında RABbe hizmet ediyordu. O günlerde RABbin sözü seyrek geliyordu; görümler de azalmıştı.
2एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता.
2Bir gece Eli yatağında uyuyordu. Gözleri öyle zayıflamıştı ki, güçlükle görebiliyordu.
3परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता.
3Samuel ise RABbin Tapınağında, Tanrının Sandığının bulunduğu yerde uyuyordu. Tanrının kandili daha sönmemişti.
4तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे”
4RAB Samuele seslendi. Samuel, ‹‹Buradayım›› diye karşılık verdi.
5एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.” पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.” शमुवेल झोपायला गेला.
5Ardından Eliye koşup, ‹‹Beni çağırdın, işte buradayım›› dedi. Ama Eli, ‹‹Ben çağırmadım, dön yat›› diye karşılık verdi. Samuel de dönüp yattı.
6पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले. एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”
6RAB yine, ‹‹Samuel!›› diye seslendi. Samuel kalkıp Eliye gitti ve, ‹‹İşte, buradayım, beni çağırdın›› dedi. Eli, ‹‹Çağırmadım, oğlum›› diye karşılık verdi, ‹‹Dön yat.››
7परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.
7Samuel RABbi daha tanımıyordu; RABbin sözü henüz ona açıklanmamıştı.
8परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले. परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले.
8RAB yine üçüncü kez Samuele seslendi. Samuel kalkıp Eliye gitti. ‹‹İşte buradayım, beni çağırdın›› dedi. O zaman Eli genç Samuele RABbin seslendiğini anladı.
9तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.” तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला.
9Bunun üzerine Samuele, ‹‹Git yat›› dedi, ‹‹Sana yine seslenirse, ‹Konuş, ya RAB, kulun dinliyor› dersin.›› Samuel gidip yerine yattı.
10परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली. शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”
10RAB gelip orada durdu ve önceki gibi, ‹‹Samuel, Samuel!›› diye seslendi. Samuel, ‹‹Konuş, kulun dinliyor›› diye yanıtladı.
11तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल.
11RAB Samuele şöyle dedi: ‹‹Ben İsrailde her duyanı şaşkına çevirecek bir şey yapmak üzereyim.
12एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे.
12O gün Elinin ailesine karşı söylediğim her şeyi baştan sona dek yerine getireceğim.
13त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे.
13Çünkü farkında olduğu günahtan ötürü ailesini sonsuza dek yargılayacağımı Eliye bildirdim. Oğulları Tanrıya saygısızlık ettiler. Eli de onlara engel olmadı.
14आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”
14Bu nedenle, ‹Elinin ailesinin günahı hiçbir zaman kurban ya da sunuyla bile bağışlanmayacaktır› diyerek Elinin ailesi hakkında ant içtim.›› ‹‹Tanrıya saygısızlık ettiler››, Masoretik metin ‹‹Başlarına lanet getirdiler››.
15रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
15Samuel sabaha kadar yattı, sonra RABbin Tapınağının kapılarını açtı. Gördüğü görümü Eliye söylemekten çekiniyordu.
16पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले. तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.
16Ama Eli ona, ‹‹Oğlum Samuel!›› diye seslendi. Samuel, ‹‹İşte buradayım›› diye yanıtladı.
17एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”
17Eli, ‹‹RAB sana neler söyledi?›› diye sordu, ‹‹Lütfen benden gizleme. Sana söylediklerinden birini bile benden gizlersen, Tanrı sana aynısını, hatta daha kötüsünü yapsın!››
18तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले. एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”
18Bunun üzerine Samuel hiçbir şey gizlemeden ona her şeyi anlattı. Eli de, ‹‹O RABdir, gözünde iyi olanı yapsın›› dedi.
19शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही.
19Samuel büyürken RAB onunla birlikteydi. RAB ona verdiği sözlerin hiçbirinin boşa çıkmasına izin vermedi.
20परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली.
20Samuelin RABbin bir peygamberi olarak onaylandığını Dandan Beer-Şevaya kadar bütün İsrail anladı.
21शिलो येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.
21RAB Şilo'da görünmeyi sürdürdü. Orada sözü aracılığıyla kendisini Samuel'e tanıttı.