Marathi

Turkish

Exodus

13

1मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
1RAB Musaya, ‹‹Bütün ilk doğanları bana adayın›› dedi, ‹‹İsrailliler arasında insan olsun, hayvan olsun her rahmin ilk ürünü bana aittir.››
2“इस्राएलाचा प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आलेला मुलगा, त्याच प्रमाणे पशूतला प्रथम जन्मलेला नर ह्यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत.”
3Musa halka, ‹‹Mısırdan, köle olduğunuz ülkeden çıktığınız bugünü anımsayın›› dedi, ‹‹Çünkü RAB güçlü eliyle sizi oradan çıkardı. Mayalı hiçbir şey yenmeyecek.
3मोशे लोकांना म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु ह्या दिवशी परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने तुम्हांस गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
4Bugün Aviv ayında buradan ayrılıyorsunuz.
4आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.
5RAB sizi Kenan, Hitit, Amor, Hiv ve Yevus topraklarına, atalarınıza vereceğine ant içtiği süt ve bal akan ülkeye götürdüğü zaman bu ay şu törelere uyacaksınız:
5परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी विशेष करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी या लोकांचा देश मी तुम्हाला देईन; त्यामुळे त्या देशात नेल्यानंतर तुम्ही या दिवसाची आठवण ठेवलीच पाहिजे; तुम्ही प्रत्येक वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या ह्या दिवशी परमेश्वराची उपासना करण्यासाठी हा सण पाळला पाहिजे.
6Yedi gün mayasız ekmek yiyecek, yedinci gün RABbe bayram yapacaksınız.
6“या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी मोठी मेजवानी करून तुम्ही हा सण पाळावा;
7O yedi gün içinde yalnız mayasız ekmek yiyeceksiniz. Aranızda ve ülkenizin hiçbir yerinde mayalı bir şey görülmeyecek.
7ह्या सात दिवसात तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठे ही खमीर घातलेली भाकर नसावी.
8O gün oğullarınıza, ‹Mısırdan çıktığımızda RABbin bizim için yaptıklarından dolayı bunları yapıyoruz› diye anlatacaksınız.
8ह्या दिवशी परमेश्वराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत’ असे तुम्ही आपल्या मुलाबाळांना सांगावे.
9Bu elinizde bir belirti ve alnınızda bir anma işareti olacak; öyle ki, RABbin yasası hep ağzınızda olsun. Çünkü RAB güçlü eliyle sizi Mısırdan çıkardı.
9“हा सणाचा दिवस म्हणजे जणू काय तुम्हाला आठवण देण्याकरिता तुमच्या हाताला बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल, तो तुम्हाला डोव्व्यांच्या दरम्यान चिन्ह असा होईल. त्याच्यामुळे तुम्हाला परमेश्वराच्या शिकवणुकीची आठवण होईल. तसेच परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने तुम्हाला मिसरमधून बाहेर आणले याची आठवण करण्यास तो तुम्हाला मदत करील.
10Siz de her yıl belirlenen tarihte bu kuralı uygulamalısınız.
10म्हणून प्रत्येक वर्षी योग्य वेळी म्हणजे ह्या सणाच्यावेळी ह्या दिवसाची तुम्ही आठवण ठेवा.
11‹‹RAB size ve atalarınıza ant içerek söz verdiği gibi sizi Kenan topraklarına getirecektir. Orayı size verdiği zaman,
11“परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला आता कनानी लोक राहात असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुम्हाला देईल. तो दिल्यानंतर
12ilk doğan erkek çocuklarınızın ve hayvanlarınızın hepsini RABbe adayacaksınız. Çünkü bunlar RABbe aittir.
12तुम्ही परमेश्वराला तुमचा प्रथम जन्मलेला मुलगा व पशूंमधील प्रथम जन्मलेला नर देण्याची आठवण ठेवलीच पाहिजे.
13İlk doğan her sıpanın bedelini bir kuzuyla ödeyin. Bedelini ödemezseniz, boynunu kırın. Bütün ilk doğan erkek çocuklarınızın bedelini ödemelisiniz.
13गाढवाच्या प्रथम जन्मलेल्या शिंगराला एक कोकरू देऊन परमेश्वराकडून सोडवून घेता येईल; परंतु तुम्हाला ते शिगंरु तसे सोडवायचे नसेल तर त्याचा वध करावा. तो परमेश्वराला यज्ञ होईल तुम्ही त्याची मान मोडावी प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा सुध्दा मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
14‹‹İlerde oğullarınız size, ‹Bunun anlamı ne?› diye sorduklarında, ‹RAB bizi güçlü eliyle Mısırdan, köle olduğumuz ülkeden çıkardı› diye yanıtlarsınız,
14“पुढील काळीं तुमची मुले बाळे विचारतील की तुम्ही असे का करिता म्हणजे हा सण का पाळिता? ते म्हणतील, ‘या सर्वाचा अर्थ काय?’ तेव्हा तुम्ही उत्तर द्यावे, ‘आम्ही मिसरमध्ये गुलामगिरीत होतो परंतु परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसरमधून सोडवून येथे आणले.
15‹Firavun bizi salıvermemekte diretince, RAB Mısırda insanların ve hayvanların bütün ilk doğanlarını öldürdü. İşte bunun için hayvanların ilk doğan erkek yavrularını RABbe kurban ediyoruz. İlk doğan erkek çocuklarımızın bedelini ise bir hayvanla ödüyoruz.›
15मिसरचा राजा फारो ह्याने आम्हांस मिसर सोडून जाऊ देण्याचे नाकारले; परंतु परमेश्वराने मिसरमधील प्रथम जन्मलेली मुले व पशुमधील प्रथम जन्मलेले नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही पशूमधील प्रथम जन्मलेले नर परमेश्वराला देऊन टाकतो आणि प्रथम जन्मलेली मुले आम्ही परमेश्वराकडून सोडवून घेतो.’
16Bu uygulama elinizde bir belirti ve alnınızda bir anma işareti olacak; RABbin bizi Mısırdan güçlü eliyle çıkardığını anımsatacak.››
16हा सण म्हणजे जणू काय आठवणीसाठी हाताला बांधलेल्या दोरीच्या खुणे सारखा व डोव्व्यांच्या दरम्यानच्या कपाळपट्टी सारखा आहे. परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले त्याची आठवण देण्यास हा दिवस मदत करतो.”
17Firavun İsraillileri salıverdiğinde, Filist yöresi yakın olmasına karşın, Tanrı onları oradan götürmedi. Çünkü, ‹‹Halk savaşla karşılaşınca, düşüncelerini değiştirip Mısıra geri dönebilir›› diye düşündü.
17फारोने इस्राएल लोकांना मिसर सोडून जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांना पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही; कारण परमेश्वर म्हणाला, “त्यांना त्यातून जाताना लढावे लागेल आणि मग त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलून ते लोक माघारे वळून मिसर देशाला परत जातील.”
18Halkı çöl yolundan Kızıldenize doğru dolaştırdı. İsrailliler Mısırdan silahlı çıkmışlardı.
18म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरमधून सशस्त्र होऊन निघाले होते.
19Musa Yusufun kemiklerini yanına almıştı. Çünkü Yusuf İsrailin oğullarına, ‹‹Tanrı kesinlikle size yardım edecek, kemiklerimi buradan götüreceksiniz›› diye sıkı sıkı ant içirmişti.
19मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या (कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपनाकरिता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “परमेश्वर जेव्हा तुम्हाला मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”)
20Sukkottan ayrılıp çöl kenarında, Etamda konakladılar.
20इस्राएल लोकांनी सुक्कोथ हे ठिकाण सोडले व रानाजवळील एथाम या ठिकाणी त्यांनी तळ दिला.
21Gece gündüz ilerlemeleri için, RAB gündüzün bir bulut sütunu içinde yol göstererek, geceleyin bir ateş sütunu içinde ışık vererek onlara öncülük ediyordu.
21दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे.
22Gündüz bulut sütunu, gece ateş sütunu halkın önünden eksik olmadı.
22दिवसा तो उंच ढग व रात्री तो अग्निस्तंभ सतत त्या लोकांबरोबर असत.