Marathi

Turkish

Exodus

24

1देवाने मोशेला सांगितले, “तू, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर येऊन दुरुनच माझी उपासना करा;
1RAB Musaya, ‹‹Sen, Harun, Nadav, Avihu ve İsrail ileri gelenlerinden yetmiş kişi bana gelin›› dedi, ‹‹Bana uzaktan tapın.
2मग मोशे एकटाच परमेश्वरा जवळ येईल; इतरांनी परमेश्वराजवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.”
2Yalnız sen bana yaklaşacaksın. Ötekiler yaklaşmamalı. Halk seninle dağa çıkmamalı.››
3मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एकमुखाने म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.”
3Musa gidip RABbin bütün buyruklarını, ilkelerini halka anlattı. Herkes bir ağızdan, ‹‹RABbin her söylediğini yapacağız›› diye karşılık verdi.
4तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले.
4Musa RABbin bütün buyruklarını yazdı. Sabah erkenden kalkıp dağın eteğinde bir sunak kurdu, İsrailin on iki oymağını simgeleyen on iki taş sütun dikti.
5मग मोशेने काही तरुणांना यज्ञार्पणे वाहाण्यासाठी पाठवले व त्यांनी परमेश्वराला बैलांची होमार्पणे व शांत्यार्पणे वाहिली.
5Sonra İsrailli gençleri gönderdi. Onlar da RABbe yakmalık sunular sundular, esenlik kurbanları olarak boğalar kestiler.
6मोशेने त्या अर्पणातून अर्धे रक्त राखून काही भांड्यात ठेवले आणि दुसरे अर्धे रक्त त्याने वेदीवर ओतले.
6Musa kanın yarısını leğenlere doldurdu, öbür yarısını sunağın üzerine döktü.
7मग मोशेने गुंडाळी पत्रात लिहिलेला विशेष करार सर्वानी ऐकावा म्हणून वाचून दाखविला आणि मग लोक म्हणाले, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आम्ही ऐकल्या आहेत; त्या आम्ही पाळू असे आम्ही कबूल करतो.”
7Sonra antlaşma kitabını alıp halka okudu. Halk, ‹‹RABbin her söylediğini yapacağız, Onu dinleyeceğiz›› dedi.
8मग मोशेने भांड्यांतील अर्पणाचे रक्त लोकावर शिंपडले, तो म्हणाला, “परमेश्वराने तुमच्याशी विशेष करार केला आहे असे हे रक्त दर्शीविते; त्याचे स्पष्टीकरण देवाने दिलेल्या नियमांमध्ये आहे.”
8Musa leğenlerdeki kanı halkın üzerine serpti ve, ‹‹Bütün bu sözler uyarınca, RABbin sizinle yaptığı antlaşmanın kanı budur›› dedi.
9नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.
9Sonra Musa, Harun, Nadav, Avihu ve İsrail ileri gelenlerinden yetmiş kişi dağa çıkarak
10तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता!
10İsrailin Tanrısını gördüler. Tanrının ayakları altında laciverttaşını andıran bir döşeme vardı. Gök gibi duruydu.
11इस्राएल मधील सगव्व्या वडिलधाऱ्या माणसांनी देवाला पाहिले परंतु त्याने त्यांचा नाश केला नाही. मग त्यांनी तेथे एकत्र खाणेपिणे केले.”
11Tanrı İsrail soylularına zarar vermedi. Tanrıyı gördüler, sonra yiyip içtiler.
12परमेश्वर मोशेला म्हणाला, “पर्वतावर मला भेटावयास ये; मी दोन दगडी पाट्यांवर इस्राएल लोकांसाठी नियम व आज्ञा लिहिलेल्या आहेत; त्या मी तुला देतो.”
12RAB Musaya, ‹‹Dağa, yanıma gel›› dedi, ‹‹Burada bekle, halkın öğrenmesi için üzerine yasalarla buyrukları yazdığım taş levhaları sana vereceğim.››
13तेव्हा मोशे व त्याचा मदतनीस यहोशवा देवाच्या पर्वतावर चढून गेले.
13Musayla yardımcısı Yeşu hazırlandılar. Musa Tanrı Dağına çıkarken,
14मोशे इस्राएलच्या वडीलधाऱ्या माणसांना म्हणाला, “तुम्ही येथे आम्हासाठी थांबा, मी परत येईपर्यत अहरोन व हूर हे तुम्हावर अधिकारी म्हणून राहतील; कोणाचे काही प्रकरण असेल तर त्याने त्यांच्याकडे जावे.”
14İsrail ileri gelenlerine, ‹‹Geri dönünceye kadar bizi burada bekleyin›› dedi, ‹‹Harunla Hur aranızda; kimin sorunu olursa onlara başvursun.››
15मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला;
15Musa dağa çıkınca, bulut dağı kapladı.
16परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वर मोशेबरोबर ढगातून बोलला.
16RABbin görkemi Sina Dağının üzerine indi. Bulut dağı altı gün örttü. Yedinci gün RAB bulutun içinden Musaya seslendi.
17इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते.
17RABbin görkemi İsraillilere dağın doruğunda yakıcı bir ateş gibi görünüyordu.
18मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
18Musa bulutun içinden dağa çıktı. Kırk gün kırk gece dağda kaldı.