Marathi

Turkish

Genesis

3

1परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”
1RAB Tanrının yarattığı yabanıl hayvanların en kurnazı yılandı. Yılan kadına, ‹‹Tanrı gerçekten, ‹Bahçedeki ağaçların hiçbirinin meyvesini yemeyin› dedi mi?›› diye sordu.
2स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो.
2Kadın, ‹‹Bahçedeki ağaçların meyvelerinden yiyebiliriz›› diye yanıtladı,
3परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.”
3‹‹Ama Tanrı, ‹Bahçenin ortasındaki ağacın meyvesini yemeyin, ona dokunmayın; yoksa ölürsünüz› dedi.››
4परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही.
4Yılan, ‹‹Kesinlikle ölmezsiniz›› dedi,
5कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”
5‹‹Çünkü Tanrı biliyor ki, o ağacın meyvesini yediğinizde gözleriniz açılacak, iyiyle kötüyü bilerek Tanrı gibi olacaksınız.››
6स्त्रीने पाहिले की ते झाड दिसण्यात सुंदर, त्याचे फळ खाण्यास चांगले व शहाणपण देणारे आहे म्हणून तिने त्या झाडाचे फळ तोडून घेतले व खाल्ले. तिचा नवरा तिच्याबरोबर तेथे होता; तेव्हा तिने त्या फळातून त्याला थोडे दिले व त्याने ते खाल्ले.
6Kadın ağacın güzel, meyvesinin yemek için uygun ve bilgelik kazanmak için çekici olduğunu gördü. Meyveyi koparıp yedi. Yanındaki kocasına verdi, o da yedi.
7तेव्हा त्या दोघांचे डोळे उघडले व आपण नग्न आहो असे त्यांस समजले; तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपासाठी काही वस्त्रे तयार केली व ती घातली.
7İkisinin de gözleri açıldı. Çıplak olduklarını anladılar. Bu yüzden incir yaprakları dikip kendilerine önlük yaptılar.
8संध्याकाळी परमेश्वर बागेत फिरत होता. त्यावेळी आदामाने आणि त्याच्या बायकोने परमेश्वराचा आवाज ऐकला. आणि त्याच्या नजरेस पडू नये म्हणून ती दोघे परमेश्वरापासून बागेच्या झाडात लपली.
8Derken, günün serinliğinde bahçede yürüyen RAB Tanrının sesini duydular. Ondan kaçıp ağaçların arasına gizlendiler.
9तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारुन म्हटले, “तू कोठे आहेस?”
9RAB Tanrı Ademe, ‹‹Neredesin?›› diye seslendi.
10तो म्हणाला, “बागेत मी तुझ्या चालण्याचा आवाज ऐकला व मला भीती वाटली कारण मी नग्न होतो आणि म्हणून मी लपलो.”
10Adem, ‹‹Bahçede sesini duyunca korktum. Çünkü çıplaktım, bu yüzden gizlendim›› dedi.
11परमेश्वर त्याला म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या विशेष झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”
11RAB Tanrı, ‹‹Çıplak olduğunu sana kim söyledi?›› diye sordu, ‹‹Sana meyvesini yeme dediğim ağaçtan mı yedin?››
12आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.”
12Adem, ‹‹Yanıma koyduğun kadın ağacın meyvesini bana verdi, ben de yedim›› diye yanıtladı.
13मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?” ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
13RAB Tanrı kadına, ‹‹Nedir bu yaptığın?›› diye sordu. Kadın, ‹‹Yılan beni aldattı, o yüzden yedim›› diye karşılık verdi.
14म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला, “तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील
14Bunun üzerine RAB Tanrı yılana,‹‹Bu yaptığından ötürüBütün evcil ve yabanıl hayvanlarınEn lanetlisi sen olacaksın›› dedi,‹‹Karnının üzerinde sürünecek,Yaşamın boyunca toprak yiyeceksin.
15तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
15Seninle kadını, onun soyuyla senin soyunuBirbirinize düşman edeceğim.Onun soyu senin başını ezecek,Sen onun topuğuna saldıracaksın.››
16नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला, “तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.”
16RAB Tanrı kadına,‹‹Çocuk doğururken sanaÇok acı çektireceğim›› dedi,‹‹Ağrı çekerek doğum yapacaksın.Kocana istek duyacaksın,Seni o yönetecek.››
17नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला, “त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;
17RAB Tanrı Ademe,‹‹Karının sözünü dinlediğin ve sana,Meyvesini yeme dediğim ağaçtan yediğin içinToprak senin yüzünden lanetlendi›› dedi,‹‹Yaşam boyu emek vermeden yiyecek bulamayacaksın.
18जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील.
18Toprak sana diken ve çalı verecek,Yaban otu yiyeceksin.
19तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील.”
19Toprağa dönünceye dekEkmeğini alın teri dökerek kazanacaksın.Çünkü topraksın, topraktan yaratıldınVe yine toprağa döneceksin.››
20आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
20Adem karısına Havvafç adını verdi. Çünkü o bütün insanlarınfç annesiydi. gelen aynı sözcükten türemiştir.
21परमेश्वराने आदाम व त्याची बायको हव्वा यांच्यासाठी जनावराच्या चामड्यांची वस्त्रे केली; आणि ती त्यांना घातली.
21RAB Tanrı Ademle karısı için deriden giysiler yaptı, onları giydirdi.
22परमेश्वर म्हणाला, “पाहा, मनुष्य आपल्या सारखा झाला आहे. त्याला बरे व वाईट समजते. तर आता कदचित जीवनांच्या झाडावरुन तो फळ घेईल आणि जर का तो ते फळ खाईल तर मग सदासर्वकाळ तो जीवंत राहील.”
22Sonra, ‹‹Adem iyiyle kötüyü bilmekle bizlerden biri gibi oldu›› dedi, ‹‹Artık yaşam ağacına uzanıp meyve almasına, yiyip ölümsüz olmasına izin verilmemeli.››
23तेव्हा परमेश्वराने मनुष्याला ज्या जमिनीतून उत्पन्न केले होते तिची मशागत करण्यासाठी एदेन बागेतून बाहेर घालवून दिले.
23Böylece RAB Tanrı, yaratılmış olduğu toprağı işlemek üzere Ademi Aden bahçesinden çıkardı.
24परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.
24Onu kovdu. Yaşam ağacının yolunu denetlemek için de Aden bahçesinin doğusuna Keruvlar ve her yana dönen alevli bir kılıç yerleştirdi.