Marathi

Turkish

Genesis

39

1योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गारद्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटीफर यास विकले.
1İsmaililer Yusufu Mısıra götürmüştü. Firavunun görevlisi, muhafız birliği komutanı Mısırlı Potifar onu İsmaililerden satın almıştı.
2परंतु परमेश्वराने योसेफाला सहाय्य केले म्हणून तो यशस्वी पुरुष झाला. योसेफ आपला स्वामी मिसरचा रहिवासी पोटीफर याच्यास घरी राहात असे.
2RAB Yusufla birlikteydi ve onu başarılı kılıyordu. Yusuf Mısırlı efendisinin evinde kalıyordu.
3परमेश्वर योसेफा बरोबर आहे आणि म्हणून त्याच्या हर एक कामात तो त्याला यश देतो हे पोटीफरला दिसून आले.
3Efendisi RABbin Yusufla birlikte olduğunu, yaptığı her işte onu başarılı kıldığını gördü.
4म्हणून पोटीफर योसेफावर फार खुष होता. त्याने योसेफाला आपल्या घरचा कारभार पाहाण्यात मदत करण्यास सांगितले.
4Yusuftan hoşnut kalarak onu özel hizmetine aldı. Evinin ve sahip olduğu her şeyin sorumluluğunu ona verdi.
5तेव्हा पोटीफराच्या सर्व कारभाराचा अधिकारी नेमल्यावर परमेश्वराने योसेफामुळे पोटीफराचे घरदार, शेतीबाडी इत्यादी त्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेस आशीर्वाद दिला.
5Yusufu evinin ve sahip olduğu her şeyin sorumlusu atadığı andan itibaren RAB Yusuf sayesinde Potifarın evini kutsadı. Evini, tarlasını, kendisine ait her şeyi bereketli kıldı.
6याप्रमाणे पोटीफराने आपल्या घरादाराचा सर्व कारभार योसेफाच्या हवाली केला; म्हणून पोटीफर फक्त पुढ्यात वाढलेले भोजन घेई, त्या पलीकडे कशाचीही जबाबदारी त्याच्यावर नव्हती. योसेफ फार देखणा व बांधेसूद तरुण होता.
6Potifar sahip olduğu her şeyin sorumluluğunu Yusufa verdi; yediği yemek dışında hiçbir şeyle ilgilenmedi. Yusuf güzel yapılı, yakışıklıydı.
7काही काळानंतर पोटीफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणली, “माझ्याबरोबर नीज”
7Bir süre sonra efendisinin karısı ona göz koyarak, ‹‹Benimle yat›› dedi.
8परंतु तसे करण्यास योसेफाने तिला नकार दिला. तो म्हणाला, “पाहा, या घराच्या सर्व कारभाराबद्दल माझ्या स्वामीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हा खेरीज येथील सर्व गोष्टी त्याने माझ्या ताब्यात देऊन त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
8Ama Yusuf reddetti. ‹‹Ben burada olduğum için efendim evdeki hiçbir şeyle ilgilenme gereğini duymuyor›› dedi, ‹‹Sahip olduğu her şeyin yönetimini bana verdi.
9माझ्या स्वामीने मला या घरात जवळ जवळ त्याच्या समान मोठपणा दिला आहे; असे असताना अशा उदार स्वामीच्या बायकोपाशी निजणे मला योग्य नाही. ते चुकीचे आहे; ते परमेश्वराच्या विरुद्ध घोर पाप आहे!”
9Bu evde ben de onun kadar yetkiliyim. Senin dışında hiçbir şeyi benden esirgemedi. Sen onun karısısın. Nasıl böyle bir kötülük yapar, Tanrıya karşı günah işlerim?››
10पोटीफराची बायको दररोज योसफाबरोबर बोलत असे परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास स्पष्ट पणे नकार दिला.
10Potifarın karısı her gün kendisiyle yatması ya da birlikte olması için direttiyse de, Yusuf onun isteğini kabul etmedi.
11एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरिता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते.
11Bir gün Yusuf olağan işlerini yapmak üzere eve gitti. İçerde ev halkından hiç kimse yoktu.
12अशावेळी त्याच्या स्वामीच्या बायकोने त्याचे वस्त्र धरुन त्याला म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु योसेफ ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.
12Potifarın karısı Yusufun giysisini tutarak, ‹‹Benimle yat›› dedi. Ama Yusuf giysisini onun elinde bırakıp evden dışarı kaçtı.
13तेव्हा योसेफ आपले वस्त्र आपल्या हाती सोडून पळून गेला हे तिने पाहिले. खोटे बोलून या घटनेचा अर्थ उलट करायचा असे तिने ठरवले.
13Kadın Yusufun giysisini bırakıp kaçtığını görünce,
14आणि तिने आरडा ओरडा करुन बाहेरील माणसांना बोलावले. ती म्हणाली, “पाहा, हा इब्री तरुण गुलाम आमच्या घरच्या माणसांची अब्रू घेण्यासाठी येथे आणून ठेवला आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठयाने आरडा ओरडा केला;
14uşaklarını çağırdı. ‹‹Bakın şuna!›› dedi, ‹‹Kocamın getirdiği bu İbrani bizi rezil etti. Yanıma geldi, benimle yatmak istedi. Ben de bağırdım.
15त्यामुळे घाबरुन हे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळून गेला.”
15Bağırdığımı duyunca giysisini yanımda bırakıp dışarı kaçtı.››
16तेव्हा तिने आपला नवरा, योसेफाचा स्वामी घरी येईपर्यंत ते वस्त्र आपल्याजवळ सांभाळून ठेवले.
16Efendisi eve gelinceye kadar Yusufun giysisini yanında alıkoydu.
17आणि आपला नवरा घरी आल्यावर तिने त्याला तीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री तरुण गुलाम घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
17Ona da aynı şeyleri anlattı: ‹‹Buraya getirdiğin İbrani köle yanıma gelip beni aşağılamak istedi.
18परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी आरडा ओरडा केला म्हणून तो घाबरून आपले वस्त्र टाकून पळून गेला;”
18Ama ben bağırınca giysisini yanımda bırakıp kaçtı.››
19आपल्या बायकोचे बोलणे एकल्यावर योसेफाच्या स्वामीचा राग खूप भडकला.
19Karısının, ‹‹Kölen bana böyle yaptı›› diyerek anlattıklarını duyunca, Yusufun efendisinin öfkesi tepesine çıktı.
20राजाच्या शत्रूंना डांबण्यासाठी एक तुरुंग होता. तेव्हा पोटीफराने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.
20Yusufu yakalayıp zindana, kralın tutsaklarının bağlı olduğu yere attı. Ama Yusuf zindandayken
21परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता; आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली; काही काळानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास योसेफ आवडूं लागला.
21RAB onunla birlikteydi. Ona iyilik etti. Zindancıbaşı Yusuftan hoşnut kaldı.
22त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले योसेफ; त्यांचा प्रमुख होता तरी पण तोही त्यांच्या सारखेच काम करी.
22Bütün tutsakların yönetimini ona verdi. Zindanda olup biten her şeyden Yusuf sorumluydu.
23तुरुंगाच्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व गोष्टीसाठी योसेफावर विश्वास ठेवला; परमेश्वर योसेफाबरोबर होता म्हणून हे सर्व काही झाले. योसेफ जे काही करी त्यात परमेश्वर त्याला यश देई.
23Zindancıbaşı Yusuf'un sorumlu olduğu işlerle hiç ilgilenmezdi. Çünkü RAB Yusuf'la birlikteydi ve yaptığı her işte onu başarılı kılıyordu.