1दोन वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले;ते असे की तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
1Tam iki yıl sonra firavun bir düş gördü: Nil Irmağının kıyısında duruyordu.
2तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या.
2Irmaktan güzel ve semiz yedi inek çıktı. Sazlar arasında otlamaya başladılar.
3त्यानंतर आणखी सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईच्या बाजूला उभ्या राहिल्या.
3Sonra yedi çirkin ve cılız inek çıktı. Irmağın kıyısında öbür ineklerin yanında durdular.
4आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ठ गाईना खाऊन टाकले. त्या नंतर फारो राजा जागा झाला.
4Çirkin ve cılız inekler güzel ve semiz yedi ineği yiyince, firavun uyandı.
5मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले; त्यात त्याने पाहिले की एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.
5Yine uykuya daldı, bu kez başka bir düş gördü: Bir sapta yedi güzel ve dolgun başak bitti.
6त्या नंतर त्या ताटाला सात खुरटलेली व करपलेली अशी सात कणसे आली.
6Sonra, cılız ve doğu rüzgarıyla kavrulmuş yedi başak daha bitti.
7नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली; तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले.
7Cılız başaklar, yedi güzel ve dolgun başağı yuttular. Firavun uyandı, düş gördüğünü anladı.
8दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.
8Sabah uyandığında kaygılıydı. Bütün Mısırlı büyücüleri, bilgeleri çağırttı. Onlara gördüğü düşleri anlattı. Ama hiçbiri firavunun düşlerini yorumlayamadı.
9तेव्हा प्यालेबरदाराला योसेफाची आठवण आली. तो फारोस म्हणाला, “माझ्या बाबतीत जे घडले त्याची मला आठवण येत आहे;
9Bu arada baş saki firavuna, ‹‹Bugün suçumu itiraf etmeliyim›› dedi,
10आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस तुरुंगात टाकले होते.
10‹‹Kullarına -bana ve fırıncıbaşına- öfkelenince bizi zindana, muhafız birliği komutanının evine kapattın.
11तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री आम्हा दोघांना स्वप्ने पडली. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा होता.
11Bir gece ikimiz de düş gördük. Düşlerimiz farklı anlamlar taşıyordu.
12तेथे कोणी इब्री तरुण आमच्या बरोबर कैदेत होता. तो गारदद्यांच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला.
12Orada bizimle birlikte muhafız birliği komutanının kölesi İbrani bir genç vardı. Gördüğümüz düşleri ona anlattık. Bize bir bir yorumladı.
131आणि त्याने सांगितलेला अर्थ खरा ठरला. तो म्हणाला की माझी सुटका होईल व मला पूर्वीप्रमाणे माझ्या कामावर पुन्हा घेतले जाईल आणि अगदी त्याप्रमाणे खरेच घडून आले; आणि तो म्हणाला की आचारी मरेल आणि त्याप्रमाणे तेही खरे झाले.”
13Her şey onun yorumladığı gibi çıktı: Ben görevime döndüm, fırıncıbaşıysa asıldı.››
14मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाल ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करुन व स्वच्छ कपडे बदलून फारोपुढे येऊन उभा राहिला.
14Firavun Yusufu çağırttı. Hemen onu zindandan çıkardılar. Yusuf tıraş olup giysilerini değiştirdikten sonra firavunun huzuruna çıktı.
15मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
15Firavun Yusufa, ‹‹Bir düş gördüm›› dedi, ‹‹Ama kimse yorumlayamadı. Duyduğun her düşü yorumlayabildiğini işittim.››
16योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
16Yusuf, ‹‹Ben yorumlayamam›› dedi, ‹‹Firavuna en uygun yorumu Tanrı yapacaktır.››
17मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.
17Firavun Yusufa anlatmaya başladı: ‹‹Düşümde bir ırmak kıyısında duruyordum.
18तेव्हा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.
18Irmaktan semiz ve güzel yedi inek çıktı. Sazlar arasında otlamaya başladılar.
19त्यानंतर सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर येताना मी पाहिल्या. त्यांच्या सारख्या दुबळ्या व कुरुप गाई मी सबंध मिसर देशात कधीच पाहिल्या नव्हत्या.
19Sonra arık, çirkin, cılız yedi inek daha çıktı. Mısırda onlar kadar çirkin inek görmedim.
20त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या.
20Cılız ve çirkin inekler ilk çıkan yedi semiz ineği yedi.
21तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते; त्या पूर्वी इतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.
21Ancak kötü görünüşleri değişmedi. Sanki bir şey yememiş gibi görünüyorlardı. Sonra uyandım.
22“त्यानंतर दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली,
22‹‹Bir de düşümde bir sapta dolgun ve güzel yedi başak bittiğini gördüm.
23मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली.
23Sonra solgun, cılız, doğu rüzgarının kavurduğu yedi başak daha bitti.
24व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. “ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”
24Cılız başaklar yedi güzel başağı yuttular. Büyücülere bunu anlattım. Ama hiçbiri yorumlayamadı.››
25मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे; लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे;
25Yusuf, ‹‹Efendim, iki düş de aynı anlamı taşıyor›› dedi, ‹‹Tanrı ne yapacağını sana bildirmiş.
26त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे. दोन्हीही स्वप्ने सारखीच आहेत;
26Yedi güzel inek yedi yıl demektir. Yedi güzel başak da yedi yıldır. Aynı anlama geliyor.
27त्या दुसऱ्या सात रोड गाई व ती सात रोड कणसे म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे. ती सात वर्षे चांगल्या सात वर्षानंतर येतील.
27Daha sonra çıkan yedi cılız, çirkin inek ve doğu rüzgarının kavurduğu yedi solgun başaksa yedi yıl kıtlık olacağı anlamına gelir.
28लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी संगितल्याप्रमाणेच हे घडून येईल.
28‹‹Söylediğim gibi, Tanrı ne yapacağını sana göstermiş.
29सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल.
29Mısırda yedi yıl bolluk olacak.
30परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल; आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.
30Sonra yedi yıl öyle bir kıtlık olacak ki, bolluk yılları hiç anımsanmayacak. Çünkü kıtlık ülkeyi kasıp kavuracak.
31आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.
31Ardından gelen kıtlık bolluğu unutturacak, çünkü çok şiddetli olacak.
32“तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोन स्वप्ने पडली ते यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील, हे आपणास दाखवावे.
32Bu konuda iki kez düş görmenin anlamı, Tanrının kesin kararını verdiğini ve en kısa zamanda uygulayacağını gösteriyor.
33तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे;
33‹‹Şimdi firavunun akıllı, bilgili bir adam bulup onu Mısırın başına getirmesi gerekir.
34त्या नंतर शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्यासाठी इतर अधिकारी निवडावेत; येत्या सात वर्षांच्या सुकाळात प्रत्येकाने आपल्या धान्याच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा सरकारला द्यावा.
34Ülke çapında adamlar görevlendirmeli, bunlar yedi bolluk yılı boyunca ürünlerin beşte birini toplamalı.
35अशा रीतीने ही माणसे सुकाळाच्या सात वर्षात पुष्कळ अन्न गोळा करतील आणि गरज पडेपर्यंत नगरात साठवून ठेवतील अशा प्रकारे, फारो, हे अन्न तुझ्या नियंत्रणात राहील.
35Gelecek verimli yılların bütün yiyeceğini toplasınlar, firavunun yönetimi altında kentlerde depolayıp korusunlar.
36येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा उपयोग होईल. तेव्हा मग दुष्काळाच्या सात वर्षात मिसराच नाश होणार नाही.”
36Bu yiyecek, gelecek yedi kıtlık yılı boyunca Mısırda ihtiyat olarak kullanılacak, ülke kıtlıktan kırılmayacak.››
37फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली.
37Bu öneri firavunla görevlilerine iyi göründü.
38फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!”
38Firavun görevlilerine, ‹‹Bu adam gibi Tanrı Ruhuna sahip birini bulabilir miyiz?›› diye sordu.
39तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही.
39Sonra Yusufa, ‹‹Madem Tanrı bütün bunları sana açıkladı, senden daha akıllısı, bilgilisi yoktur›› dedi,
40म्हणून मी तुला या देशाचा (मिसरचा) अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळितील; या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
40‹‹Sarayımın yönetimini sana vereceğim. Bütün halkım buyruklarına uyacak. Tahttan başka senden üstünlüğüm olmayacak.
41मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो.”
41Seni bütün Mısıra yönetici atıyorum.››
42मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गाळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
42Sonra mührünü parmağından çıkarıp Yusufun parmağına taktı. Ona ince ketenden giysi giydirdi. Boynuna altın zincir taktı.
43नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले; खास नेमलेले गारदी पुढे चालले होते; ते ललकारून जाहीरपणे सांगत होते, “लोक हो! आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ, याला लवून मुजरा करा.” अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक (प्रमुख अधिकारी) नेमले.
43Onu kendi yardımcısının arabasına bindirdi. Yusufun önünde, ‹‹Yol açın!›› diye bağırdılar. Böylece firavun ona bütün Mısırın yönetimini verdi.
44फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.”
44Firavun Yusufa, ‹‹Firavun benim›› dedi, ‹‹Ama Mısırda senden izinsiz kimse elini ayağını oynatmayacak.››
45फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला.
45Yusufun adını Safenat-Paneah koydu. On Kentinin kâhini Potiferanın kızı Asenatı da ona karı olarak verdi. Yusuf ülkeyi boydan boya dolaştı.
46योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली.
46Yusuf firavunun hizmetine girdiğinde otuz yaşındaydı. Firavunun huzurundan ayrıldıktan sonra bütün Mısırı dolaştı.
47सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले.
47Yedi bolluk yılı boyunca toprak çok ürün verdi.
48योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्न गोळा करुन त्या त्या शेतातले धान्य जवळच्याच नगरोनगरी साठवून ठेवले.
48Yusuf Mısırda yedi yıl içinde yetişen bütün ürünleri toplayıp kentlerde depoladı. Her kente o kentin çevresindeki tarlalarda yetişen ürünleri koydu.
49योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते.
49Denizin kumu kadar çok buğday depoladı; öyle ki, ölçmekten vazgeçti. Çünkü buğday ölçülemeyecek kadar çoktu.
50योसेफाची बायको ही ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी होती. दुष्काळाच्या सात वर्षांपैकी पहिले वर्ष येण्याअगोदर योसेफ व आसनथ यांना दोन मुलगे झाले.
50Kıtlık yılları başlamadan, On Kentinin kâhini Potiferanın kızı Asenat Yusufa iki erkek çocuk doğurdu.
51पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे होते; योसेफाने त्याला हे नांव दिले कारण तो म्हणाला, “देवाने मला झालेला त्रास व माझ्यावर झालेला अन्याय, तसेच माझ्या घराकडील सर्व काही यांचा मला विसर पडू दिला.”
51Yusuf ilk oğlunun adını Manaşşe koydu. ‹‹Tanrı bana bütün acılarımı ve babamın ailesini unutturdu›› dedi.
52योसेफाने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले कारण तो म्हणाला, “माझ्यावर संकटे आली परंतु देवाने मला सर्वबाबतीत सफल केले.”
52‹‹Tanrı sıkıntı çektiğim ülkede beni verimli kıldı›› diyerek ikinci oğlunun adını Efrayim koydu.
53सात वर्षापर्यंत मिसरमध्ये भरपूर अन्न होते पण ती वर्षे संपली.
53Mısırda yedi bolluk yılı sona erdi.
54परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते.
54Yusufun söylemiş olduğu gibi yedi kıtlık yılı başgösterdi. Bütün ülkelerde kıtlık vardı, ama Mısırın her yanında yiyecek bulunuyordu.
55दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी धान्यासाठी फारोकडे ओरड केली; तेव्हा फारो मिसरच्या लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.”
55Mısırlılar aç kalınca, yiyecek için firavuna yakardılar. Firavun, ‹‹Yusufa gidin›› dedi, ‹‹O size ne derse öyle yapın.››
56तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत.
56Kıtlık bütün ülkeyi sarınca, Yusuf depoları açıp Mısırlılara buğday satmaya başladı. Çünkü kıtlık Mısırı boydan boya kavuruyordu.
57मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.
57Bütün ülkelerden insanlar da buğday satın almak için Mısır'a, Yusuf'a geliyordu. Çünkü kıtlık bütün dünyayı sarmıştı ve şiddetliydi.