1नंतर इस्राएल लोक मवाबमधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरिहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
1İsrailliler yollarına devam ederek Moav ovalarında, Şeria Irmağının doğusunda, Eriha karşısında konakladılar.
2[This verse may not be a part of this translation]
2Sippor oğlu Balak İsraillilerin Amorlulara neler yaptığını duydu.
3[This verse may not be a part of this translation]
3İsrail halkı kalabalık olduğundan, Moavlılar onlardan korkarak yılgıya düştü.
4मवाबचा राजा मिद्यानींच्या नेत्यांना म्हणाला, “गाय जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील.” त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबचा राजा होता.
4Midyan ileri gelenlerine, ‹‹Öküz kırda nasıl otu yiyip tüketirse, bu topluluk da çevremizdeki her şeyi yiyip bitirecek›› dediler. O sırada Sippor oğlu Balak Moav Kralıydı.
5त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता: “एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर मधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ ठोकला आहे.
5Balak, Beor oğlu Balamı çağırmak için ulaklar gönderdi. Balam Fırat Irmağı kıyısında, Amav ülkesindeki Petorda yaşıyordu. Balak şöyle dedi: ‹‹Mısırdan çıkıp yeryüzünü kaplayan bir halk yanıbaşıma yerleşti.
6ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”
6Lütfen gel de benden daha güçlü olan bu halka benim için lanet oku. Olur ki, onları yener, ülkeden kovarız. Çünkü senin kutsadığın kişinin kutsanacağını, lanetlediğin kişinin lanetleneceğini biliyorum.››
7मवाब आणि मिद्यानचे पुढारी बलामशी बोलायला गेले. त्याच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.
7Moav ve Midyan ileri gelenleri falcılık ücretini alıp gittiler. Balama varınca Balakın bildirisini ona ilettiler.
8बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबचे पुढारी त्या रात्री बलामबरोबर राहिले.
8Balam onlara, ‹‹Geceyi burada geçirin›› dedi, ‹‹RABbin bana söyleyecekleri uyarınca size yanıt vereceğim.›› Bunun üzerine Moav önderleri geceyi Balamın yanında geçirdiler.
9देव बलामकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
9Tanrı Balama gelip, ‹‹Evinde kalan bu adamlar kim?›› diye sordu.
10बलाम देवाला म्हणाला, “सिप्पोरचा मुलगा बालाकने, मवाबच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे.
10Balam Tanrıyı şöyle yanıtladı: ‹‹Sippor oğlu Moav Kralı Balak bana şu bildiriyi gönderdi:
11तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन. आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”
11‹Mısırdan çıkan halk yeryüzünü kapladı. Gel de benim için onlara lanet oku. Olur ki, onlarla savaşmaya gücüm yeter, onları kovarım.› ››
12पण देव बलामला म्हणाला, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांविरुद्ध बोलू नकोस. ती माझा आशीर्वाद मिळालेली माणसे आहेत.”
12Ama Tanrı Balama, ‹‹Onlarla gitme! Bu halka lanet okuma, onlar kutsanmış halktır›› dedi.
13दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”
13Sabah Balam kalktı, Balakın önderlerine, ‹‹Ülkenize dönün. Çünkü RAB sizinle gelmeme izin vermiyor›› dedi.
14त्यामुळे मवाबचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, “बलामने आमच्या बरोबर यायला नकार दिला.”
14Moav önderleri dönüp Balaka, ‹‹Balam bizimle gelmedi›› dediler.
15म्हणून बालाकने बलामकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते.
15Bunun üzerine Balak ilk gidenlerden daha çok ve daha saygın başka önderler gönderdi.
16ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको.
16Balama gidip şöyle dediler: ‹‹Sippor oğlu Balak diyor ki, ‹Lütfen yanıma gelmene engel olan hiçbir şeye izin verme.
17मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशिल ते मी करीन पण तू ये व या लोकांविरुद्ध माझ्यासाठी बोल.”
17Çünkü seni fazlasıyla ödüllendireceğim, ne istersen yapacağım. Ne olur, gel, benim için bu halka lanet oku.› ››
18बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही.
18Balam Balakın ulaklarına şu yanıtı verdi: ‹‹Balak sarayını altınla, gümüşle doldurup bana verse bile, Tanrım RABbin buyruğundan öte küçük büyük hiçbir şey yapamam.
19परंतु आजच्या रात्रीपुरते तुम्ही इथे मागच्या सारखे राहू शकता. आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला रात्रीतून कळू शकेल.”
19Lütfen siz de bu gece burada kalın, RABbin bana başka bir diyeceği var mı öğreneyim.››
20त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
20O gece Tanrı Balama gelip, ‹‹Madem bu adamlar seni çağırmaya gelmiş, onlarla git; ancak sana ne söylersem onu yap›› dedi.
21दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
21Balam sabah kalkıp eşeğine palan vurdu, Moav önderleriyle birlikte gitti.
22बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणार होता.
22Tanrı onun gidişine öfkelendi. RABbin meleği engel olmak için yoluna dikildi. Balam eşeğine binmişti, yanında iki uşağı vardı.
23बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
23Eşek, yalın kılıç yolda durmakta olan RABbin meleğini görünce, yoldan sapıp tarlaya girdi. Balam yola döndürmek için eşeği dövdü.
24नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या.
24RABbin meleği iki bağın arasında iki yanı duvarlı dar bir yolda durdu.
25गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
25Eşek RABbin meleğini görünce duvara sıkıştı, Balamın ayağını ezdi. Balam eşeği yine dövdü.
26नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते.
26RABbin meleği ilerledi, sağa sola dönüşü olmayan dar bir yerde durdu.
27गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
27Eşek RABbin meleğini görünce, Balamın altında yıkıldı. Balam öfkelendi, değneğiyle eşeği dövdü.
28नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”
28Bunun üzerine RAB eşeği konuşturdu. Eşek Balama, ‹‹Sana ne yaptım ki, üç kez beni böyle dövdün?›› diye sordu.
29बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.”
29Balam, ‹‹Benimle alay ediyorsun›› diye yanıtladı, ‹‹Elimde kılıç olsaydı, seni hemen öldürürdüm.››
30पण गाढवी बलामला म्हणाली, “बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि या पूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे.” ‘हे खरे आहे’ बलाम म्हणाला.
30Eşek, ‹‹Bugüne dek hep üzerine bindiğin eşek değil miyim ben?›› dedi, ‹‹Daha önce sana hiç böyle davrandım mı?›› Balam, ‹‹Hayır›› diye yanıtladı.
31नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
31Bundan sonra RAB Balamın gözlerini açtı. Balam yalın kılıç yolda durmakta olan RABbin meleğini gördü, eğilip yüzüstü yere kapandı.
32परमेश्वराच्या दूताने बलामला विचारले, “तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी
32RABbin meleği, ‹‹Neden üç kez eşeğini dövdün?›› diye sordu, ‹‹Ben seni engellemeye geldim. Çünkü gittiğin yol seni yıkıma götürüyor.
33तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.”
33Eşek beni gördü, üç kez önümden saptı. Eğer yoldan sapmasaydı, seni öldürür, onu sağ bırakırdım.››
34तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.”
34Balam RABbin meleğine, ‹‹Günah işledim›› dedi, ‹‹Beni engellemek için yolda dikildiğini anlamadım. Uygun görmüyorsan şimdi evime döneyim.››
35तेव्हा परमेश्वराचा दूत बलामला म्हणाला, “नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल.” म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.
35RABbin meleği, ‹‹Adamlarla git›› dedi, ‹‹Ama yalnız sana söyleyeceklerimi söyleyeceksin.›› Böylece Balam Balakın önderleriyle gitti.
36बलाम येत असल्याचे बालाकाला समजले. म्हणून तो बलामला भेटायला अर्णोन नदी जवळच्या मवाबच्या शहरात गेला. ते त्याच्या देशाच्या उत्तर सरहद्दीवर होते.
36Balak Balamın geldiğini duyunca, onu karşılamak için Arnon kıyısında, sınırın en uzak köşesindeki Moav Kentine gitti.
37जेव्हा बालाकाने बलामला पाहिले तेव्हा तो त्याला म्हणाला, “मी तुला आधीच यायला सांगितले होते. हे खूप खूप महत्त्वाचे आहे असे मी तुला सांगत होतो. तू माझ्याकडे का आला नाहीस? आता मी तुला कदाचित पैसे देऊ शकणार नाही.”
37Balama, ‹‹Seni çağırmak için adam gönderdiğimde neden gelmedin?›› dedi, ‹‹Seni ödüllendirmeye gücüm yetmez mi?››
38बलामने उत्तर दिले, “पण आताच मी येथे आलो आहे. मी आलो आहे पण तू सांगितलेल्या गोष्टी मला कदाचित करता येणार नाहीत. परमेश्वर देव जेवढे सांगेत तेवढेच मी बोलू शकतो.
38Balam, ‹‹İşte şimdi geldim›› diye yanıtladı, ‹‹Ama ne diyebilirim ki? Ancak Tanrının bana buyurduklarını söyleyeceğim.››
39नंतर बलाम बालाकाबरोबर किर्याथ-हसोथ येथे गेला.
39Bundan sonra Balam Balakla yola çıkarak Kiryat-Husota gitti.
40बालाकाने काही गुरे व मेंढ्या बळी म्हणून मारल्या. त्याने थोडे मास बलामला दिले आणि थोडे त्याच्याबरोबर असलेल्या पुढाऱ्यांना दिले.
40Balak sığırlar, davarlar kurban etti, Balamla yanındaki önderlere et gönderdi.
41दुसऱ्या दिवशी सकाळी बालाक बलामला घेऊन बामोथबाल शहरी गेला. तेथून त्यांना इस्राएल लोकांच्या तळाचा शेवटचा भाग दिसू शकत होता.
41Sabah Balak Balam'ı Bamot-Baal'a çıkardı. Balam oradan İsrail halkının bir kesimini görebildi.