Marathi

Uma: New Testament

Psalms

13

1परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरुन जाणार आहेस? तू मला कायमचाच विसरणार आहेस का? किती काळापर्यंत तू माझा स्वीकार करायला नकार देणार आहेस?
2तू मला विसरला आहेस की नाही याबद्दल मी किती काळ संभ्रमात राहू! माझ्या ह्दयातले हे दुख मी किती काळ सोसू? माझे शत्रू माझ्यावर आणखी किती काळापर्यंत विजय मिळवणार आहेत?
3परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ. माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला उत्तर कळू दे. नाही तर मी मरुन जाईन.
4जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला” माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.
5परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.
6मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.