Marathi

Uma: New Testament

Psalms

21

1परमेश्वरा, तुझी शक्ती राजाला सुखी बनवते तू त्याला वाचवतोस तेव्हा सुध्दा तो सुखावतो.
2राजाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तूच त्याला दिल्यास. राजाने काही गोष्टींची मागणी केली आणि परमेश्वरा, त्याने जे मागितले ते तू त्याला दिलेस.
3परमेश्वरा, तू राजाला खरोखरच आशीर्वाद दिलास. तू त्याच्या मस्तकावर सोनेरी मुकुट ठेवलास.
4त्याने तुझ्याकडे जीवनाची मागणी केली आणि तू ते त्याला दिलेस, देवा, तू राजाला कधीही न संपणारे चिरंजीव आयुष्य दिलेस.
5तू राजाला विजयी केलेस आणि त्याला गौरव प्राप्त करुन दिलेस. तू त्याला मान आणि स्तुती दिलीस.
6देवा, तू राजाला अनंत काळासाठी आशीर्वाद दिलास. राजा तुझा चेहरा पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
7राजाचा परमेश्वरावर विश्वास आहे, सर्वशक्तिमान परमेश्वर त्याला निराश करणार नाही.
8देवा, तू तुझ्या सर्व शंत्रूना तू किती सामर्थ्यवान आहेस ते दाखवशील. तुझ्या सामर्थ्याने तुझा तिरस्कार करणाऱ्यांचा पराभव होईल.
9भट्टीतली आग अनेक वस्तू जाळू शकते. परमेश्वरा, तू जेव्हा राजाबरोबर असतोस तेव्हा तो भट्टीसारखा असतो. त्याचा क्रोध अग्रीसारखा जळतो आणि तो त्याच्या शत्रूंचा नाश करतो.
10त्याच्या शत्रूंच्या कुटुंबाचा नाश होईल ते पृथ्वीवरुन निघून जातील.
11का? कारण परमेश्वरा, त्या लोकांनी तुझ्याविरुध्द वाईट गोष्टींची योजना आखली परंतु ते यशस्वी झाले नाहीत.
12परमेश्वरा, तू त्या लोकांना तुझे गुलाम बनवलेस तू त्यांना दोराने बांधून ठेवलेस. तू त्यांच्या मानेभोवती दोर बांधलेस. तू त्यांना गुलामाप्रमाणे वाकायला लावलेस.
13हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.