Marathi

Uma: New Testament

Psalms

26

1परमेश्वरा, माझा न्याय कर. मी सच्चे आयुष्य जगलो हे सिध्द कर. मी परमेश्वरावर विश्वास ठेवणे कधीही सोडले नाही.
2परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा.
3मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
4मी कपटी लोकांबरोबर जात नाही, मी ढोंगी लोकांची कधीही संगत धरीत नाही.
5मी त्या दुष्टांच्या टोळीचा तिरस्कार करतो. मी त्या दुष्टांच्या टोळीत कधीही सामील होणार नाही.
6परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
7परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो.
8परमेश्वरा, मला तुझे मंदिर आवडते. मला तुझा तेजस्वी तंबू आवडतो.
9परमेश्वरा, मला पाप्यांच्या यादीत बसवू नकोस. त्या खुन्यांबरोबर मला मारु नकोस.
10ते लोक इतरांना फसवतील. वाईट गोष्टी करण्यासाठी ते पैसाही घेतील.
11परंतु मी निरपराध आहे. म्हणून देवा माझ्यावर दया करआणि मला वाचव.
12मी सर्व धोक्यांपासून सुरक्षित आहे. परमेश्वरा, तुझे भक्त भेटतात तेव्हा मी तुझी स्तुती करतो.