Marathi

Uma: New Testament

Psalms

43

1देवा तुला न अनुसरणारा एक माणूस इथे आहे. तो कपटी आहे आणि तो खोटे बोलतो देवा मी बरोबर आहे हे सिध्द कर. माझा बचाव कर. मला त्या माणसापासून वाचव.
2देवा, तू माझे सुरक्षित स्थान आहेस तू मला का सोडलेस? माझ्या शत्रूंपासून कशी सुटका करायची ते तू मला का दाखवले नाहीस?
3देवा, तुझा प्रकाश आणि सत्य माझ्यावर उजळू दे तुझा प्रकाश आणि सत्य मला मार्ग दाखवेल. ते मला तुझ्या पवित्र डोंगराकडे नेतील. ते मला तुझ्या घराकडे नेतील.
4मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन. देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
5मी इतका खिन्न का आहे? मी इतका का तळमळतो आहे? मी देवाच्या मदतीची वाट पहायला हवी. मला देवाची स्तुतीकरायची आणखी संधी मिळेल. तो मला वाचवेल.