Marathi

Uma: New Testament

Psalms

54

1देवा, तुझ्या अधिकाराचा उपयोग करुन मला वाचव. तुझे महान सामर्थ्य वापर आणि मला मुक्त कर.
2देवा, माझी प्रार्थना ऐक मी काय म्हणतो ते ऐक.
3जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.
4पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल.
5जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.
6देवा, मी तुला खुशीने अर्पणे देईन. परमेश्वरा, मी तुझ्या चांगल्या नावाची स्तुती करेन.
7परंतु मी तुला सर्व संकटांतून सोडवण्याची विनंती करीत आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झाल्याचे मला पाहू दे.