Nepali

Marathi

Exodus

10

1परमप्रभुले मोशालाई भननु भयो, “फिरऊनकहाँ जाऊ। मैले फिरऊन र उसका अधिकारीहरूलाई जिद्दी बनाएको छु। मैले मेरा शक्तिशाली चमत्कारहरू प्रदर्शन गर्न यसो गरें
1परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू फारोकडे जा. त्याचे व त्याच्यसेवकांची मने मी कठीण केली आहेत. मी हे यासाठी केले आहे की मला त्यांना माझ्या चमत्कारांचे सामर्थ्य दाखवावयाचे होते.
2अनि तिमीले आफ्नो छोरा-छोरी तथा नाती नातिनाहरूलाई मैले मिश्रमा प्रदर्शन गरेका शक्तिशाली चमत्कारहरू र अन्य चीजहरू भन्न सक्ने छौ। तब तिमीहरू सबैले जान्नेछौ म परमप्रभु हुँ।”
2तसेच तुम्ही तुमच्या मुलांना व नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे व अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”
3यसर्थ मोशा र हारून फिरऊनकहाँ गए। तिनीहरूले उसलाई भने, “परमप्रभु, हिब्रूहरूका परमेश्वर भन्नुहुन्छ, ‘तिमी कहिलेसम्म मलाई अस्वीकार गर्छौ? मेरो मानिसहरू मेरो आराधना गर्न जाऊन्।
3मग मोशे व अहरोन फारोकडे गेले. त्यांनी त्याला सांगितले, “इस्राएल लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘अजून किती दिवस तू माझे ऐकणार नाहीस? माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे.
4यदि तिमीले मेरा मानिसहरूलाई जान दिएनौ भने भोलि म तिम्रो भूमिमा सलहहरू ल्याइ दिनेछु।
4जर तू माझ्या लोकांना जाऊ देण्याचे नाकारशील तर उद्या मी तुझ्या देशावर टोळ धाड आणिन.
5सलहहरूले जमीन ढाक्नेछन। जमीनमा धेरै सलहहरू हुनेछन्। तिमीले जमीन देख्न सक्ने छैनौ। सलहले खेतका प्रत्येक कुरा अनि रूखहरू खानेछन्।
5ते टोळ सर्व जमीन झाकून टाकतील. ते इतके असतील कि तुला जमीन दिसणार नाही. गारा व पावसाच्या तडाख्यातून जे काही वाचले असेल त्याला टोळ खाऊन टाकतील. शेतातील सर्व झाडांचा पाला ते खाऊन फस्त करतील.
6मिश्रमा भएका सबै घरहरू, तपाईंका कर्मचारी र तपाईंका घर सलहहरूले छोप्नेछन्। त्यहाँ तपाईंका पिता-पुर्खाहरूले देखेको भन्दा अधिक सलहहरू हुनेछन। त्यहाँ यति धेरै सलहरू देखियो की मिश्रदेशमा मानिसहरू बसो-वास गर्न लागे यता त्यति कहिल्यै देखिएका थिएनन्।”‘त्यसपछि मोशाले फिरऊनबाट विदा लिए।
6ते टोळ तुझा वाडा, तुझ्या सेवकांची घरे, व मिसरमधील घरे, वाडे या सर्वात भरून जातील. तुझ्या वाडवडीलांनी आज पर्यंत पाहिले असतील त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ते असतील. मिसरमध्ये लोकवस्ती होऊ लागली त्या काळापासून आता पर्यंत कधीही नव्हते, तेवढे अधिक ते टोळ असतील.”‘ नंतर फारो समोरून मोशे निघून गेला.
7त्यसपछि कर्मचारीहरूले फिरऊनलाई सोधे, “कहिलेसम्म हामी यी मानिसहरूको फन्दामा परिरहने छौं? तिनीहरूका परमप्रभु परमेश्वरलाई आराधना गर्न मानिसहरूलाई जान दिनोस्। यदि तपाईंले जान दिनु भएन भने, तपाईंले चाल पाउनुअघि नै मिश्र ध्वंश हुनेछ।”
7फारोच्या सेवकांनी फारोला विचारले, “कोठवर आम्ही ह्या इस्राएल लोकांच्या सापळयात अडकून राहावे? त्यांना आपल्या देव परमेश्वराची उपासना करण्याकरिता जाऊ द्यावे जर आपण त्यांना जाऊ देणार नाही तर मग आपणास समजण्यापूर्वी मिसर देशाचा नाश होईल.”
8यसकारण फिरऊनका सेवकहरूले मोशा अनि हारूनलाई फिरऊनकहाँ फर्काएर ल्याए। फिरऊनले तिनीहरूलाई भने, “जाऊ अनि परमप्रभु तिमीहरूका परमेश्वरको आराधना गर। तर साँच्चै को जाँदै छन् मलाई भन?”
8तेव्हा फारोने मोशे व अहरोन यांना पुन्हा बोलावून आणण्यास आपल्या काही सेवाकांना सांगितले. फारो त्यांना म्हणाला, “जा व तुमचा देव परमेश्वर याची उपासना करा. परंतु नक्की कोण कोण जाणार आहे ते मला सांगा.”
9मोशाले उत्तर दिए, “हाम्रा केटा-केटी, बूढा-बूढी जति छन् सबै जानेछन्। हामी हाम्रा छोरा-छोरीहरू, हाम्रा भेडा तथा गाई वस्तुहरू पनि लिएर जानेछौं। हामी सबै जानेछौं कारण परमेश्वरको भोज हामी सबैको निम्ति हो।”
9मोशेने उत्तर दिले, “आमची तरूण व म्हातारी मंडळी यांना तसेच आम्ही आमची मुलं, आमच्या मुली, आमची शेरडेमेंढरे व गाईगुरे यांनाही आमच्या बरोबर घेऊन जाऊ; आम्ही झाडून सर्वजण जाऊ कारण परमेश्वराचा उत्सव सर्वाकरिता आहे.”
10फिरऊनले तिनीहरूलाई भने, “मैले तिमीहरू र तिमीहरूको केटा-केटीहरूसमेत जान दिंदा मेरो लागि परमप्रभु साँच्चै नै तिमीहरूसित हुनुपर्छ। तिमीहरूले केही नराम्रो योजनाहरू बनाइरहेका छौ।
10फारो त्यांना म्हणाला, “तुम्ही व तुमची मुलेबाळे यांना मिसरमधून जाऊ देण्यापूर्वी खरेच परमेश्वर मजपासून तुमचे रक्षण करो! हे पाहा, तुम्ही काही तरी वाईट असा कट करीत आहात.
11होइन! मात्र तिम्रा मानिसहरू परमप्रभुको आराधना गर्न लान सक्छौ।”अनि फिऊनले मोशा र हारूनलाई पठाए।
11तुमच्यातील पुरुषांनी तुमच्या परमेश्वराची उपासना करावयास जावे. आणि हीच तर तुम्ही मला विंनती केली होती. तेव्हा तुम्हा सर्वाना मी जाऊ देणार नाही.” त्यानंतर फारोने मोशे व अहरोन यांना घालवून दिले.
12परमप्रभुले मोशालाई भन्नुभयो, “तिम्रो पाखुरा मिश्र देशमाथि उठाऊ र सलह आउनेछन अनि मिश्रको समस्त भूमिमा फैलिनेछन्। असिनाले नष्ट नपारेको सबै उद्भिदहरू सलहले खाईदिने छन।”
12मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे मग मिसरवर टोळ धाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
13यसकारण मोशाले आफ्नो टेक्ने लाठ्ठी मिश्र देशमाथि उठाए अनि परमप्रभुले पूर्वबाट आँधी बेरी पठाउनु भयो। हावा बिहान बेलुका पूरै चलिरहयो। जब बिहान भयो मिश्र भूमिमा हावाले सलह ल्यायो।
13मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले.
14सलहहरू मिश्र देशमा उडेर आए अनि जमीनमा बसे। सलह मिश्रदेशमा यति विध्न आए कि यति विध्न न विगतमा कहिल्यै देखिएका थिए न भविष्यमा नै देखिनेछन।
14ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
15ती सलहहरूले सबै भूमि ढाके अनि मैदान नै छोपे। असिनाले ध्वंश नपारेको जम्मै फलहरू र उद्भिदहरू सलहले खाए।
15त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.
16फिरऊनले मोशा र हारूनलाई झट्टै बोलायो फिरऊनले भन्यो, “मैले परमप्रभु तिमीहरूका परमेश्वर र तिमीहरूका विरोधमा पाप गरेको छु।
16फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे.
17अब यस पल्टको निम्ति मेरो पाप क्षमा गरिदेऊ। परमप्रभुलाई ममाथि आइलागेको यो ‘मृत्यु’ (सलहहरू) हटाई दिनु भनी भन।”
17तेव्हा ह्या वेळी माझ्या पापंबद्दल मला क्षमा करा आणि हे मरण (टोळ) माझ्यापासून दूर करण्याकरिता परमेश्वराकडे प्रार्थना करा.”
18मोशाले फिरऊनबाट विदा लिएर परमप्रभुलाई प्रार्थना गरे।
18मोशे फारोसमोरून निघून गेला व त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
19यसर्थ परमप्रभुले हावाको दिशा फर्काएर पश्चिम तिर गर्नु भयो र यसले सलहहरूलाई मिश्रबाट उडायो अनि निगालोको समुद्रमा पुर्यायो। एउटै पनि सलह मिश्रमा रहेनन्।
19तेव्हा परमेश्वराने वाऱ्यात बदल केला. त्याने पश्चिमेकडून जोराचा वारा वाहविला तेव्हा त्या वाऱ्याने सर्व टोळ वाहवून तांबड्या समुद्रात टाकले. मिसरमध्ये एकही टोळ राहिला नाही.
20तर फेरि परमप्रभुले फिरऊनलाई अट्टेरी बनाइदिनु भयो यसकारण उसले इस्राएली मानिसहरूलाई जान दिएन।
20तरी परंतु परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.
21तब परमप्रभुले मोशालाई भन्नु भयो, “तिम्रो हातमाथि हावामा उठाऊ अनि अँध्यारोले मिश्रलाई ढाक्नेछ। अँध्यारो यति निष्पट्ट हुनेछ तिमीले त्यो अनुभव गर्नेछौ।”
21मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.”
22मोशाले आफ्नो हात उठायो अनि अन्धकारले मिश्रलाई ढाक्‌यो। त्यो अँध्यारो मिश्रमा तीन दिनसम्म रह्यो।
22तेव्हा मोशेने तसे कले आणि अंधाऱ्याढगाने अवघ्या मिसरदेशाला तीन दिवस गडप केले.
23त्यहाँ कसैले कसैलाई देख्न सक्तैन थियो। तर जहाँ इस्राएलका मानिसहरू थिए त्यहाँ अंध्यारो भएन।
23कोणालाही दुसरे काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस कोठेह गेले नाही; परंतु इस्राएल लोक जेथे राहात होते त्या सर्व भागावर म्हणजे गोशेन प्रांतात सर्वत्र भरपूर प्रकाश होता.
24फेरि फिरऊनले मोशालाई बोलाए। फिरऊनले भने, “जाऊ अनि परमप्रभुको आराधना गर। आफ्नो छोरा-छोरीहरूसंगै लान सक्छौ, तर तिमीले भेडा र गाई-वस्तुहरू यही छोडर जानु पर्छ।”
24तेव्हा पुन्हा फारोने मोशेला बोलावले. तो म्हणाला, “तुम्ही जा व तुमच्या परमेश्वराची उपासना करा. तुम्ही तुमची मुलेबाळेही बरोबर न्या. परंतु तुमची शेरडेमेंढरे व गुरेढोरे येथेच राहिली पाहिजेत.”
25मोशाले भने, “तपाईंले हामीलाई परमप्रभु हाम्रो परमेश्वरलाई बलिदानहरू अनि होमबलिहरू चढाउनु जानु दिनुपर्छ।”
25मोशे म्हणाला, “आमचेच पशू नव्हे तर तू देखील आम्हांस यज्ञपशू व होमबळी देशील; आणि त्यांचा आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याला अर्पणासाठी उपयोग करु!
26जब हामी परमप्रभुलाई आराधना गर्न जान्छौ। हामीले हाम्रा पशुहरू पनि लाने छौं। एउटै पनि भाग छाडने छैनौं। परमप्रभुको आराधनामा के कुराहरूको आवश्यक पर्छ, त्यो हामी पनि जान्दैनौं। हामीले आफ्नो आवश्यकता त्यस समयमा मात्र बुझ्नेछौं जति बेला हामी हाम्रो गन्तव्य स्थानमा पुग्छौं।”
26यज्ञ व होमार्पणासाठी आम्ही आमचे पशूही आमच्या बरोबर नेऊ. जनावराचा एक खूरही आम्ही मागे ठेवणार नाही. आमच्या परमेश्वराला यज्ञ व होमर्पणासाठी काय लागेल हे आता येथून आम्हाला सांगता येणार नाही; परंतु तेथे गेल्यावरच आम्हाला काय हवे व काय नको हे समजेल. म्हणून ह्या सर्वगोष्टी आम्हाला आमच्या सोबत नेल्याच पाहिजेत.”
27परमप्रभुले फेरि फिरऊनलाई अट्टेरी बनाउनु भयो। यसर्थ तिनीहरूलाई जानु दिनुमा फिरऊनले फेरि पनि अस्वीकार गरे।
27परमेश्वराने फारोचे मन पुन्हा कठीण केले. तेव्हा फारो इस्राएली लोकांना जाऊ देईना!
28तब फिरऊनले मोशालाई भने, “जाऊ, यहाँबाट। तिमी फेरि कहिलै आउनु पर्दैन यदि तिमी मलाई हेर्न आयौ भने, मर्नेछौ।”
28मग फारो मोशेवर ओरडला व म्हणाला, “तू येथून चालता हो! आपले तोंड मला पुन्हा दाखवू नकोस! यानंतर तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील!”
29तब मोशाले फिरऊनलाई भने, “एउटा विषयमा तिमी सही छौ, कारण म तिमीलाई हेर्न फेरि कहिल्यै आउने छैन।”
29मोशे म्हणाला, “तू एक गोष्ट बरोबर बोललास, मी तुझे तोंड पुन्हा कधीही पाहणार नाही!”