1И поднял меня дух, и привел меня к восточным воротам дома Господня, которые обращены к востоку. И вот, у входа в ворота двадцать пять человек; и между ними я видел Иазанию, сына Азурова, и Фалтию, сына Ванеева, князей народа.
1मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते.
2И Он сказал мне: сын человеческий! вот люди, у которых на уме беззаконие и которые дают худой совет в городе сем,
2मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या नगरीत दुष्ट बेत करणारे लोक हेच होत. हे लोक इतर लोकांना वाईट गोष्टी करायला सांगतात.
3говоря: „еще не близко; будем строить домы; он котел, а мы мясо".
3ते म्हणतात, ‘आपण आपली घरे पुन्हा लवकरच बांधू. भांड्यातील मांसाप्रमाणे आपण येथे सुरक्षित आहोत.’
4Посему изреки на них пророчество, пророчествуй, сынчеловеческий.
4ते खोटे बोलत आहेत. म्हणून तू माझ्यावतीने लोकांशी बोल. “मानवपुत्रा, लोकांना संदेश सांग.”
5И нисшел на меня Дух Господень и сказал мне: скажи, так говорит Господь: что говорите вы, дом Израилев, и что на ум вам приходит, это Я знаю.
5मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो.
6Много убитых ваших вы положили в сем городе и улицыего наполнили трупами.
6ह्या नगरीत तुम्ही पुष्कळांना ठार केले, रस्ते प्रेतांनी झाकून टाकले.
7Посему так говорит Господь Бог: убитые ваши, которых вы положили среди него, суть мясо, а он – котел; но вас Я выведу из него.
7आता परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘ती प्रेते म्हणजे मांस व नगरी म्हणजे भांडे आहे. तो (नबुखद्नेस्सर) येईल आणि ह्या सुरक्षित भांड्यातून तुम्हाला बाहेर काढील.
8Вы боитесь меча, и Я наведу на вас меч, говорит Господь Бог.
8तुम्ही तलवारीला घाबरता. पण मी तलवारीलाच तुमच्यावर आणीत आहे.” परमेश्वराने, आमच्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. मग त्या घडतीलच.
9И выведу вас из него, и отдам вас в руку чужих, и произведу над вами суд.
9देव असेही म्हणाला, “मी तुम्हा लोकांना या नगरीतून बाहेर काढीन, व परक्यांच्या हाती देईन. मी तुम्हाला शिक्षा करीन.
10От меча падете; на пределах Израилевых будут судить вас, и узнаете, что Я Господь.
10तुम्ही तलवारीने मराल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. म्हणजे तुम्हाला कळेल की शिक्षा करणारा मीच एक आहे. मीच परमेश्वर आहे.
11Он не будет для вас котлом, и вы не будете мясом в нем; на пределах Израилевых буду судить вас.
11हो! ही जागा म्हणजे अन्न शिजविण्याचे भांडे होईल. त्यातील मांस तुम्ही असाल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन.
12И узнаете, что Я Господь; ибо по заповедям Моим вы не ходили и уставов Моих не выполняли, а поступали по уставам народов, окружающих вас.
12मगच तुम्हाला ‘मी परमेश्वर आहे’ हे कळेल. तुम्ही मोडलात तो माझा कायदा होता. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राप्रमाणे जगण्याचे ठरविले.”
13И было, когда я пророчествовал, Фалтия, сын Ванеев, умер. И пал я на лице, и возопил громким голосом, и сказал: о,Господи Боже! неужели Ты хочешь до конца истребить остаток Израиля?
13मी भविष्यावाणी संपवताच बनायाचा मुलगा पलट्या मेला. मी जमिनीवर पडलो. डोके टेकवून मी मोठ्याने ओरडलो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, तू इस्राएलच्या अवशेषाचा पूर्ण विध्वंस करणार आहेस!”
14И было ко мне слово Господне:
14पण मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
15сын человеческий! твоим братьям, твоим братьям, твоим единокровным и всему дому Израилеву, всем им говорят живущие в Иерусалиме: „живите вдали от Господа; нам во владение отдана эта земля".
15“मानवपुत्रा, हा देश ज्यांना सक्तीने सोडावा लागला त्या इस्राएलच्या कुटुंबीयांचे, तुझ्या भाऊबंदाचे स्मरण कर. ते येथून दूर असलेल्या देशात राहतात. पण मी त्यांना परत आणीन. पण यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणतात, ‘परमेश्वरापासून दूर राहा ही भूमी आम्हाला दिलेली आहे ती आमची आहे.’
16На это скажи: так говорит Господь Бог: хотя Я и удалил их к народам и хотя рассеял их по землям, но Я буду для них некоторым святилищем в тех землях, куда пошли они.
16“म्हणून त्या लोकांना पुढील गोष्टी सांग; परमेश्वर, आमचा प्रभू, म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना दूरच्या देशांत सक्तीने घालविले, हे खरे आहे. मी त्यांना पुष्कळ देशांत विखुरले, त्या देशांतील मुक्कामाच्या अल्पकाळात मीच त्यांचे मंदिर होईन.”
17Затем скажи: так говорит Господь Бог: Я соберу вас из народов, и возвращу вас из земель, в которые вы рассеяны; и дам вам землю Израилеву.
17म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन.
18И придут туда, и извергнут из нее все гнусности ее и все мерзости ее.
18आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील.
19И дам им сердце единое, и дух новый вложу вних, и возьму из плоти их сердце каменное, и дам им сердце плотяное,
19“ते सर्वजण एकच व्यक्ती असल्याप्रमाणे, मी त्यांच्यात ऐक्य निर्माण करीन. मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. त्यांचे दगडाचे ह्दय काढून घेऊन तिथे मी खरे ह्दय बसवीन.
20чтобы они ходили по заповедям Моим, и соблюдали уставы Мои, и выполняли их; и будут Моим народом, а Я буду их Богом.
20मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो, त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन.”‘
21А чье сердце увлечется вслед гнусностей их и мерзостей их, поведение тех обращу на их голову, говорит Господь Бог.
21मग देव पुढे म्हणाला, “पण सध्या, त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
22Тогда Херувимы подняли крылья свои, и колеса подле них; и слава Бога Израилева вверху над ними.
22ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.
23И поднялась слава Господа из среды города и остановилась над горою, которая на восток от города.
23परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवर थांबली.
24И дух поднял меня и перенес меня в Халдею, к переселенцам, в видении, Духом Божиим. И отошло от меня видение, которое я видел.
24मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले व ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले.
25И я пересказал переселенцам все слова Господа, которые Он открыл мне.
25मी परागंदा झालेल्या लोकांशी बोललो. परमेश्वराने मला दाखाविलेल्या सर्व गोष्टी मी त्यांना संगितल्या.