1Сойди и сядь на прах, девица, дочь Вавилона; сиди на земле: престола нет, дочь Халдеев, и вперед не будут называть тебя нежною и роскошною.
1“धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
2Возьми жернова и мели муку; сними покрывалотвое, подбери подол, открой голени, переходи через реки:
2तू आता खूप मेहनत केली पाहिजेस. तुझी चांगली वस्त्रे आणि बुरखा उतरव तू जात्यावर धान्य दळले पाहिजेस. पुरूष तुझे पाय पाहू शकतील एवढे तुझे वस्त्र वर उचलून धर आणि नद्या पार कर. तुझा देश सोड.
3откроется нагота твоя, и даже виден будет стыд твой. Совершу мщение и не пощажу никого.
3पुरूष तुझा देह पाहतील आणि तुझा भोग घेतील. तुझ्या दुष्कृत्यांची किंमत मी तुला मोजायला लावीन. आणि कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही.”
4Искупитель наш – Господь Саваоф имя Ему, Святый Израилев.
4“माझे लोक म्हणतात, ‘देवाने आम्हाला वाचविले. त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. इस्राएलचा पवित्र एकमेव देव.”
5Сиди молча и уйди в темноту, дочь Халдеев: ибо вперед не будут называть тебя госпожею царств.
5“बाबेल, तेथेच शांत बसून राहा. खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का? कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.
6Я прогневался на народ Мой, уничижил наследие Мое и предал их в руки твои; а ты не оказала им милосердия, на старца налагала крайне тяжкое иго твое.
6“मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले. मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले. तू त्यांना शिक्षा केलीस. पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस. तू वृध्दांनासुध्दा खूप मेहनत करायला लावलीस.
7И ты говорила: „вечно буду госпожею", а не представляла того в уме твоем, не помышляла, что будет после.
7तू म्हणालीस, ‘मी चिरकाल राहीन. मी नेहमीच राणी होईन.’ तू त्या लोकांना वाईट वागविलेस हे तुझ्या लक्षात आले नाही. काय घडेल याचा तू विचार केला नाहीस.
8Но ныне выслушай это, изнеженная, живущая беспечно, говорящая в сердце своем: „я, – и другой подобной мне нет; не буду сидеть вдовою и не буду знать потери детей".
8तेव्हा ‘सभ्य स्त्रिये,’ आता माझे ऐक! तुला आता सुरक्षित वाटते व तू स्वत:शीच म्हणतेस, ‘मीच तेवढी महत्वाची व्यक्ती आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणीही नाही. मी कधीच विधवा होणार नाही. मला नेहमीच संतती होईल.’
9Но внезапно, в один день, придет к тебе то и другое,потеря детей и вдовство; в полной мере придут они на тебя, несмотря на множество чародейств твоих и на великую силу волшебств твоих.
9एके दिवशी, एका क्षणात तुझ्याबाबत पुढील दोन गोष्टी घडतील. पहिली तू तुझी मुले गमावशील आणि नंतर दुसरी म्हणजे तू तुझा पती गमावशील. हो! ह्या गोष्टी तुझ्याबाबत खरोखरच घडतील. तुझी सर्व जादू आणि तुझ्या प्रभावी युक्त्या तुला वाचविणार नाहीत.
10Ибо ты надеялась на злодейство твое, говорила: „никто не видит меня". Мудрость твоя и знание твое – они сбили тебя с пути; и ты говорила в сердце твоем: „я, и никто кромеменя".
10तू दुष्कृत्ये केलीस आणि तरी तुला सुरक्षित वाटते. मनातल्या मनात म्हणतेस ‘माझी दुष्कृत्ये कोणालाच दिसत नाहीत.’ तुझे शहाणपण आणि ज्ञान तुला वाचवील असे तुला वाटते. ‘मीच एकमेव आहे. माझ्यासारखे महत्वाचे कोणी नाही’ असा विचार तू स्वत:शीच करतेस.
11И придет на тебя бедствие: ты не узнаешь, откуда оно поднимется; и нападет на тебя беда, которой ты не в силах будешь отвратить, и внезапно придет на тебя пагуба, о которой ты и не думаешь.
11“पण तुझ्यावर संकटे येतील हे केव्हा होईल ते तुला कळणार नाही. पण तुझा नाश जवळ येत आहे. तू ती संकटे थोपवू शकणार नाहीस. काय होते आहे हे कळायच्या आतच तुझा नाश होईल.
12Оставайся же с твоими волшебствами и со множеством чародейств твоих, которыми ты занималась от юности твоей: может быть, пособишь себе, может быть,устоишь.
12“जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.
13Ты утомлена множеством советов твоих; пусть же выступят наблюдатели небес и звездочеты и предвещатели по новолуниям, и спасут тебя от того, что должноприключиться тебе.
13तुला खूप सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या सल्याचा तुला वीट आला का? मग ग्रहनक्षत्रे पाहून ज्योतिष सांगणाऱ्यांना पाठव. ते तुला महिन्याची सुरवात कधी आहे हे सांगतात; तर कदाचित् तुझा त्रास कधी सुरू होणार हे ही सांगू शकतील.
14Вот они, как солома: огонь сожег их, – не избавили души своей от пламени; не осталось угля, чтобы погреться, ни огня, чтобы посидеть перед ним.
14“पण ही माणसे स्वत:चा बचाव करण्यासही समर्थ असणार नाहीत. ते गवताच्या काडीप्रमाणे जळतील. ते इतक्या चटकन् जळतील की भाकरी भाजायला निखारे पेटणार नाहीत की उबेला आगोटी राहणार नाही.
15Такими стали для тебя те, с которыми ты трудилась, с которыми вела торговлю от юности твоей. Каждый побрел в свою сторону; никто не спасает тебя.
15“तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल. तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल. तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”