Russian 1876

Marathi

Jeremiah

7

1Слово, которое было к Иеремии от Господа:
1यिर्मयासाठी परमेश्वराचा संदेश:
2стань во вратах дома Господня и провозгласи там слово сие и скажи: слушайте слово Господне, все Иудеи, входящие сими вратами на поклонение Господу.
2यिर्मया, परमेश्वराच्या घराच्या दाराजवळ उभा राहा आणि हा उपदेश कर: “यहूदातील सर्व लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका. देवाची पूजा करण्यासाठी आत येणाऱ्या सर्व लोकांनो, ऐका!
3Так говорит Господь Саваоф, Бог Израилев: исправьте пути ваши и деяния ваши, и Я оставлю вас жить на сем месте.
3परमेश्वर हा इस्राएलच्या लोकांचा देव आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो ‘तुमची जगण्याची पद्धत बदला आणि सत्कृत्ये करा. तुम्ही असे केल्यास मी तुम्हाला या ठिकाणी राहू देईन
4Не надейтесь на обманчивые слова: „здесь храм Господень, храм Господень, храм Господень".
4काही लोक खोटे बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका. ते म्हणतात “हे परमेश्वराचे मंदिर आहे. परमेश्वराचे मंदिर, परमेश्वराचे मंदिर.”
5Но если совсем исправите пути ваши и деяния ваши, если будете верно производить суд между человеком и соперником его,
5तुम्ही तुमचा जीवनमार्ग बदललात आणि सत्कृत्ये केलीत तर मी तुम्हाला येथे राहू देईन. तुम्ही एकमेकांशी प्रामाणिक असले पाहिजे.
6не будете притеснять иноземца, сироты и вдовы, ипроливать невинной крови на месте сем, и не пойдете во след иных богов на беду себе, –
6तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील.
7то Я оставлю вас жить на месте сем, на этой земле, которую дал отцам вашим в роды родов.
7तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, तर मी तुम्हाला येथे राहू देईन. मी ही भूमी कायमची तुमच्या पूर्वजांना दिली.
8Вот, вы надеетесь на обманчивые слова, которые не принесут вам пользы.
8“पण तुम्ही ज्या लबाड्यांवर विश्वास ठेवत आहात, त्या लबाड्या कवडीमोलाच्या आहेत.
9Как! вы крадете, убиваете и прелюбодействуете, и клянетесь во лжи и кадите Ваалу, и ходите во след иных богов, которых вы не знаете,
9तुम्ही चोरी आणि खून कराल का? तुम्ही व्यभिचाराचे पाप कराल का? तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप कराल का? तुम्ही बआल देवाची पूजा कराल का? तुम्हाला माहीत नसणाऱ्या इतर दैवतांना अनुसराल का?
10и потом приходите и становитесь пред лицем Моим в доме сем, над которым наречено имя Мое, и говорите: „мы спасены", чтобы впредь делать все эти мерзости.
10तुम्ही ही अशी पापे केलीत तर तुम्ही माझ्या नावाच्या या घरात माझ्यासमोर उभे राहू शकाल असे तुम्हाला वाटते का? अशा भयंकर गोष्टी करुन तुम्ही माझ्यासमोर उभे राहून म्हणू शकाल का “आम्ही सुरक्षित आहोत?”
11Не соделался ли вертепом разбойников в глазах ваших дом сей, над которым наречено имя Мое? Вот, Я видел это, говорит Господь.
11हे मंदिर माझ्या नावाचे आहे. तुमच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे दुसरे काही नसून लुटांरुनी लपण्याची जागा आहे का? मी तुमच्यावर नजर ठेवून आहे.”‘ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
12Пойдите же на место Мое в Силом, где Я прежде назначил пребывать имени Моему, и посмотрите, что сделал Я с ним за нечестие народа Моего Израиля.
12“यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा.
13И ныне, так как вы делаете все эти дела, говорит Господь, и Я говорил вам с раннего утра, а вы не слушали, и звал вас, а вы неотвечали, –
13इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही ही सर्व दुष्कृत्ये करीत होता.” हा परमेश्वराचा संदेश आहे.! ‘मी पुन्हा पुन्हा तुमच्याशी बोललो, पण तुम्ही माझे ऐकण्यास नकार दिला. मी तुम्हाला बोलाविले, पण तुम्ही ओ दिली नाही.
14то Я так же поступлю с домом сим , над которым наречено имя Мое, на который вы надеетесь, и с местом, которое Я дал вам и отцам вашим, как поступил с Силомом.
14म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन.
15И отвергну вас от лица Моего, как отверг всех братьев ваших, все семя Ефремово.
15एफ्राईममधील तुमच्या भावांना मी माझ्यापासून जसे दूर फेकले, तसे मी तुम्हाला फेकीन.’
16Ты же не проси за этот народ и не возноси за них молитвы и прошения, и не ходатайствуй предо Мною, ибо Я не услышу тебя.
16“यिर्मया, तुला सांगतो, यहूदाच्या लोकांसाठी प्रार्थना करु नकोस. त्यांच्यासाठी याचना व आळवणी करु नकोस. त्यांच्या मदतीकरिता मला विनवू नकोस. तू त्यांच्याकरिता केलेली प्रार्थना मी ऐकणार नाही.
17Не видишь ли, что они делают в городах Иудеи и на улицах Иерусалима?
17ते लोक यहूदांच्या गावांतून काय करीत आहेत, हे तू पाहतोस, हे मला माहीत आहे. यरुशलेमच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसू शकते.
18Дети собирают дрова, а отцы разводят огонь, и женщины месят тесто, чтобы делать пирожки для богини неба и совершать возлияния иным богам, чтобы огорчать Меня.
18यहूदातील लोक काय करीत आहेत ते पाहा. मुले लाकडे गोळा करतात. वडील त्याचा उपयोग सरपण म्हणून करतात. ते विस्तव पेटवितात. बायका स्वर्गातील राणीला अर्पण करण्यासाठी भाकर तयार करतात. यहूदातील हे लोक इतर दैवतांची पूजा करताना दैवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून पेय ओततात. ते मला संताप आणण्यासाठी हे करतात.
19Но Меня ли огорчают они? говорит Господь; не себя ли самих к стыду своему?
19पण यहूदातील लोक खरोखर ज्याला दुखवीत आहेत, तो मी नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते फक्त स्वत:ला दुखवीत आहेत. ते स्वत:लाच लज्जित करीत आहेत.”
20Посему так говорит Господь Бог: вот, изливается гнев Мой и яростьМоя на место сие, на людей и на скот, и на дерева полевые и на плоды земли, и возгорится и не погаснет.
20म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी ह्या जागेवर माझा राग काढीन. मी माणसांना, प्राण्यांना, रानातील झाडांना आणि पिकांना शिक्षा करीन. माझा राग तप्त अग्नीप्रमाणे असेल. कोणीही तो विझवू शकणार नाही.”
21Так говорит Господь Саваоф, Бог Израилев: всесожжения ваши прилагайте к жертвам вашим и ешьте мясо;
21सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलचा देव म्हणतो, “जा आणि तुम्हाला हवी तितकी होमार्पणे करा. तुम्हाला पाहिजे तितके यज्ञ द्या. त्या यज्ञ दिलेल्या पशूंचे मांस तुम्हीच खा.
22ибо отцам вашим Я не говорил и не давал им заповеди втот день, в который Я вывел их из земли Египетской, о всесожжении и жертве;
22मी तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. मी त्यांच्याशी बोललो. पण अर्पण करण्याच्या गोष्टींबद्दल व बळींबद्दल मी त्यांना आज्ञा दिली नाही.
23но такую заповедь дал им: „слушайтесь гласа Моего, и Я буду вашим Богом, а вы будетеМоим народом, и ходите по всякому пути, который Я заповедаю вам, чтобы вам было хорошо".
23मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’
24Но они не послушали и не приклонили уха своего, и жили по внушениюи упорству злого сердца своего, и стали ко Мне спиною, а не лицом.
24“पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दुराग्रही होते आणि त्यांना पाहिजे त्याच गोष्टी त्यांनी केल्या. ते सज्जन झाले नाहीत. उलट जास्तच दुष्ट झाले. पुढे येण्याऐवजी ते मागे गेले.
25С того дня, как отцы ваши вышли из земли Египетской, до сего дня Я посылал к вам всех рабов Моих – пророков, посылал всякий день с раннего утра;
25तुमच्या पूर्वजांनी मिसर सोडला त्या दिवसापासून आजपावेतो मी माझे सेवक तुमच्याकडे पाठविले आहेत. माझे सेवक संदेष्टे आहेत. मी पुन्हा पुन्हा त्यांना तुमच्याकडे पाठविले.
26но они не слушались Меня и не приклонили уха своего, а ожесточили выю свою, поступали хуже отцов своих.
26पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते खूप दुराग्रही होते. त्यांनी त्यांच्या वडिलांपेक्षा वाईट कृत्ये केली.
27И когда ты будешь говорить им все эти слова, они тебя не послушают; и когда будешь звать их, они тебе не ответят.
27“यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या सर्व गोष्टी सांग पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना बोलाविलेस तरी ते तुला ओ देणार नाहीत.
28Тогда скажи им: вот народ, который не слушает гласа Господа Богасвоего и не принимает наставления! Не стало у них истины, она отнята от уст их.
28म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ह्या राष्ट्रांने परमेश्वराच्या म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्या राष्ट्रांतील लोकांनी देवाची शिकवण ऐकली नाही. त्यांना खरी शिकवण माहीत नाही.
29Остриги волоса твои и брось, и подними плач на горах, ибо отверг Господь и оставил род, навлекший гнев Его.
29“यिर्मया, तुझे केस कापून दूर फेकून दे. उजाड डोंगरमाथ्यावर जा आणि रड. का? परमेश्वराने माणसांच्या ह्या पिढीला नाकारले आहे. परमेश्वराने ह्या लोकांकडे पाठ फिरविली आहे. रागाच्या भरात तो त्यांना शिक्षा करील.
30Ибо сыновья Иуды делают злое пред очами Моими, говорит Господь; поставили мерзости свои в доме, над которым наречено имя Мое, чтобы осквернить его;
30हे असे कर कारण यहूदाच्या लोकांना पापे करताना मी पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी त्यांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत. मी त्या मूर्तीचा तिरस्कार करतो. माझ्या नावाच्या मंदिरात त्यांनी त्या मूर्ती स्थापिल्या आहेत. त्यांनी माझे घर ‘अपवित्र’ केले आहे.
31и устроили высоты Тофета в долине сыновей Енномовых, чтобы сожигать сыновей своих и дочерей своих в огне, чего Я не повелевал и что Мне на сердце не приходило.
31यहूदाच्या लोकांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्या ठिकाणी लोक स्वत:च्या मुलामुलींना ठार मारतात आणि दैवताला अर्पण करण्यासाठी म्हणून जाळतात. अशी आज्ञा मी कधीही दिलेली नाही. असे काही माझ्या मनातही कधी आलेले नाही.
32За то вот, приходят дни, говорит Господь, когда не будут более называть место сие Тофетом и долиною сыновей Енномовых, но долиноюубийства, и в Тофете будут хоронить по недостатку места.
32म्हणून मी तुम्हाला ताकीद देतो. असे दिवस येत आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे, “लोक ह्या जागेला पुन्हा कधीही तोफेत वा बेन हिन्नोमची दरी असे म्हणणार नाहीत, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. असे नाव देण्याचे कारण हेच की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील.
33И будут трупы народа сего пищею птицам небесным и зверям земным, и некому будет отгонять их.
33मग बाकी मृत शरीरे उघडीच जमिनीवर पडतील आणि गिधाडांचे भक्ष्य होतील. वन्य पशू ती शरीरे खातील. त्या गिधाडांना अथवा वन्य पशूंना हाकलायला तेथे कोणीही जिवंत राहणार नाही.
34И прекращу в городах Иудеи и на улицах Иерусалима голос торжества и голос веселия, голос жениха и голос невесты; потому что земля эта будет пустынею.
34यहूदाच्या गावांतील व यरुशलेमच्या रस्तांवरील उल्हासाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. यहूदात किंवा यरुशलेममध्ये पुन्हा कधीही वधू वरांचा शब्द उमटणार नाही. ती भूमी ओसाड वाळवंट होईल.”