Russian 1876

Marathi

Proverbs

26

1Как снег летом и дождь во время жатвы, так честь неприлична глупому.
1उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको.
2Как воробей вспорхнет, как ласточка улетит, так незаслуженное проклятие не сбудется.
2एखाद्याने तुमच्या बाबतीत काही वाईट घडावे असे म्हटले तर काही काळजी करु नका. तुम्ही जर काही चूक केली नसेल तर काहीच वाईट घडणार नाही. अशा माणसाचे शब्द तुमच्या जवळून उडून जाणाऱ्या व कधीच न थांबणाऱ्या पक्ष्याप्रमाणे असतात.
3Бич для коня, узда для осла, а палка для глупых.
3घोड्याला चाबकाचे फटकारे लागतात. बैलाच्या नाकात वेसण घालावी लागते आणि मूर्खाला खरपूस मार द्यावा लागतो.
4Не отвечай глупому по глупости его, чтобы и тебе не сделаться подобным ему;
4एक वाईट परिस्थिती: मूर्खाने जर तुम्हाला मूर्खासारखा प्रश्र विचारला तर मूर्खासारखे उत्तर देऊ नका. नाहीतर तुम्ही सुध्दा मूर्खासारखेच दिसाल.
5но отвечай глупому по глупости его, чтобы он не стал мудрецом в глазах своих.
5पण मूर्खाने जर मूर्ख प्रश्र विचारला तर तुम्हीही त्याला मूर्ख उत्तर द्या. नाहीतर तो मूर्ख आपण खूप हुशार आहोत असे समजेल.
6Подрезывает себе ноги, терпит неприятность тот, кто дает словесное поручение глупцу.
6तुमचा निरोप द्यायला मूर्खाला कधीही सांगू नका. तुम्ही जर तसे केलेत तर ते तुमचे पाय कापून टाकल्यासारखे होईल. संकटाला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
7Неровно поднимаются ноги у хромого, - и притча вустах глупцов.
7मूर्ख जेव्हा शहाण्यासारखे बोलायचा प्रयत्न करतो तेव्हा ते लंगड्याने प्रयत्न केल्यासारखे वाटते.
8Что влагающий драгоценный камень в пращу, то воздающий глупому честь.
8मूर्खाला आदर दाखवणे हे गोफणीला दगड बांधण्यासारखे आहे.
9Что колючий терн в руке пьяного, то притча в устах глупцов.
9मूर्ख जेव्हा काहीतरी शहाणपणाचे बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते झिंगलेल्या माणसाने हातात रुतलेला काटा काढण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते.
10Сильный делает все произвольно: и глупого награждает, и всякогопрохожего награждает.
10मूर्खाला किंवा वाटेवरच्या कोणालाही मोलाने काम करायला सांगणे धोकादायक असू शकते. त्यामुळे कोणाला इजा होईल ते सांगता येणार नाही.
11Как пес возвращается на блевотину свою, так глупый повторяет глупость свою.
11कुत्रा अन्न खातो. नंतर त्याला बरे वाटेनासे होते आणि तो उलटी करतो. कुत्रा नंतरही ते ओकलेले पुन्हा खातो. मूर्ख माणूसही असाच असतो. तो मूर्खांसारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा करतो.
12Видал ли ты человека, мудрого в глазах его? На глупого больше надежды, нежели нанего.
12जर एखादा माणूस शहाणा नसताना स्वत:ला शहाणा समजत असेल तर तो मूर्खापेक्षाही वाईट आहे.
13Ленивец говорит: „лев на дороге! лев на площадях!"
13आळशी माणूस म्हणतो, “मी माझे घर सोडू शकत नाही. रस्त्यात सिंह आहे.”
14Дверь ворочается на крючьях своих, а ленивец на постели своей.
14आळशी माणूस दारासारखा असतो. दार जसे बिजागरीवर मागे पुढे हलते तसा तो अंथरुणावर हलत असतो. तो इकडे तिकडे कुठेही जात नाही.
15Ленивец опускает руку свою в чашу, и ему тяжело донести ее до рта своего.
15आळशी माणूस स्वत:चे अन्न उचलून तोंडात घालण्यातदेखील आळशीपणा करतो.
16Ленивец в глазах своих мудрее семерых, отвечающих обдуманно.
16आळश्याला आपण खूप हुशार आहोत असे वाटते. सात माणसे त्यांच्या कल्पनांसाठी योग्य कारणे देऊ शकतात. त्यांच्यापेक्षाही आपण हुशार आहोत असे त्याला वाटते.
17Хватает пса за уши, кто, проходя мимо, вмешивается в чужую ссору.
17दोन माणसांच्या वादातला भाग बनणे हे फार धोकादायक असते. ते रसत्याने चालताना कुत्र्याला त्याचे कान धरुन पकडण्यासारखेच असते.
18Как притворяющийся помешанным бросает огонь, стрелы и смерть,
18[This verse may not be a part of this translation]
19так – человек, который коварно вредит другу своему и потом говорит: „я только пошутил".
19[This verse may not be a part of this translation]
20Где нет больше дров, огонь погасает, и где нет наушника, раздор утихает.
20शेकोटीत जर लाकडे नसतील तर ती शेकोटी विझून जाते. त्याचप्रमाणे अफवा नसतील तर वाद संपून जातात.
21Уголь – для жара и дрова – для огня, а человек сварливый – дляразжжения ссоры.
21लोणारी कोळसा कोळश्याला पेटता ठेवतो आणि लाकूड शेकोटी पेटती ठेवते. त्याचप्रमाणे जे लोक संकटे निर्माण करतात तेच वाद चालू ठेवतात.
22Слова наушника – как лакомства, и они входят во внутренность чрева.
22लोकांना गप्पा-टप्पा आवडतात. ते चांगले अन्न खाल्ल्यासारखे असेत.
23Что нечистым серебром обложенный глиняный сосуд, то пламенные уста и сердце злобное.
23दुष्ट योजना लपवण्यासाठी वापरलेले चांगले शब्द हे मातीच्या भांड्यावर चांदीचा मुलामा चढवल्यासारखे असते.
24Устами своими притворяется враг, а в сердце своем замышляетковарство.
24दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो.
25Если он говорит и нежным голосом, не верь ему, потому что семь мерзостей в сердце его.
25तो ज्या गोष्टी सांगतो त्या जरी चांगल्या वाटल्या तरी त्यावर विश्वास ठेवू नका. त्याचे मन दुष्ट कल्पनांनी भरलेले आहे.
26Если ненависть прикрывается наедине, то откроется злоба его в народном собрании.
26तो त्याच्या दुष्ट योजना चांगल्या शब्दांनी लपवतो. पण तो फारच नीच असतो आणि शेवटी तो ज्या वाईट गोष्टी करतो त्या सर्वांना दिसतील.
27Кто роет яму, тот упадет в нее, и кто покатит вверх камень, к томуон воротится.
27जर एखाद्याने दुसऱ्याला जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला तर तो स्वत:च त्यात अडकतो जर एखाद्याने दुसऱ्यावर दरड टाकण्याचा प्रयत्न केला तर तो स्वत:च त्या दरडीखाली चिरडून जाईल.
28Лживый язык ненавидит уязвляемых им, и льстивые уста готовят падение.
28जो माणूस खोटे बोलून ज्या लोकांना दु:ख देतो त्यांचा तो तिरस्कार करीत असतो. आणि तो जर त्याच्या मनात नसताना काही बोलला तर तो स्वत:लाच दु:खी करीत असतो.