1Слова Лемуила царя. Наставление, которое преподала ему мать его:
1ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या.
2что, сын мой? что, сын чрева моего? что, сын обетов моих?
2तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस.
3Не отдавай женщинам сил твоих, ни путей твоих губительницам царей.
3तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस.
4Не царям, Лемуил, не царям пить вино, и не князьям – сикеру,
4लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते.
5чтобы, напившись, они не забыли закона и не превратили суда всех угнетаемых.
5ते कदाचित् खूप पितील आणि कायदा काय म्हणतो ते विसरुन जातील. नंतर ते गरीबांचे सर्व हक्क काढून घेतील.
6Дайте сикеру погибающему и вино огорченному душею;
6गरीब लोकांना मद्य द्या. जे लोक संकटात आहेत त्यांना द्राक्षारस द्या.
7пусть он выпьет и забудет бедность свою и не вспомнит больше о своем страдании.
7ते नंतर पितील आणि ते गरीब आहेत हे विसरुन जातील. ते पितील आणि त्यांची सर्व संकटे विसरतील.
8Открывай уста твои за безгласного и для защиты всех сирот.
8जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे.
9Открывай уста твои для правосудия и для дела бедного и нищего.
9ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा.
10Кто найдет добродетельную жену? цена ее выше жемчугов;
10सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे.
11уверено в ней сердце мужа ее, и он не останется без прибытка;
11तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही.
12она воздает ему добром, а не злом, во все дни жизни своей.
12ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते. ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही.
13Добывает шерсть и лен, и с охотою работает своими руками.
13ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते.
14Она, как купеческие корабли, издалека добывает хлеб свой.
14ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते.
15Она встает еще ночью и раздает пищу в доме своем и урочное служанкам своим.
15ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते.
16Задумает она о поле, и приобретает его; от плодов рук своих насаждает виноградник.
16ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते.
17Препоясывает силою чресла свои и укрепляет мышцы свои.
17ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे.
18Она чувствует, что занятие ее хорошо, и – светильник ее не гаснет и ночью.
18तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो. आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते.
19Протягивает руки свои к прялке, и персты ее берутся за веретено.
19ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते.
20Длань свою она открывает бедному, и руку свою подает нуждающемуся.
20ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते.
21Не боится стужи для семьи своей, потому что вся семья ее одета в двойные одежды.
21जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात.
22Она делает себе ковры; виссон и пурпур – одежда ее.
22ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते.
23Муж ее известен у ворот, когда сидит со старейшинами земли.
23लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो.
24Она делает покрывала и продает, и поясы доставляет купцам Финикийским.
24ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते.
25Крепость и красота – одежда ее, и весело смотритона на будущее.
25ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे.
26Уста свои открывает с мудростью, и кроткое наставление на языке ее.
26ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते.
27Она наблюдает за хозяйством в доме своем и не ест хлеба праздности.
27ती कधीही आळशी नसते. ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते.
28Встают дети и ублажают ее, – муж, и хвалит ее:
28तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो,
29„много было жен добродетельных, но ты превзошла всех их".
29“चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.”
30Миловидность обманчива и красота суетна; но жена, боящаяся Господа, достойна хвалы.
30मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे.
31Дайте ей от плода рук ее, и да прославят ее у ворот дела ее!
31तिला साजेसे बक्षीस तिला द्या. लोकांमध्ये तिची प्रशंसा करा. तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.