Russian 1876

Marathi

Psalms

112

1(111:1) Аллилуия. Блажен муж, боящийся Господа икрепко любящий заповеди Его.
1परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
2(111:2) Сильно будет на земле семя его; род правых благословится.
2त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
3(111:3) Обилие и богатство в доме его, и правда его пребывает вовек.
3त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
4(111:4) Во тьме восходит свет правым; благ он и милосерд и праведен.
4चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो. देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
5(111:5) Добрый человек милует и взаймы дает; он даст твердость словам своим на суде.
5माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते. माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
6(111:6) Он вовек не поколеблется; в вечной памяти будет праведник.
6तो माणूस कधीही पडणार नाही. चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
7(111:7) Не убоится худой молвы: сердце его твердо, уповая на Господа.
7त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
8(111:8) Утверждено сердце его: он не убоится, когда посмотрит на врагов своих.
8ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही. तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
9(111:9) Он расточил, роздал нищим; правда его пребывает во веки; рог его вознесется во славе.
9तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
10(111:10) Нечестивый увидит это и будет досадовать, заскрежещет зубами своими и истает. Желание нечестивых погибнет.
10दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात. ते रागाने त्यांचे दांत खातील आणि नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.