Spanish: Reina Valera (1909)

Marathi

2 Kings

6

1LOS hijos de los profetas dijeron á Eliseo: He aquí, el lugar en que moramos contigo nos es estrecho.
1एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते.
2Vamos ahora al Jordán, y tomemos de allí cada uno una viga, y hagámonos allí lugar en que habitemos. Y él dijo: Andad.
2यार्देन नदीवर जाऊन आम्ही लाकूड तोडून आणतो. एकेकजण एकेक ओंडका आणू आणि आमच्यासाठी तिथे राहायला घर बांधू.” अलीशा म्हणाला, “छान, जा आणि कामाला लागा.”
3Y dijo uno: Rogámoste que quieras venir con tus siervos. Y él respondió: Yo iré.
3एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.” अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
4Fuése pues con ellos; y como llegaron al Jordán, cortaron la madera.
4तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि झाडे तोडायला लागले.
5Y aconteció que derribando uno un árbol, cayósele el hacha en el agua; y dió voces, diciendo: ­Ah, señor mío, que era emprestada!
5झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.”
6Y el varón de Dios dijo: ¿Dónde cayó? Y él le mostró el lugar. Entonces cortó él un palo, y echólo allí; é hizo nadar el hierro.
6अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?” तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले.
7Y dijo: Tómalo. Y él tendió la mano, y tomólo.
7अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.
8Tenía el rey de Siria guerra contra Israel, y consultando con sus siervos, dijo: En tal y tal lugar estará mi campamento.
8अरामच्या राजाची इस्राएलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी दबा धरुन बसा आणि इस्राएली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा.”
9Y el varón de Dios envió á decir al rey de Israel: Mira que no pases por tal lugar, porque los Siros van allí.
9पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे.
10Entonces el rey de Israel envió á aquel lugar que el varón de Dios había dicho y amonestádole; y guardóse de allí, no una vez ni dos.
10ज्या जागेबद्दल अलीशाने सावधगिरीचा इषारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्राएलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले.”
11Y el corazón del rey de Siria fué turbado de esto; y llamando á sus siervos, díjoles: ¿No me declararéis vosotros quién de los nuestros es del rey de Israel?
11या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
12Entonces uno de los siervos dijo: No, rey, señor mío; sino que el profeta Eliseo está en Israel, el cual declara al rey de Israel las palabras que tú hablas en tu más secreta cámara.
12तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्राएलचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील!”
13Y él dijo: Id, y mirad dónde está, para que yo envíe á tomarlo. Y fuéle dicho: He aquí él está en Dothán.
13तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “कुठे आहे तो अलीशा. त्याला पकडायला मी माणसे पाठवतो!” तेव्हा अरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला, अलीशा दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
14Entonces envió el rey allá gente de á caballo, y carros, y un grande ejército, los cuales vinieron de noche, y cercaron la ciudad.
14मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.
15Y levantándose de mañana el que servía al varón de Dios, para salir, he aquí el ejército que tenía cercada la ciudad, con gente de á caballo y carros. Entonces su criado le dijo: ­Ah, señor mío! ¿qué haremos?
15अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले. अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?”
16Y él le dijo: No hayas miedo: porque más son los que están con nosotros que los que están con ellos.
16अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”
17Y oró Eliseo, y dijo: Ruégote, oh Jehová, que abras sus ojos para que vea. Entonces Jehová abrió los ojos del mozo, y miró: y he aquí que el monte estaba lleno de gente de á caballo, y de carros de fuego alrededor de Eliseo.
17आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.” परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
18Y luego que los Siros descendieron á él, oró Eliseo á Jehová, y dijo: Ruégote que hieras á esta gente con ceguedad. E hiriólos con ceguedad, conforme al dicho de Eliseo.
18हे अग्नीरथ आणि अग्रीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करुन म्हटले, “तू या लोकांना आंधळे करुन टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.” अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले.
19Después les dijo Eliseo: No es este el camino, ni es esta la ciudad; seguidme, que yo os guiaré al hombre que buscáis. Y guiólos á Samaria.
19अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
20Y así que llegaron á Samaria, dijo Eliseo: Jehová, abre los ojos de éstos, para que vean. Y Jehová abrió sus ojos, y miraron, y halláronse en medio de Samaria.
20ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले.
21Y cuando el rey de Israel los hubo visto, dijo á Eliseo: ¿Herirélos, padre mío?
21इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
22Y él le respondió: No los hieras; ¿herirías tú á los que tomaste cautivos con tu espada y con tu arco? Pon delante de ellos pan y agua, para que coman y beban, y se vuelvan á sus señores.
22अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.
23Entonces les fué aparejada grande comida: y como hubieron comido y bebido, enviólos, y ellos se volvieron á su señor. Y nunca más vinieron cuadrillas de Siria á la tierra de Israel.
23इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणे पिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याची धाड इस्राएलवर आली नाही.”
24Después de esto aconteció, que Ben-adad rey de Siria juntó todo su ejército, y subió, y puso cerco á Samaria.
24या नंतर, अरामचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
25Y hubo grande hambre en Samaria, teniendo ellos cerco sobre ella; tanto, que la cabeza de un asno era vendida por ochenta piezas de plata, y la cuarta de un cabo de estiércol de palomas por cinco piezas de plata.
25या सैन्याने नगरात अन्न धान्य जाऊ देण्यास बंदी घातली. त्यामुळे शोमरोनमध्ये लोकांची अन्नान्न दशा झाली. गाढवाचे मुंडके ऐंशी रौप्यमुद्रांना आणि कबुतराची विष्ठा पाच रौप्यमुद्रांना विकली जाऊ लागली इतकी लोकांवर वाईट वेळ आली.
26Y pasando el rey de Israel por el muro, una mujer le dió voces, y dijo: Salva, rey señor mío.
26असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”
27Y él dijo: Si no te salva Jehová, ¿de dónde te tengo de salvar yo? ¿del alfolí, ó del lagar?
27इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तरी मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.”
28Y díjole el rey: ¿Qué tienes? Y ella respondió: Esta mujer me dijo: Da acá tu hijo, y comámoslo hoy, y mañana comeremos el mío.
28मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’
29Cocimos pues mi hijo, y le comimos. El día siguiente yo le dije: Da acá tu hijo, y comámoslo. Mas ella ha escondido su hijo.
29तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
30Y como el rey oyó las palabras de aquella mujer, rasgó sus vestidos, y pasó así por el muro: y llegó á ver el pueblo el saco que traía interiormente sobre su carne.
30बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की दु:खाच्या भरात त्याने आपले कपडे फाडले. तो तिथून पुढे गेला तेव्हा त्याने आतून जाडेभरडे कपडे घातलेले लोकांनी पाहिले. तेव्हा तो दु:खी आणि उदास आहे हे लोकांच्या लक्षात आले.
31Y él dijo: Así me haga Dios, y así me añada, si la cabeza de Eliseo hijo de Saphat quedare sobre él hoy.
31राजा म्हणाला, “आज दिवस मावळे पर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
32Estaba á la sazón Eliseo sentado en su casa, y con él estaban sentados los ancianos: y el rey envió á él un hombre. Mas antes que el mensajero viniese á él, dijo él á los ancianos: ¿No habéis visto como este hijo del homicida me envía á quitar la cabeza?
32राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागेमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”
33Aun estaba él hablando con ellos, y he aquí el mensajero que descendía á él; y dijo: Ciertamente este mal de Jehová viene. ¿Para qué tengo de esperar más á Jehová?
33अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्या जवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहू?”