1ASI me ha mostrado Jehová: y he aquí un canastillo de fruta de verano.
1परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या मी एक उन्हाळी फळांची टोपली पाहिली.
2Y dijo: ¿Qué ves, Amós? Y dije: Un canastillo de fruta de verano. Y díjome Jehová: Venido ha el fin sobre mi pueblo Israel; no le pasaré más.
2परमेश्वराने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.” मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे. ह्यापुढे मी त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करणार नाही.
3Y los cantores del templo aullarán en aquel día, dice el Señor Jehová; muchos serán los cuerpos muertos; en todo lugar echados serán en silencio.
3मंदिरातील गाण्याचे रूपांतर विलापिकेत होईल. परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील. लोक गुपचूप, प्रेते उचलतील आणि ढिगावर फेकतील.”
4Oid esto, los que tragáis á los menesterosos, y arruináis los pobres de la tierra,
4माझे ऐका! तुम्ही असहाय्य लोकांना तुडविता ह्या देशातील गरिबांचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात.
5Diciendo: ¿Cuándo pasará el mes, y venderemos el trigo; y la semana, y abriremos los alfolíes del pan, y achicaremos la medida, y engrandeceremos el precio, y falsearemos el peso engañoso;
5तुम्ही, व्यापारीलोक म्हणता “प्रतिपदा केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू शकू. शब्बाथ, केव्हा संपेल? म्हणजे मग आम्हाला गहू विकता येईल? आम्ही किंमत वाढवू शकतो आणि माप लहान करू शकतो तराजू आपल्या सोयीचे करून आपण लोकांना फसवू शकतो.
6Para comprar los pobres por dinero, y los necesitados por un par de zapatos, y venderemos las aechaduras del trigo?
6गरीब कर्ज फेडू शकत नाहीत, तेव्हा आपण त्यांना गुलाम म्हणून विकत घेऊ. एका जोड्याच्या किंमतीत आपण त्या असहाय्य लोकांना विकत घेऊ. हो! आणि जमिनीवर सांडलेले गहू आपण विकू शकू.”
7Jehová juró por la gloria de Jacob: No me olvidaré para siempre de todas sus obras.
7परमेश्वराने वचन दिले आहे त्याने त्याच्या नावाची, याकोबच्या अभिमानाची शपथ घेऊन वचन दिले. “त्या लोकांनी केलेली कृत्ये मी कधीही विसरणार नाही.
8¿No se ha de estremecer la tierra sobre esto? ¿Y todo habitador de ella no llorará? y subirá toda como un río, y será arrojada, y hundiráse como el río de Egipto.
8त्या कृत्यांमुळे सर्व भूमी हादरेल. ह्या देशात राहणारा प्रत्येकजण मृतासाठी रडेल. मिसरमधील नील नदीप्रमाणे, संपूर्ण देश वर फेकला जाऊन खाली आदळेल. देश हेलकावे खाईल.”
9Y acaecerá en aquel día, dice el Señor Jehová, que haré se ponga el sol al mediodía, y la tierra cubriré de tinieblas en el día claro.
9परमेश्वराने पुढील गोष्टीही सांगितल्या “त्या वेळी, मी सूर्याचा दुपारीच अस्त करीन. स्वच्छ निरभ्र दिवशी, मी जगावर अंधार पसरवीन.
10Y tornaré vuestras fiestas en lloro, y todos vuestros cantares en endechas; y haré poner saco sobre todos lomos, y peladura sobre toda cabeza; y tornaréla como en llanto de unigénito, y su postrimería como día amargo.
10मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन. तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील. मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”
11He aquí vienen días, dice el Señor Jehová, en los cuales enviaré hambre á la tierra, no hambre de pan, ni sed de agua, sino de oir palabra de Jehová.
11परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात उपासमार आणीन. ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल. ते पाण्यासाठी तहानेले नसतील परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
12E irán errantes de mar á mar: desde el norte hasta el oriente discurrirán buscando palabra de Jehová, y no la hallarán.
12लोक मृतसमुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील. परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील. पण त्यांना ते सापडणार नाहीत.
13En aquel tiempo las doncellas hermosas y los mancebos desmayarán de sed.
13त्या वेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील. शोमरोनच्या पापाच्या जोरावर त्यांनी वचने दिली. ते म्हणाले, ‘दान, तुझा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वकआम्ही वचन देतो....’ आणि ते म्हणाले, ‘जितका बैर-शेबा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वक आम्ही वचन देतो....’ हे लोक पडतील, आणि ते परत कधीही उठणार नहीत.”
14Los que juran por el pecado de Samaria, y dicen, Vive tu Dios de Dan: y, Vive el camino de Beer-seba: caerán, y nunca más se levantarán.
14[This verse may not be a part of this translation]