Spanish: Reina Valera (1909)

Marathi

Exodus

6

1JEHOVA respondió á Moisés: Ahora verás lo que yo haré á Faraón; porque con mano fuerte los ha de dejar ir; y con mano fuerte los ha de echar de su tierra.
1तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी आता फारोचे काय करतो ते तू बघशील; मी माझ्या महान सामर्थ्याचा त्याच्या विरुद्ध उपयोग करीन; मग तो माझ्या लोकांना जाऊ देईल. तो त्यांना जाऊ देण्यास एवढा तयार होईल की तो त्यांना बळजबरीने घालवून देईल।”
2Habló todavía Dios á Moisés, y díjole: Yo soy JEHOVA;
2मग देव मोशेला म्हणाला,
3Y aparecí á Abraham, á Isaac y á Jacob bajo el nombre de Dios Omnipotente, mas en mi nombre JEHOVA no me notifiqué á ellos.
3“मी परमेश्वर आहे मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना दर्शन दिले; त्यांनी मला ‘एल-शदाय’ असे नाव दिले; त्यांना ‘याव्हे’ (म्हणजे ‘परमेश्वर’) हे माझे नाव माहीत नव्हते.
4Y también establecí mi pacto con ellos, de darles la tierra de Canaán, la tierra en que fueron extranjeros, y en la cual peregrinaron.
4त्यांच्याशी पवित्र करार करून मी त्यांना कनान देश देण्याचे वचन दिले. ते त्या देशात राहिले परंतु तो देश त्यांचा स्वत:चा नव्हता; ते तेथे उपरे होते.
5Y asimismo yo he oído el gemido de los hijos de Israel, á quienes hacen servir los Egipcios, y heme acordado de mi pacto.
5आता मला इस्राएल लोकांच्या त्रासाविषयी, मिसरमधील त्यांच्या गुलामगिरी विषयी समजले आहे आणि त्यांच्याशी केलेल्या पवित्र कराराची मला आठवण आहे.
6Por tanto dirás á los hijos de Israel: YO JEHOVA; y yo os sacaré de debajo de las cargas de Egipto, y os libraré de su servidumbre, y os redimiré con brazo extendido, y con juicios grandes:
6तेव्हा त्यांना सांग, मी म्हणतो, ‘मी तुमचा परमेश्वर आहे; मी तुम्हास वाचवीन व तुम्हांस स्वतंत्र करीन; तुम्ही मिसरच्या लोकांचे गुलाम राहणार नाही. मी माझ्या महान सामर्थ्याचा उपयोग करून मिसरच्या लोकांना भयंकर शिक्षा करीन व मग तुम्हाला सोडवीन.
7Y os tomaré por mi pueblo y seré vuestro Dios: y vosotros sabréis que yo soy Jehová vuestro Dios, que os saco de debajo de las cargas de Egipto:
7तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन. मी तुमचा देव परमेश्वर आहे आणि मी तुम्हाला मिसरमधून सोडविले आहे हे तुम्हाला समजेल.
8Y os meteré en la tierra, por la cual alcé mi mano que la daría á Abraham, á Isaac y á Jacob: y yo os la daré por heredad. YO JEHOVA.
8मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी मोठा करार करून त्यांना वचन दिले की मी त्यांना एक विशेष देश देईन; तेव्हा त्या देशात मी तुम्हाला नेईन व तो देश तुम्हाला कायमचे वतन करून देईन. मी परमेश्वर आहे.”‘
9De esta manera habló Moisés á los hijos de Israel: mas ellos no escuchaban á Moisés á causa de la congoja de espíritu, y de la dura servidumbre.
9तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांना सांगितले. परंतु लोकांना एवढे काम करावे लागत होते की त्यामुळे त्यांना मोशेचे म्हणणे ऐकावयास उत्सुकता नसे म्हणून ते त्याचे ऐकेनात.
10Y habló Jehová á Moisés, diciendo:
10मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
11Entra, y habla á Faraón rey de Egipto, que deje ir de su tierra á los hijos de Israel.
11“जा व फारोला सांग की त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिलेच पाहिजे.”
12Y respondió Moisés delante de Jehová, diciendo: He aquí, los hijos de Israel no me escuchan: ¿cómo pues me escuchará Faraón, mayormente siendo yo incircunciso de labios?
12परंतु मोशेने उत्तर दिले, “इस्राएल लोकांनी माझे ऐकण्यास नाकारले! तेव्हा फारोही नक्कीच माझे ऐकणार नाही! मी अजिबात चांगला वक्ता नाही.”
13Entonces Jehová habló á Moisés y á Aarón, y dióles mandamiento para los hijos de Israel, y para Faraón rey de Egipto, para que sacasen á los hijos de Israel de la tierra de Egipto.
13परंतु परमेश्वर मोशे व अहरोन यांच्याशी बोलला आणि त्याने त्यांना इस्राएल लोकाकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याची, तसेच फारोकडे जाऊन त्याच्याशी बोलणी करण्याची आणि इस्राएल लोकांना मिसर मधून बाहेर घेऊन जाण्याची आज्ञा दिली.
14Estas son las cabezas de las familias de sus padres. Los hijos de Rubén, el primogénito de Israel: Hanoch y Phallú, Hezrón y Carmi: estas son las familias de Rubén.
14इस्राएल लोकांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रमुख पुरुंषांची नावे अशी:इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन. त्याची मुले हनोख, पल्लू, हस्त्रोन व कर्मी. ही रऊबेनाची कुळे:
15Los hijos de Simeón: Jemuel, y Jamín, y Ohad, y Jachîn, y Zoar, y Saúl, hijo de una Cananea: estas son las familias de Simeón.
15शिमोनाची मुले यमुवेल यामीन, ओहद, याखीन, जोहर व (कनानी स्त्री पोटी झालेला शौल.) ही शिमोनाची कुळे.
16Y estos son los nombres de los hijos de Leví por sus linajes: Gersón, y Coath, y Merari: Y los años de la vida de Leví fueron ciento treinta y siete años.
16लेवीचे आयुष्य एकशे सदतीस वर्षाचे होते. लेवीच्या वंशावळी प्रमाणे त्याच्या मुलांची नांवे ही: गेर्षोन, कहाथ, व मरारी.
17Y los hijos de Gersón: Libni, y Shimi, por sus familias.
17गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे: गेर्षोनाचे दोन मुलगे लिबनी व शिमी.
18Y los hijos de Coath: Amram, é Izhar, y Hebrón, y Uzziel. Y los años de la vida de Coath fueron ciento treinta y tres años.
18कहाथाचे मुलगे अम्राम. इसहार, हेब्रोन व उज्जियेल. कहाथाचे आयुष्य एकशे तेहतीस वर्षाचे होते.
19Y los hijos de Merari: Mahali, y Musi: estas son las familias de Leví por sus linajes.
19मरारीची मुले महली व मूशी, लेवीची कुळे त्याच्या वंशावळी प्रमाणे ही होती.
20Y Amram tomó por mujer á Jochêbed su tía, la cual le parió á Aarón y á Moisés. Y los años de la vida de Amram fueron ciento treinta y siete años.
20अम्रामाने आपली आत्या योखबेद हिच्यासी लग्न केले तिच्या पोटी त्याला अहरोन व मोशे ही दोन मुले झाली. अम्राम एकशे सदतीस वर्षे जगला.
21Y los hijos de Izhar: Cora, y Nepheg y Zithri.
21इसहाराची मुले-कोरह, नेफेग व जिख्री.
22Y los hijos de Uzziel: Misael, y Elzaphán y Zithri.
22उज्जियेलाची मुले: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.
23Y tomóse Aarón por mujer á Elisabeth, hija de Aminadab, hermana de Naasón; la cual le parió á Nadab, y á Abiú, y á Eleazar, y á Ithamar.
23अहरोनने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबची मुलगी व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाले.
24Y los hijos de Cora: Assir, y Elcana, y Abiasaph: estas son las familias de los Coritas.
24कोरहाची मुले: अस्सीर, एलकाना व अबीयासाफ; ही कोरहाची कुळे.
25Y Eleazar, hijo de Aarón, tomó para sí mujer de las hijas de Phutiel, la cual le parió á Phinees: Y estas son las cabezas de los padres de los Levitas por sus familias.
25अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटीयेलाच्या मुलीशी लग्न केले; तिच्या पोटी त्याला फिनहास हा मुलगा झाला. हे सर्वलोक म्हणजे इस्राएलाचा मुलगा लेवी याची वंशावळ होय.
26Este es aquel Aarón y aquel Moisés, á los cuales Jehová dijo: Sacad á los hijos de Israel de la tierra de Egipto por sus escuadrones.
26इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे देवाने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे ह्याच कुळातले.
27Estos son los que hablaron á Faraón rey de Egipto, para sacar de Egipto á los hijos de Israel. Moisés y Aarón fueron éstos.
27इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर जाऊ द्यावे असे मिसरचा राजा फारो याच्याशी जे बोलले तेच हे अहरोन व मोशे.
28Cuando Jehová habló á Moisés en la tierra de Egipto,
28मग मिसर देशात देव मोशे बरोबर बोलला.
29Entonces Jehová habló á Moisés, diciendo: Yo soy JEHOVA; di á Faraón rey de Egipto todas las cosas que yo te digo á ti.
29तो त्याला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसरचा राजा फारो याला सांग.”
30Y Moisés respondió delante de Jehová: He aquí, yo soy incircunciso de labios, ¿cómo pues me ha de oír Faraón?
30परंतु मोशेने उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.”