Spanish: Reina Valera (1909)

Marathi

Ezekiel

27

1Y FUÉ á mí palabra de Jehová, diciendo:
1मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
2Y tú, hijo del hombre, levanta endechas sobre Tiro.
2“मानवपुत्रा, सोरसाठी शोकगीत गा.
3Y dirás á Tiro, que está asentada á las entradas de la mar, mercadera de los pueblos de muchas islas: Así ha dicho el Señor Jehová: Tiro, tú has dicho: Yo soy de perfecta hermosura.
3तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग “सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस. तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस. समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस. ‘प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.
4En el corazón de las mares están tus términos: los que te edificaron completaron tu belleza.
4“सोर, तू स्वत:ला इतकी सुंदर समजतेस, की जणू काही सौंदर्यांची खाणच! तुझ्या शहराच्या सीमेवर भूमध्य समुद्र आहे. तुझ्या जहाजाप्रमाणे, तुझ्या कर्त्यांनी, तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
5De hayas del monte Senir te fabricaron todas las tillas: tomaron cedros del Líbano para hacerte el mástil.
5तुझ्या तक्तपोशीसाठी त्यांनी सनीरच्या सरुंचा उपयोग केला. तुझ्या डोलकाठीसाठी त्यांनी लबानोनचे गंधसरु वापरले.
6De castaños de Basán hicieron tus remos: compañía de Asirios hicieron tus bancos de marfil de las islas de Chittim.
6त्यांनी तुझी वल्ही बाशानमधील अल्लोन वृक्षापासून बनविली. त्यांनी तुझ्या डेकवरील खोली कित्ती बेटावरच्या बावस लाकडाची बनविली व ती हस्तिदंताने सजविली.
7De fino lino bordado de Egipto fué tu cortina, para que te sirviese de vela; de cárdeno y grana de las islas de Elisah fué tu pabellón.
7तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
8Los moradores de Sidón y de Arvad fueron tus remeros: tus sabios, oh Tiro, estaban en ti; ellos fueron tus pilotos.
8सीदोन व अर्वद येथील लोक तुझ्या नावा वल्हवीत असत. सोर, तुझे सुज्ञ लोक तुझे नावाडी होते.
9Los ancianos de Gebal y sus sabios repararon tus hendiduras: todas las galeras de la mar y los remeros de ellas fueron en ti para negociar tus negocios.
9गबालची वडील व कुशाल माणसे तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.’
10Persas y Lidios, y los de Phut, fueron en tu ejército tus hombres de guerra: escudos y capacetes colgaron en ti; ellos te dieron tu honra.
10“पारसी, लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते. तेच तुझे लढवय्ये वीर होते. आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले.
11Y los hijos de Arvad con tu ejército estuvieron sobre tus muros alrededor, y los Gammadeos en tus torres: sus escudos colgaron sobre tus muros alrededor; ellos completaron tu hermosura.
11अर्वाद येथील पहारेकरी तुझ्या वेशीवर पहारा करीत. गम्मादचे लोक बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर टांगीत त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णत्वाला नेले.
12Tarsis tu mercadera á causa de la multitud de todas riquezas en plata, hierro, estaño, y plomo, dió en tus ferias.
12“तार्शीश तुझा सर्वांत उत्तम ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तमोत्तम वस्तूंच्या मोबदल्यात तो चांदी, लोखंड, कथील व शिसे देत असे.
13Grecia, Tubal, y Mesec, tus mercaderes, con hombres y con vasos de metal, dieron en tus ferias.
13यावान, तुबाल आणि काळ्या समुद्राजवळचे लोक तुझ्याबरोबर व्यापार करीत. तुझ्याजवळील वस्तूंच्या मोबदल्यात ते गुलाम व कास्य देत.
14De la casa de Togarma, caballos y caballeros y mulos, dieron en tu mercado.
14तोगार्मा राष्ट्रातील लोक तुझ्याबरोबर घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे ह्यांचा व्यापार करीत.
15Los hijos de Dedán eran tus negociantes: muchas islas tomaban mercadería de tu mano; cuernos de marfil y pavos te dieron en presente.
15ददानी लोकसुद्धा तुझ्याशी व्यापार करीत. तू पुष्कळ ठिकाणी तुझ्या वस्तू विकत होतीस. त्या बदल्यात लोक तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड देत.
16Siria fué tu mercadera por la multitud de tus labores: con perlas, y púrpura, y vestidos bordados, y linos finos, y corales, y rubíes, dió en tus ferias.
16तुझ्याजवळ पुष्कळ चांगल्या वस्तू असल्याने अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला. ते तुझ्या मालाच्या मोबदल्यात पाचू. जांभळे कापड, सुंदर वीणकाम, तागाचे उत्तम कापड, पोवळे आणि माणके देत.
17Judá, y la tierra de Israel, eran tus mercaderes: con trigos de Minith, y pannah, y miel, y aceite, y resina, dieron en tu mercado.
17“यहूदा व इस्राएल ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या वस्तूंच्या मोबदल्यात गहू. आँलिव्ह, अंजिराचा पहिला बहर, मध, तेल आणि उपशामक औषध देत.
18Damasco, tu mercadera por la multitud de tus labores, por la abundancia de todas riquezas, con vino de Helbón, y lana blanca.
18दिमिष्क तुझा चांगला ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तम वस्तूंसाठी त्याने तुझ्याबरोबर व्यापार केला. तुझ्या मालाच्या मोबदल्यात तो तुला हेल्बोनचा द्राक्षरस व पांढरी लोकर देत.
19Asimismo Dan y el errante Javán dieron en tus ferias, para negociar en tu mercado de hierro labrado, mirra destilada, y caña aromática.
19दिमिष्क तुझ्याबरोबर उसालच्या द्राक्षरसाचा व्यापार करी. त्या मोबदल्यात ते पोलाद, एक प्रकारची दालचिनी, ऊस देत.
20Dedán fué tu mercadera con paños preciosos para carros.
20ददानचा तुझ्याबरोबर खोगीराच्या कापडाचा व रपेट करावयास लागणाऱ्या घोड्यांचा मोठा व्यापार होता.
21Arabia y todos los príncipes de Cedar, mercaderes de tu mano en corderos, y carneros, y machos cabríos: en estas cosas fueron tus mercaderes.
21अरबस्तानचा व केदारच्या सर्व नेत्यांचा तुझ्याबरोबर कोकरे, एडके आणि बोकड्यांचा मोठा व्यापार होता.
22Los mercaderes de Seba y de Raama fueron tus mercaderes: con lo principal de toda especiería, y toda piedra preciosa, y oro, dieron en tus ferias.
22“शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर उत्तम मसाले सर्व प्रकारचे जवाहीर आणि सोने यांचा व्यापार करीत.
23Harán, y Canneh, y Edén, los mercaderes de Seba, de Asiria, y Chilmad, contigo contrataban.
23हारान, कन्रे एदेन, शबा, अश्शूर व किल्मद
24Estos tus mercaderes negociaban contigo en varias cosas: en mantos de jacinto, y bordados, y en cajas de ropas preciosas, enlazadas con cordones, y en madera de cedro.
24येथील व्यापारी उंची वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, वेगवेगळ्या रंगाचे गालिचे, घट्ट विणीचे दोर व गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत.
25Las naves de Tarsis, tus cuadrillas, fueron en tu negociación: y fuiste llena, y fuiste multiplicada en gran manera en medio de los mares.
25तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत. “सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
26En muchas aguas te engolfaron tus remeros: viento solano te quebrantó en medio de los mares.
26तुझ्या नविकांनी तुला खोल समुद्रात नेले. पण पूर्वेचा जोरदार वारा तुझा समुद्रातील जहाजाचा नाश करील.
27Tus riquezas, y tus mercaderías, y tu negociación, tus remeros, y tus pilotos, los reparadores de tus hendiduras, y los agentes de tus negocios, y todos tus hombres de guerra que hay en ti, con toda tu compañía que en medio de ti se halla, caerán en medio
27“आणि तुझी सर्व संपत्ती समुद्रात सांडले. तुझी संपत्ती, विकायचा व विकत घेतलेला माल सर्व समुद्रात पडेल. तुझी सर्व माणसे. नावाडी, खलाशी आणि डांबराने भेगा बुजविणारे कारागीर समुद्रात पडतील. तुझ्या शहरातील सर्व व्यापारी आणि सैनिक समुद्रात बुडतील. तुझ्या नाशाच्या दिवशीच हे घडले.
28Al estrépito de las voces de tus marineros temblarán los arrabales.
28“तू, तुझ्या व्यापाऱ्यांना दुरवरच्या ठिकाणी पाठवितेस तुझ्या खलाशाचे रडणे ऐकून ती ठिकाणे भीतीने थरथर कापतील.
29Y descenderán de sus naves todos los que toman remo; remeros, y todos los pilotos de la mar se pararán en tierra:
29जहाजावरील सर्व कामगार नावाडी, खलाशी, जहाजावरुन समुद्रात उड्या घेतील व पोहून किनाऱ्याला लागतील.
30Y harán oir su voz sobre ti, y gritarán amargamente, y echarán polvo sobre sus cabezas, y se revolcarán en la ceniza.
30त्यांना तुझ्या स्थितीमुळे दु:ख वाटेल ते रडतील. ते डोक्यांत माती टाकतील, व राखेत लोळतील.
31Y haránse por ti calva, y se ceñirán de sacos, y endecharán por ti endechas amargas, con amargura de alma.
31ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील. शोकप्रदर्शक कपडे घालतील. मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.
32Y levantarán sobre ti endechas en sus lamentaciones, y endecharán sobre ti diciendo: ¿Quién como Tiro, como la destruída en medio de la mar?
32“ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील: “सोरसारखे कुणी नाही. सोरचा भर समुद्रात नाश झाला.
33Cuando tus mercaderías salían de las naves, hartabas muchos pueblos: los reyes de la tierra enriqueciste con la multitud de tus riquezas y de tus contrataciones.
33तुझे व्यापारी समुद्रापर करुन गेले. तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि तुझ्या मालाने तू अनेकांना तुप्त केलेस. तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
34En el tiempo que serás quebrantada de los mares en los profundos de las aguas, tu comercio y toda tu compañía caerán en medio de ti.
34“पण आता तू समुद्र व त्याचे खोल पाणी यामुळे फुटलीस. तुझा माल व माणसे समुद्रात पडली.
35Todos los moradores de las islas se maravillarán sobre ti, y sus reyes temblarán de espanto: inmutaránse en sus rostros.
35समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना तुझ्याबाबत धक्का बसला. त्यांचे राजे फारच घाबरले. त्यांच्या चेहऱ्यावरुनच, त्यांना केवढा धक्का बसला आहे, ते कळते.
36Los mercaderes en los pueblos silbarán sobre ti: vendrás á ser espanto, y dejarás de ser para siempre.
36दुसऱ्या राष्ट्रांतील व्यापारी धक्का बसल्यामुळे आपापासात कुजबुज करत आहेत. तुझ्या बाबतीत जे काही घडले, त्यामुळे लोक भयभीत होतील. का? कारण तुझा शेवट झाला. तुझा शेवट झाला”