1ERA entonces toda la tierra de una lengua y unas mismas palabras.
1जलप्रलयानंतर पृथ्वीवरील सर्व लोकांची एकच भाषा व एकच बोली होती,
2Y aconteció que, como se partieron de oriente, hallaron una vega en la tierra de Shinar, y asentaron allí.
2लोक पूर्वेकडून पुढे निघाले तेव्हा जाता जाता शिनार देशात त्यांना एक मोठे मैदान लागले आणि मग त्यांनी तेथेच वस्ती केली.
3Y dijeron los unos á los otros: Vaya, hagamos ladrillo y cozámoslo con fuego. Y fuéles el ladrillo en lugar de piedra, y el betún en lugar de mezcla.
3लोक म्हणाले, “चला, आपण विटा करु व त्या विस्तवात भाजू म्हणजे त्या खूप कठीण होतील; “तेव्हा लोकांनी घरे बांधण्यासाठी दगडाऐवजी विटांचा आणि चुन्याऐवजी डांबराचा उपयोग केला.
4Y dijeron: Vamos, edifiquémonos una ciudad y una torre, cuya cúspide llegue al cielo; y hagámonos un nombre, por si fuéremos esparcidos sobre la faz de toda la tierra.
4मग लोक म्हाणाले, “चला, आपण आपणासाठी नगर बांधू; आणि आकाशाला भिडणारा उंचच उंच बुरुज बांधू; असे केले तर मग आपण नावाजलेले लोक होऊ व आपण पांगले जाणार नाहीं तर एके जागी एकत्र राहू.”
5Y descendió Jehová para ver la ciudad y la torre que edificaban los hijos de los hombres.
5परमेश्वर ते नगर व तो उंच बुरुज पाहण्यासाठी खाली आला. लोक ते बांधीत आहेत असे परमेश्वराने पाहिले.
6Y dijo Jehová: He aquí el pueblo es uno, y todos éstos tienen un lenguaje: y han comenzado á obrar, y nada les retraerá ahora de lo que han pensando hacer.
6तेव्हा परमेश्वर म्हणाला, “हे सर्व लोक एकच भाषा बोलतात आणि हे बांधणीचे काम करण्यासाठी ते सगळे एकत्र जमले आहेत, ते काय करु शकतात त्याची ही तर नुसती सुरवात आहे; लवकरच ते त्यांना जे पाहिजे ते करु शकतील,
7Ahora pues, descendamos, y confundamos allí sus lenguas, para que ninguno entienda el habla de su compañero.
7तेव्हा आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करुन टाकू; मग मात्र त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाहीं,”
8Así los esparció Jehová desde allí sobre la faz de toda la tierra, y dejaron de edificar la ciudad.
8तेव्हा परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली म्हणून नगर व बुरुज बांधण्याचे काम तसेच राहिले.
9Por esto fué llamado el nombre de ella Babel, porque allí confudió Jehová el lenguaje de toda la tierra, y desde allí los esparció sobre la faz de toda la tierra.
9ह्याच ठिकाणी परमेश्वराने सर्व पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या नगराला बाबेल म्हटले आहे. अशा रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणापासून इतरत्र पसरण्यास लोकांना भाग पाडले.
10Estas son las generaciones de Sem: Sem, de edad de cien años, engendró á Arphaxad, dos años después del diluvio.
10शेमच्या कुळाची वंशावळ येणे प्रमाणे: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाल्यावर त्याचा मुलगा अर्पक्षद जन्मला;
11Y vivió Sem, después que engendró á Arphaxad quinientos años, y engendró hijos é hijas.
11त्यानंतर शेम पाचशे वर्षे जगला, आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
12Y Arphaxad vivió treinta y cinco años, y engendró á Sala.
12अर्पक्षद पस्तीस वर्षांचा असताना त्याचा मुलगा शेलह जन्मला
13Y vivió Arphaxad, después que engendró á Sala, cuatrocientos y tres años, y engendró hijos é hijas.
13शेलहच्या जन्मानंतर अर्पक्षद चारशेतीन वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
14Y vivió Sala treinta años, y engendró á Heber.
14शेलह तीस वर्षांचा असताना त्याला एबर झाला;
15Y vivió Sala, después que engendró á Heber, cuatrocientos y tres años, y engendró hijos é hijas.
15एबर झाल्यावर शेलह चारशेतीन वर्षे जगला व त्याच्या हयातीत त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
16Y vivió Heber treinta y cuatro años, y engendró á Peleg.
16एबर चौतीस वर्षांचा झाल्यावर त्याला पेलेग झाला.
17Y vivió Heber, después que engendró á Peleg, cuatrocientos y treinta años, y engendró hijos é hijas.
17पेलेग झाल्यावर एबर चारशेतीस वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
18Y vivió Peleg, treinta años, y engendró á Reu.
18पेलेग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला रऊ झाला;
19Y vivió Peleg, después que engendró á Reu, doscientos y nueve años, y engendró hijos é hijas.
19रऊ झाल्यावर पेलेग दोनशे नऊ वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
20Y Reu vivió treinta y dos años, y engendró á Serug.
20रऊ बत्तीस वर्षांचा झाल्यावर त्याला सरुग झाला;
21Y vivió Reu, después que engendró á Serug, doscientos y siete años, y engendró hijos é hijas.
21सरुग झाल्यावर रऊ दोनशे सात वर्षे जगला व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
22Y vivió Serug treinta años, y engendró á Nachôr.
22सरुग तीस वर्षांचा झाल्यावर त्याला नाहोर झाला.
23Y vivió Serug, después que engendró á Nachôr, doscientos años, y engendró hijos é hijas.
23नाहोर झाल्यावर सरुग दोनशें वर्षे जगला आणि त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
24Y vivió Nachôr veintinueve años, y engendró á Thare.
24नाहोर एकूणतीस वर्षांचा झाल्यावर त्याला तेरह झाला;
25Y vivió Nachôr, después que engendró á Thare, ciento diecinueve años, y engendró hijos é hijas.
25तेरह झाल्यावर नाहोर आणखी एकशें एकोणीस वर्षे जगला आणि त्याला इतर मुलगे व मुली झाल्या.
26Y vivió Thare setenta años, y engendró á Abram, y á Nachôr, y á Harán.
26तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याचे मुलगे अब्राम, हारान व नाहोर हे जन्मले.
27Estas son las generaciones de Thare: Thare engendró á Abram, y á Nachôr, y á Harán; y Harán engendró á Lot.
27तेरहच्या कुळाची वंशावळ येणेप्रमाणे: तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे मुलगे होते. हारानाचा मुलगा लोट.
28Y murió Harán antes que su padre Thare en la tierra de su naturaleza, en Ur de los Caldeos.
28हारान, आपला बाप तेरह जिवंत असताना आपली जन्मभूमी खास्द्यांचे ऊर अथवा बाबेल गांव येथे मरण पावला.
29Y tomaron Abram y Nachôr para sí mujeres: el nombre de la mujer de Abram fué Sarai, y el nombre de la mujer de Nachôr, Milca, hija de Harán, padre de Milca y de Isca.
29अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायाकोचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची मुलगी होती; हा हारान मील्का व इस्का यांचा बाप होता.
30Mas Sarai fué esteril, y no tenía hijo.
30साराय वांझ होती, तिला मूलबाळ नव्हते.
31Y tomó Thare á Abram su hijo, y á Lot hijo de Harán, hijo de su hijo, y á Sarai su nuera, mujer de Abram su hijo: y salió con ellos de Ur de los Caldeos, para ir á la tierra de Canaán: y vinieron hasta Harán, y asentaron allí.
31मग तेरह आपले कुटुंब घेऊन म्हणजे आपला मुलगा अब्राम, आपला नातू म्हणजे (हारानाचा मुलगा) लोट, आणि आपली सून म्हणजे (अब्रामाची बायको) साराय यांना बरोबर घेऊन बाबीलोनिया मधील म्हणजे खास्द्यांच्या ऊर येथून कनान देशास जाण्यासाठी निघाला: आणि प्रवास करीत ते हारान शहरात आले व तेथेच स्थायिक होण्याचे त्यांनी ठरविले.
32Y fueron los días de Thare doscientos y cinco años; y murió Thare en Harán.
32तेरह दोनशेंपाच वर्षे जगला; त्यानंतर तो हारान येथे मरण पावला.