1(H2-2) Y oró Jonás desde el vientre del pez á Jehová su Dios.
1माशाच्या पोटात असतानाच योनाने त्याच्या परमेश्वर देवाची प्रार्थना केली तो म्हणाला,
2(H2-3) Y dijo: Clamé de mi tribulación á Jehová, Y él me oyó; Del vientre del sepulcro clamé, Y mi voz oiste.
2“मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो. मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला ओ दिली. जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा, हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली आणि तू माझा आवाज ऐकलास.
3(H2-4) Echásteme en el profundo, en medio de los mares, Y rodeóme la corriente; Todas tus ondas y tus olas pasaron sobre mí.
3“तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.
4(H2-5) Y yo dije: Echado soy de delante de tus ojos: Mas aun veré tu santo templo.
4मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
5(H2-6) Las aguas me rodearon hasta el alma, Rodeóme el abismo; La ova se enredó á mi cabeza.
5“समुद्राच्या पाण्याने मला वेढले पाण्याने माझे तोंड बुडाले आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो मी खाली खूप खोल समुद्रात गेलो माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
6(H2-7) Descendí á las raíces de los montes; La tierra echó sus cerraduras sobre mí para siempre: Mas tú sacaste mi vida de la sepultura, oh Jehová Dios mío.
6मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो मला कायमचे असे बंदिवासात राहावे लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा, तू मला नवजीवन दिलेस!
7(H2-8) Cuando mi alma desfallecía en mí, acordéme de Jehová; Y mi oración entró hasta ti en tu santo templo.
7“माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.
8(H2-9) Los que guardan las vanidades ilusorias, Su misericordia abandonan.
8“काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.
9(H2-10) Yo empero con voz de alabanza te sacrificaré; Pagaré lo que prometí. La salvación pertenece á Jehová.
9फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”
10(H2-11) Y mandó Jehová al pez, y vomitó á Jonás en tierra.
10मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.