Spanish: Reina Valera (1909)

Marathi

Joshua

13

1Y SIENDO Josué ya viejo, entrado en días, Jehová le dijo: Tú eres ya viejo, de edad avanzada, y queda aún muy mucha tierra por poseer.
1यहोशवा आता वृध्द झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आता वय झाले आहे पण अजून बराच प्रदेश काबीज करायचा राहिला आहे.
2Esta es la tierra que queda; todos los términos de los Philisteos, y toda Gessuri;
2पलिष्टी आणि गशूरी यांचा प्रांत अजून घ्यायचा आहे.
3Desde Sihor, que está delante de Egipto, hasta el término de Accarón al norte, repútase de los Cananeos: cinco provincias de los Philisteos; los Gazeos, Asdodios, Ascalonitas, Getheos, y Accaronitas; y los Heveos;
3मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे.
4Al mediodía toda la tierra de los Cananeos, y Mehara que es de los Sidonios, hasta Aphec, hasta el término del Amorrheo;
4कनानी भूमीच्या दक्षिणेकडील अव्वी लोकांनाही पराभूत करायचे आहे.
5Y la tierra de los Gibleos, y todo el Líbano hacia donde sale el sol, desde Baal-gad á las raíces del monte Hermón, hasta entrar en Hamath;
5गिबली लोकही अजून राहिले आहेत. पूर्वेकडील. हर्मीन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथ येथे जायच्या ठिकाणापर्यंत सर्व लबानोन हा सुध्दा आहेच.
6Todos los que habitan en las montañas desde el Líbano hasta las aguas calientes, todos los Sidonios; yo los desarraigaré delante de lo hijos de Israel: solamente repartirás tú por suerte el país á los Israelitas por heredad, como te he mandado.
6“लबानोनापासून मिस्रपोथ-माईमपर्यंत पसरलेल्या डोंगराळ भागात सीदोनी राहतात. पण इस्राएल लोकांसाठी मी या सर्वांना तेथून हुसकावून लावीन. इस्राएल लोकांमध्ये तू जमिनीची वाटणी करशील तेव्हा या भागाचेही लक्षात असू दे मी सांगितल्याप्रमाणे वाटे कर.
7Parte, pues, tú ahora esta tierra en heredad á las nueve tribus, y á la media tribu de Manasés.
7आता, नऊ वंश आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्यात या देशाचे भाग कर.”
8Porque la otra media recibió su heredad con los Rubenitas y Gaditas, la cual les dió Moisés de la otra parte del Jordán al oriente, según que se la dió Moisés siervo de Jehová:
8रऊबेनी, गादी आणि मनश्शाच्या उरलेल्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा जमिनीतील वाटा पूर्वीच मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडील भाग त्यांचा दिला.
9Desde Aroer, que está á la orilla del arroyo de Arnón, y la ciudad que está en medio del arroyo, y toda la campiña de Medeba, hasta Dibón;
9आर्णीन खोऱ्या नजीकच्या अरोएर पासून त्यांचा प्रदेश सुरु होतो. तो खोऱ्याच्या मध्यावरील गावापर्यंत मेदबापासून दिबोनपर्यंतचे सलग पठार त्यात मोडते.
10Y todas las ciudades de Sehón rey de los Amorrheos, el cual reinó en Hesbón, hasta los términos de los hijos de Ammón;
10अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या आधिपत्याखाली असलेली सर्व गावे या प्रदेशात होती. हा राजा हेशबोनहून राज्य करत होता. अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सर्व नगरे
11Y Galaad, y los términos de Gessuri, y de Maachâti, y todo el monte de Hermón, y toda la tierra de Basán hasta Salchâ:
11तसेच गिलादांचे नगर व गशूरी आणि माकाथी यांचा प्रदेश येथपर्यंत ही जमीन भिडलेली होती. हर्मोन पर्वत, सलकापर्यंतचा सर्व बाशान त्यांच्या हद्दीत होता.
12Todo el reino de Og en Basán, el cual reinó en Astaroth y Edrei, el cual había quedado del residuo de los Rapheos; pues Moisés los hirió, y echó.
12बाशानमध्ये राज्य करीत असलेल्या ओगची राजधानीही त्यात येत होती. पूर्वी तो अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करत असे ओग रेफाई लोकांपैकी होय. मोशेने पूर्वी या लोकांचा पराभव करून त्यांची भूमी काबीज केली होती.
13Mas á los de Gessuri y Maachâti no echaron los hijos de Israel; antes Gessur y Maachât habitaron entre los Israelitas hasta hoy.
13तरी इस्राएल लोकांनी गशूरी माकाथी यांना घालवून दिले नाही. ते लोक आजही इस्राएल लोकांमध्ये राहात आहेत.
14Empero á la tribu de Leví no dió heredad: los sacrificios de Jehová Dios de Israel son su heredad, como él les había dicho.
14फक्त लेवी वंशाला तेवढा जमिनीत वाटा मिळालेला नाही त्याऐवजी, इस्राएलांच्या परमेश्वर देवाला अग्नीतून केलेली अन्नार्पणे त्यांना मिळतात. परमेश्वरानेच त्यांना तसे कबूल केले आहे.
15Dió, pues, Moisés á la tribu de los hijos de Rubén conforme á sus familias:
15रऊबेनी वंशाला त्यांच्यातील कुळाप्रमाणे मोशेने जमीन दिली. त्यांना मिळालेली जमीन अशी.
16Y fué el término de ellos desde Aroer, que está á la orilla del arroyo de Arnón, y la ciudad que está en medio del arroyo, y toda la campiña, hasta Medeba;
16आर्णोन खोऱ्यानजीकच्या अरोएर पासून मेदबा नगरापर्यंत, खोऱ्यामधले नगर व पठारी प्रदेश यात येतो.
17Hesbón, con todas sus villas que están en la llanura; Dibón, y Bamoth-baal, y Beth-baal-meón;
17तसेच हेशबोनपर्यंतची जमीन व पठारावरील सर्व नगरे या मुलखात मोडतात. ही नगरे म्हणजे दीबोन, बामोथ-बाल बेथ-बालमोन,
18Y Jaas, y Keddemoth, y Mephaath,
18याहस, कदेमोथ, मेफाथ,
19Y Chîriataim, y Sibma, y Zerethshahar en el monte del valle;
19किर्या-थईम, सिन्मा व खोऱ्यातील पहाडावरील सरेथ शहर,
20Y Beth-peor, y Asdoth-pisga, y Beth-jesimoth;
20बेथ-पौर, पिसगाची उतरणी आणि बेथ-यशिमोथ.
21Y todas las ciudades de la campiña, y todo el reino de Sehón rey de los Amorrheos, que reinó en Hesbón, al cual hirió Moisés, y á los príncipes de Madián, Hevi, Recem, y Sur, y Hur, y Reba, príncipes de Sehón que habitaban en aquella tierra.
21म्हणजेच हेशबोन येथील. अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख व पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा व मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते.
22También mataron á cuchillo los hijos de Israel á Balaam adivino, hijo de Beor, con los demás que mataron.
22बौराचा पुत्र बलाम यालाही इस्राएल लोकांनी पराभूत केले. (हा बलाम जादूटोणा करून भविष्य सांगत असे.) इस्राएल लोकांनी लढाईत पुष्कळ लोकांना ठार मारले.
23Y fueron los términos de los hijos de Rubén el Jordán con su término. Esta fué la herencia de los hijos de Rubén conforme á sus familias, estas ciudades con sus villas.
23रऊबेनींना दिलेल्या जमिनीची हद्द यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत होती. तेव्हा ही नगरे व त्यांचे प्रदेश हीच रऊबेनी कुळातील लोकांना दिलेली भूमी होय.
24Dió asimismo Moisés á la tribu de Gad, á los hijos de Gad, conforme á sus familias.
24गाद वंशालाही त्याच्या कुळांप्रमाणे मोशेने जमिनीत वाटा दिला तो असा:
25Y el término de ellos fué Jacer, y todas las ciudades de Galaad, y la mitad de la tierra de los hijos de Ammón hasta Aroer, que está delante de Rabba.
252याजेर आणि गिलादातील सर्व शहरे राब्बा जवळच्या अरोएरापर्यंतचा अम्मोनी लोकांचा अर्धा प्रदेशही मोशेने त्याना दिला.
26Y desde Hesbón hasta Ramath-mispe, y Betonim; y desde Mahanaim hasta el término de Debir:
26हेशबोनपासून रामाथ मिस्पापर्यंत व बतोनीम आणि महनाईमापासून दबीर पर्यंत.
27Y la campiña de Beth-aram, y Beth-nimra, y Sucoth, y Saphón, resto del reino de Sehón, rey en Hesbón: el Jordán y su término hasta el cabo de la mar de Cinnereth de la otra parte del Jordán al oriente.
27बेथहाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा बाकीचा भाग. एवढा यार्देनच्या पूर्वेकडील खोऱ्याचा भाग त्यांचा होता. गालील सरोवराच्या टोकापर्यंत या जमिनीची हद्द होती.
28Esta es la herencia de los hijos de Gad, por sus familias, estas ciudades con sus villas.
28गाद वंशातील सर्व कुळांना मोशेने वर वर्णन केलेली नगरे व गावे यांच्यासकटचा प्रदेश दिला.
29También dió Moisés herencia á la media tribu de Manasés: y fué de la media tribu de los hijos de Manasés, conforme á sus familias.
29मनश्शाच्या अध्या वंशाला मोशेने दिलेली जमीन अशी;
30El término de ellos fué desde Mahanaim, todo Basán, todo el reino de Og rey de Basán, y todas las aldeas de Jair que están en Basán, sesenta poblaciones.
30महनाईमापासून बाशानचा राजा ओग याच्या अधिपत्याखालील सर्व भूभाग, याईराची बाशानमधील सर्व नगरे (सगळी मिळून ती साठ होती.)
31Dióse además la mitad de Galaad, y Astaroth, y Edrei, ciudades del reino de Og en Basán, á los hijos de Machîr, hijo de Manasés, á la mitad de los hijos de Machîr conforme á sus familias.
31अर्धा गिलाद, अष्टारोथ व एद्रई (ओग राजाने या तिन्ही शहरात वास्तव्य केले होते.) मनश्शेचा मुलगा माखीर याच्या कुळाला ही जमीन मिळाली. म्हणजेच त्या अर्ध्या वंशाला ही जमीन मिळाली.
32Esto es lo que Moisés repartió en heredad en los llanos de Moab, de la otra parte del Jordán de Jericó, al oriente.
32यार्देनच्या पलीकडे. यरीहोच्या पूर्वेला मवाबाच्या पठारावर या सर्वांचा तळ असताना मोशेने त्यांना हा प्रदेश दिला.
33Mas á la tribu de Leví no dió Moisés heredad: Jehová Dios de Israel es la heredad de ellos como él les había dicho.
33लेवींना मोशेने जमिनीत वाटा दिला नाही. खुद्द इस्राएलाचा देव परमेश्वर हेच त्यांचे इनाम, हा परमेश्वराचा शब्द होता.