1ܡܛܠ ܗܢܐ ܚܝܒܝܢܢ ܕܝܬܝܪܐܝܬ ܢܗܘܐ ܙܗܝܪܝܢ ܒܡܕܡ ܕܫܡܥܢ ܕܠܐ ܢܦܠ ܀
1त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये.
2ܐܢ ܓܝܪ ܡܠܬܐ ܕܐܬܡܠܠܬ ܒܝܕ ܡܠܐܟܐ ܐܫܬܪܪܬ ܘܟܠ ܕܫܡܥܗ ܘܥܒܪ ܥܠܝܗ ܩܒܠ ܦܘܪܥܢܐ ܒܟܐܢܘܬܐ ܀
2कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.
3ܐܝܟܢܐ ܚܢܢ ܢܥܪܘܩ ܐܢ ܢܒܤܐ ܥܠ ܐܝܠܝܢ ܕܗܢܘܢ ܐܢܘܢ ܚܝܝܢ ܗܢܘܢ ܕܫܪܝܘ ܡܢ ܡܪܢ ܠܡܬܡܠܠܘ ܘܡܢ ܐܝܠܝܢ ܕܡܢܗ ܫܡܥܘ ܒܢ ܐܫܬܪܪܘ ܀
3तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
4ܟܕ ܤܗܕ ܥܠܝܗܘܢ ܐܠܗܐ ܒܐܬܘܬܐ ܘܒܬܕܡܪܬܐ ܘܒܚܝܠܐ ܡܫܚܠܦܐ ܘܒܦܘܠܓܐ ܕܪܘܚܐ ܕܩܘܕܫܐ ܕܐܬܝܗܒܘ ܐܝܟ ܨܒܝܢܗ ܀
4देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि तिरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
5ܠܐ ܗܘܐ ܓܝܪ ܠܡܠܐܟܐ ܫܥܒܕ ܥܠܡܐ ܕܥܬܝܕ ܕܥܠܘܗܝ ܡܡܠܠܝܢܢ ܀
5जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत.
6ܐܠܐ ܐܝܟ ܕܡܤܗܕ ܟܬܒܐ ܘܐܡܪ ܡܢܘ ܓܒܪܐ ܕܥܗܕܬܝܗܝ ܘܒܪܗ ܕܐܢܫܐ ܕܤܥܪܬܝܗܝ ܀
6पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे: “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावास?
7ܐܡܟܬܝܗܝ ܩܠܝܠ ܡܢ ܡܠܐܟܐ ܬܫܒܘܚܬܐ ܘܐܝܩܪܐ ܤܡܬ ܒܪܝܫܗ ܘܐܫܠܛܬܝܗܝ ܒܥܒܕܐ ܕܐܝܕܝܟ ܀
7थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8ܘܟܠ ܡܕܡ ܫܥܒܕܬ ܬܚܝܬ ܪܓܠܘܗܝ ܒܗܝ ܕܝܢ ܕܟܠ ܡܕܡ ܫܥܒܕ ܠܗ ܠܐ ܫܒܩ ܡܕܡ ܕܠܐ ܡܫܥܒܕ ܗܫܐ ܕܝܢ ܠܐ ܥܕܟܝܠ ܚܙܝܢܢ ܕܟܠ ܡܕܡ ܡܫܥܒܕ ܠܗ ܀
8तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” स्तोत्र. 8:4-6 देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही.
9ܗܘ ܕܝܢ ܕܡܟ ܩܠܝܠ ܡܢ ܡܠܐܟܐ ܚܙܝܢܢ ܕܗܘܝܘ ܝܫܘܥ ܡܛܠ ܚܫܐ ܕܡܘܬܗ ܘܬܫܒܘܚܬܐ ܘܐܝܩܪܐ ܤܝܡ ܒܪܝܫܗ ܗܘ ܓܝܪ ܒܛܝܒܘܬܗ ܐܠܗܐ ܚܠܦ ܟܠܢܫ ܛܥܡ ܡܘܬܐ ܀
9परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10ܝܐܐ ܗܘܐ ܓܝܪ ܠܗܘ ܕܟܠ ܒܐܝܕܗ ܘܟܠ ܡܛܠܬܗ ܘܒܢܝܐ ܤܓܝܐܐ ܐܥܠ ܠܬܫܒܘܚܬܐ ܕܠܪܝܫܐ ܕܚܝܝܗܘܢ ܒܚܫܗ ܢܓܡܪܝܘܗܝ ܀
10देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11ܗܘ ܓܝܪ ܕܩܕܫ ܘܗܢܘܢ ܕܐܬܩܕܫܘ ܡܢ ܚܕ ܐܢܘܢ ܟܠܗܘܢ ܡܛܠ ܗܢܐ ܠܐ ܒܗܬ ܕܢܩܪܐ ܐܢܘܢ ܐܚܘܗܝ ܀
11जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही.
12ܟܕ ܐܡܪ ܐܤܒܪ ܫܡܟ ܠܐܚܝ ܘܒܓܘܗ ܕܥܕܬܐ ܐܫܒܚܟ ܀
12येशू म्हणतो, “मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” स्तोत्र. 22:22
13ܘܬܘܒ ܕܐܢܐ ܐܗܘܐ ܬܟܝܠ ܥܠܘܗܝ ܘܬܘܒ ܗܐ ܐܢܐ ܘܒܢܝܐ ܕܝܗܒ ܠܝ ܐܠܗܐ ܀
13तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.” यशया 8:17 आणि तो पुन्हा म्हणतो, “येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” यशया 8:18
14ܡܛܠ ܓܝܪ ܕܒܢܝܐ ܐܫܬܘܬܦܘ ܒܒܤܪܐ ܘܕܡܐ ܐܦ ܗܘ ܒܗ ܒܕܡܘܬܐ ܐܫܬܘܬܦ ܒܗܝܢ ܒܗܠܝܢ ܕܒܡܘܬܗ ܢܒܛܠ ܠܡܢ ܕܐܚܝܕ ܫܘܠܛܢܐ ܕܡܘܬܐ ܕܐܝܬܘܗܝ ܤܛܢܐ ܀
14म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
15ܘܢܫܪܐ ܠܗܢܘܢ ܐܝܠܝܢ ܕܒܕܚܠܬܐ ܕܡܘܬܐ ܒܟܠܗܘܢ ܚܝܝܗܘܢ ܡܫܥܒܕܝܢ ܗܘܘ ܠܥܒܕܘܬܐ ܀
15आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
16ܠܐ ܗܘܐ ܓܝܪ ܥܠ ܡܠܐܟܐ ܡܫܠܛ ܗܘܐ ܡܘܬܐ ܐܠܐ ܥܠ ܙܪܥܗ ܕܐܒܪܗܡ ܡܫܠܛ ܗܘܐ ܀
16कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,
17ܡܛܠ ܗܢܐ ܙܕܩ ܗܘܐ ܕܒܟܠ ܡܕܡ ܢܬܕܡܐ ܠܐܚܘܗܝ ܕܢܗܘܐ ܡܪܚܡܢܐ ܘܪܒ ܟܘܡܪܐ ܡܗܝܡܢܐ ܒܕܐܠܗܐ ܘܢܗܘܐ ܡܚܤܐ ܥܠ ܚܛܗܘܗܝ ܕܥܡܐ ܀
17या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.
18ܒܗܝ ܓܝܪ ܕܗܘ ܚܫ ܘܐܬܢܤܝ ܡܫܟܚ ܕܢܥܕܪ ܠܐܝܠܝܢ ܕܡܬܢܤܝܢ ܀
18कारण ज्याअर्थी त्याला स्वत:ला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.