Syriac: NT

Marathi

Matthew

22

1ܘܥܢܐ ܬܘܒ ܝܫܘܥ ܒܡܬܠܐ ܘܐܡܪ ܀
1येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकादा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला,
2ܐܬܕܡܝܬ ܡܠܟܘܬܐ ܕܫܡܝܐ ܠܓܒܪܐ ܡܠܟܐ ܕܥܒܕ ܡܫܬܘܬܐ ܠܒܪܗ ܀
2स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.
3ܘܫܕܪ ܠܥܒܕܘܗܝ ܕܢܩܪܘܢ ܠܡܙܡܢܐ ܠܡܫܬܘܬܐ ܘܠܐ ܨܒܘ ܠܡܐܬܐ ܀
3त्याने त्याच्या नोकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते आशाना बोलाविण्यास सांगिले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला.
4ܬܘܒ ܫܕܪ ܥܒܕܐ ܐܚܪܢܐ ܘܐܡܪ ܐܡܪܘ ܠܡܙܡܢܐ ܕܗܐ ܫܪܘܬܝ ܡܛܝܒܐ ܘܬܘܪܝ ܘܡܦܛܡܝ ܩܛܝܠܝܢ ܘܟܠ ܡܕܡ ܡܛܝܒ ܬܘ ܠܡܫܬܘܬܐ ܀
4नंतर राजाने आणखी काही नोकरांना पाठवून दिले. राजा नोकरांना म्हणाला, मी त्या लोकांना अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे. मी चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणी सगळे तयार आहे. लग्नाच्या मेजवानीस या!’
5ܗܢܘܢ ܕܝܢ ܒܤܘ ܘܐܙܠܘ ܐܝܬ ܕܠܩܪܝܬܗ ܘܐܝܬ ܕܠܬܐܓܘܪܬܗ ܀
5नोकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगतले, पण त्यांनी नोकरांच्याकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.
6ܫܪܟܐ ܕܝܢ ܐܚܕܘ ܠܥܒܕܘܗܝ ܘܨܥܪܘ ܘܩܛܠܘ ܀
6काहींनी मालकाच्या उरलेल्या नोकरांना पकडून मार दिला व जिवे मारले.
7ܟܕ ܫܡܥ ܕܝܢ ܡܠܟܐ ܪܓܙ ܘܫܕܪ ܚܝܠܘܬܗ ܐܘܒܕ ܠܩܛܘܠܐ ܗܢܘܢ ܘܠܡܕܝܢܬܗܘܢ ܐܘܩܕ ܀
7राजा फार रागावला. त्याने त्याचे सैन्य पाठविले आणि त्यांनी त्या खुन्यांना ठार मारले. त्यांनी त्यांचे शहर जाळले.
8ܗܝܕܝܢ ܐܡܪ ܠܥܒܕܘܗܝ ܡܫܬܘܬܐ ܡܛܝܒܐ ܘܗܢܘܢ ܕܡܙܡܢܝܢ ܗܘܘ ܠܐ ܫܘܝܢ ܗܘܘ ܀
8“मग राजा त्याच्या नोकरांना म्हणाला, ‘मेजवानी तयार आहे, पण ज्यांना बोलाविले होते ते पात्र नव्हते,
9ܙܠܘ ܗܟܝܠ ܠܡܦܩܢܐ ܕܐܘܪܚܬܐ ܘܟܠ ܡܢ ܕܡܫܟܚܝܢ ܐܢܬܘܢ ܩܪܘ ܠܡܫܬܘܬܐ ܀
9म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यांवर जा आणि तेथे तुम्हांला जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा.
10ܘܢܦܩܘ ܥܒܕܐ ܗܢܘܢ ܠܐܘܪܚܬܐ ܘܟܢܫܘ ܟܠ ܕܐܫܟܚܘ ܒܝܫܐ ܘܛܒܐ ܘܐܬܡܠܝ ܒܝܬ ܡܫܬܘܬܐ ܤܡܝܟܐ ܀
10मग ते नोकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्या ठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे नोकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांना जमा केले आणि ती जागा भरून गेली.
11ܘܥܠ ܡܠܟܐ ܕܢܚܙܐ ܤܡܝܟܐ ܘܚܙܐ ܬܡܢ ܓܒܪܐ ܕܠܐ ܠܒܝܫ ܠܒܘܫܐ ܕܡܫܬܘܬܐ ܀
11“मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. मेजवानीसाठी साजेल असा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला.
12ܘܐܡܪ ܠܗ ܚܒܪܝ ܐܝܟܢܐ ܥܠܬ ܠܟܐ ܟܕ ܢܚܬܐ ܕܡܫܬܘܬܐ ܠܝܬ ܠܟ ܗܘ ܕܝܢ ܐܫܬܬܩ ܀
12राजा त्याला म्हणला, ‘मित्रा, तुला तेथे कोणी व कसे येऊ दिले? मेजवानीला साजेसे कपडे नसताना तू येथे कसा आलास?’ पण तो गप्प राहिला.
13ܗܝܕܝܢ ܐܡܪ ܡܠܟܐ ܠܡܫܡܫܢܐ ܐܤܘܪܘ ܐܝܕܘܗܝ ܘܪܓܠܘܗܝ ܘܐܦܩܘܗܝ ܠܚܫܘܟܐ ܒܪܝܐ ܬܡܢ ܢܗܘܐ ܒܟܝܐ ܘܚܘܪܩ ܫܢܐ ܀
13तेव्हा राजाने नोकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्याला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.’
14ܤܓܝܐܝܢ ܐܢܘܢ ܓܝܪ ܩܪܝܐ ܘܙܥܘܪܝܢ ܓܒܝܐ ܀
14“कारण बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे.”
15ܗܝܕܝܢ ܐܙܠܘ ܦܪܝܫܐ ܢܤܒܘ ܡܠܟܐ ܕܐܝܟܢܐ ܢܨܘܕܘܢܝܗܝ ܒܡܠܬܐ ܀
15मग परूशी गेले आणि येशूला कसे पकडावे याचा कट करू लागले. त्याला शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू लागले.
16ܘܫܕܪܘ ܠܘܬܗ ܬܠܡܝܕܝܗܘܢ ܥܡ ܕܒܝܬ ܗܪܘܕܤ ܘܐܡܪܝܢ ܠܗ ܡܠܦܢܐ ܝܕܥܝܢܢ ܕܫܪܝܪ ܐܢܬ ܘܐܘܪܚܐ ܕܐܠܗܐ ܒܩܘܫܬܐ ܡܠܦ ܐܢܬ ܘܠܐ ܫܩܝܠ ܐܢܬ ܨܦܬܐ ܕܐܢܫ ܠܐ ܓܝܪ ܢܤܒ ܐܢܬ ܒܐܦܐ ܕܐܢܫܐ ܀
16परूशांनी येशूला फसविण्याच्या हेतूने काही माणसे त्याच्याकडे पाठविली. त्यांनी आपली काही माणसे (शिष्य) आणि हेरीदी गटाच्या काही लोकांना येशूकडे पाठविले. ते म्हणाले, गुरुजी, आम्हांला माहीत आहे की आपण सत्यवचनी आहात, आणि तुम्ही देवाचा मार्ग प्रामाणिकपणे शिकविता, व दुसरे काय विचार करतात याची तुम्ही पर्वा करीत नाही. तुम्ही सर्वाना समान मानता.
17ܐܡܪ ܠܢ ܗܟܝܠ ܐܝܟܢܐ ܡܬܚܙܐ ܠܟ ܫܠܝܛ ܠܡܬܠ ܟܤܦ ܪܫܐ ܠܩܤܪ ܐܘ ܠܐ ܀
17म्हणून तुमचे मत आम्हांला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”
18ܝܫܘܥ ܕܝܢ ܝܕܥ ܒܝܫܘܬܗܘܢ ܘܐܡܪ ܡܢܐ ܡܢܤܝܢ ܐܢܬܘܢ ܠܝ ܢܤܒܝ ܒܐܦܐ ܀
18येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला. ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहेत?
19ܚܘܐܘܢܝ ܕܝܢܪܐ ܕܟܤܦ ܪܫܐ ܗܢܘܢ ܕܝܢ ܩܪܒܘ ܠܗ ܕܝܢܪܐ ܀
19कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले.
20ܘܐܡܪ ܠܗܘܢ ܝܫܘܥ ܕܡܢܘ ܨܠܡܐ ܗܢܐ ܘܟܬܒܐ ܀
20तेव्हा येशूने विचारले, या नाण्यावर कोणाचे चित्र आहे? आणि या नाण्यावर कोणाचे नाव लिहिलेले आहे?”
21ܐܡܪܝܢ ܕܩܤܪ ܐܡܪ ܠܗܘܢ ܗܒܘ ܗܟܝܠ ܕܩܤܪ ܠܩܤܪ ܘܕܐܠܗܐ ܠܐܠܗܐ ܀
21त्या लोकांनी उत्तर दिले, त्यावर कैसराचे चित्र व नाव दिले आहे.” यावर येशू त्यांना म्हणाला, जे कैसराचे आहे ते कैसराला द्या. आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या!”
22ܘܟܕ ܫܡܥܘ ܐܬܕܡܪܘ ܘܫܒܩܘܗܝ ܘܐܙܠܘ ܀
22येशू जे म्हाणाला ते त्या लोकांनी ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि तेथून निघून गेले.
23ܒܗܘ ܝܘܡܐ ܩܪܒܘ ܙܕܘܩܝܐ ܘܐܡܪܝܢ ܠܗ ܠܝܬ ܚܝܬ ܡܝܬܐ ܘܫܐܠܘܗܝ ܀
23त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले (हे लोक असे समजातात की पुनरूत्थान नाही) त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला,
24ܘܐܡܪܝܢ ܠܗ ܡܠܦܢܐ ܡܘܫܐ ܐܡܪ ܠܢ ܕܐܢ ܐܢܫ ܢܡܘܬ ܟܕ ܠܝܬ ܠܗ ܒܢܝܐ ܢܤܒ ܐܚܘܗܝ ܐܢܬܬܗ ܘܢܩܝܡ ܙܪܥܐ ܠܐܚܘܗܝ ܀
24ते म्हणाले, गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मेला आणि त्याला मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने किंवा जवळच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मेलेल्या भावासाठी त्यांना मुले होतील.
25ܐܝܬ ܗܘܘ ܕܝܢ ܠܘܬܢ ܐܚܐ ܫܒܥܐ ܩܕܡܝܐ ܫܩܠ ܐܢܬܬܐ ܘܡܝܬ ܘܕܠܝܬ ܗܘܐ ܠܗ ܒܢܝܐ ܫܒܩܗ ܐܢܬܬܗ ܠܐܚܘܗܝ ܀
25आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले.
26ܗܟܘܬ ܐܦ ܗܘ ܕܬܪܝܢ ܘܐܦ ܗܘ ܕܬܠܬܐ ܘܥܕܡܐ ܠܫܒܥܬܝܗܘܢ ܀
26असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मेले.
27ܒܚܪܬܐ ܕܝܢ ܕܟܠܗܘܢ ܡܝܬܬ ܐܦ ܐܢܬܬܐ ܀
27शेवटी ती स्त्री मेली.
28ܒܩܝܡܬܐ ܗܟܝܠ ܠܐܝܢܐ ܡܢ ܗܠܝܢ ܫܒܥܐ ܬܗܘܐ ܐܢܬܬܐ ܟܠܗܘܢ ܓܝܪ ܢܤܒܘܗ ܀
28आता प्रश्न असा आहे की, पुनरूत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्यांशी लग्न केले होते.”
29ܥܢܐ ܝܫܘܥ ܘܐܡܪ ܠܗܘܢ ܛܥܝܢ ܐܢܬܘܢ ܕܠܐ ܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܟܬܒܐ ܘܠܐ ܚܝܠܗ ܕܐܠܗܐ ܀
29उत्तर देताना येशू त्यांना म्हणाला, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हांला देवाचे वचन किंवा सामर्थ्य माहीत नाही.
30ܒܩܝܡܬܐ ܓܝܪ ܕܡܝܬܐ ܠܐ ܢܤܒܝܢ ܢܫܐ ܐܦܠܐ ܢܫܐ ܗܘܝܢ ܠܓܒܪܐ ܐܠܐ ܐܝܟ ܡܠܐܟܐ ܕܐܠܗܐ ܒܫܡܝܐ ܐܝܬܝܗܘܢ ܀
30तुम्हांला समजले पाहिजे की, पुनरूत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत. उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.
31ܥܠ ܩܝܡܬܐ ܕܝܢ ܕܡܝܬܐ ܠܐ ܩܪܝܬܘܢ ܡܕܡ ܕܐܬܐܡܪ ܠܟܘܢ ܡܢ ܐܠܗܐ ܕܐܡܪ ܀
31तरी, मृतांच्या पुनरूत्थानाच्या संदर्भात देव तुमच्या फायद्यासाठी जे बोलला ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले काय?
32ܕܐܢܐ ܐܢܐ ܐܠܗܗ ܕܐܒܪܗܡ ܐܠܗܗ ܕܐܝܤܚܩ ܐܠܗܗ ܕܝܥܩܘܒ ܘܐܠܗܐ ܠܐ ܗܘܐ ܕܡܝܬܐ ܐܠܐ ܕܚܝܐ ܀
32तो म्हणाला, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ हा देव मेलेल्यांचा देव नाही तर जिवंत लोकांचा देव आहे.”
33ܘܟܕ ܫܡܥܘ ܟܢܫܐ ܡܬܬܡܗܝܢ ܗܘܘ ܒܝܘܠܦܢܗ ܀
33जेव्हा जमावाने हे ऐकले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले.
34ܦܪܝܫܐ ܕܝܢ ܟܕ ܫܡܥܘ ܕܫܬܩ ܠܙܕܘܩܝܐ ܐܬܟܢܫܘ ܐܟܚܕܐ ܀
34येशूने सदूकी लोकांना अशा बोधकथा सांगितल्या की त्यांना वाद घलता येईना. हे परूश्यांनी ऐकले. म्हणून परूश्यांनी एकत्र येऊन मसलत केली.
35ܘܫܐܠܗ ܚܕ ܡܢܗܘܢ ܕܝܕܥ ܢܡܘܤܐ ܟܕ ܡܢܤܐ ܠܗ ܀
35एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.
36ܡܠܦܢܐ ܐܝܢܐ ܦܘܩܕܢܐ ܪܒ ܒܢܡܘܤܐ ܀
36त्याने विचारले, गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?”
37ܝܫܘܥ ܕܝܢ ܐܡܪ ܠܗ ܕܬܪܚܡ ܠܡܪܝܐ ܐܠܗܟ ܡܢ ܟܠܗ ܠܒܟ ܘܡܢ ܟܠܗ ܢܦܫܟ ܘܡܢ ܟܠܗ ܚܝܠܟ ܘܡܢ ܟܠܗ ܪܥܝܢܟ ܀
37येशूने उत्तर दिले, प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’
38ܗܢܘ ܦܘܩܕܢܐ ܪܒܐ ܘܩܕܡܝܐ ܀
38ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.
39ܘܕܬܪܝܢ ܕܕܡܐ ܠܗ ܕܬܪܚܡ ܠܩܪܝܒܟ ܐܝܟ ܢܦܫܟ ܀
39हिच्यासारखी दुसरी एक आहे: ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा.
40ܒܗܠܝܢ ܬܪܝܢ ܦܘܩܕܢܝܢ ܬܠܝܐ ܐܘܪܝܬܐ ܘܢܒܝܐ ܀
40सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
41ܟܕ ܟܢܝܫܝܢ ܕܝܢ ܦܪܝܫܐ ܫܐܠ ܐܢܘܢ ܝܫܘܥ ܀
41म्हणून परूशी एकत्र उभे असताना, येशूने त्यांना प्रश्न केला.
42ܘܐܡܪ ܡܢܐ ܐܡܪܝܢ ܐܢܬܘܢ ܥܠ ܡܫܝܚܐ ܒܪ ܡܢܘ ܐܡܪܝܢ ܠܗ ܒܪ ܕܘܝܕ ܀
42येशू म्हणाला, ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.”
43ܐܡܪ ܠܗܘܢ ܘܐܝܟܢܐ ܕܘܝܕ ܒܪܘܚ ܩܪܐ ܠܗ ܡܪܝܐ ܐܡܪ ܓܝܪ ܀
43त्यावर येशू त्यांना म्हणाला, मग दाविदाने त्याला प्रभु असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,
44ܕܐܡܪ ܡܪܝܐ ܠܡܪܝ ܬܒ ܠܟ ܡܢ ܝܡܝܢܝ ܥܕܡܐ ܕܐܤܝܡ ܒܥܠܕܒܒܝܟ ܬܚܝܬ ܪܓܠܝܟ ܀
44प्रभु माझ्या प्रभूला (ख्रिस्ताला) म्हणाला, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.’ स्तोत्र. 110:1
45ܐܢ ܗܟܝܠ ܕܘܝܕ ܩܪܐ ܠܗ ܡܪܝܐ ܐܝܟܢܐ ܒܪܗ ܗܘ ܀ 46 ܘܠܐ ܐܢܫ ܐܫܟܚ ܕܢܬܠ ܠܗ ܦܬܓܡܐ ܘܠܐ ܐܢܫ ܐܡܪܚ ܬܘܒ ܡܢ ܗܘ ܝܘܡܐ ܠܡܫܐܠܘܬܗ ܀
45आता, मग जर दाविद त्याला प्रभु म्हणातो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो?”
46
46पण परूश्यांपैकी कोणीही त्याच्या प्रश्र्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्या दिवसानंतर त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणीही केले नाही.