Syriac: NT

Marathi

Romans

6

1ܡܢܐ ܗܟܝܠ ܢܐܡܪ ܢܩܘܐ ܒܗ ܒܚܛܝܬܐ ܕܛܝܒܘܬܐ ܬܬܝܬܪ ܀
1तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय?
2ܚܤ ܐܝܠܝܢ ܓܝܪ ܕܡܝܬܢ ܠܚܛܝܬܐ ܐܝܟܢܐ ܢܚܐ ܒܗ ܬܘܒ ܀
2खात्रीने नाही. आपण जे पापाला मेलो ते अजूनही जिवंत कसे राहू?
3ܐܘ ܠܐ ܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܕܐܝܠܝܢ ܕܥܡܕܢ ܒܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܒܡܘܬܗ ܗܘ ܥܡܕܢ ܀
3तुम्हांला माहीत नाही का की ज्या आपण प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला होता त्या आपला त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला.
4ܐܬܩܒܪܢ ܥܡܗ ܒܡܥܡܘܕܝܬܐ ܠܡܘܬܐ ܕܐܝܟܢܐ ܕܩܡ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܡܢ ܒܝܬ ܡܝܬܐ ܒܬܫܒܘܚܬܐ ܕܐܒܘܗܝ ܗܟܢܐ ܐܦ ܚܢܢ ܒܚܝܐ ܚܕܬܐ ܢܗܠܟ ܀
4म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो यासाठी की, पित्याच्या गौरवाने ख्रिस्त जसा मेलेल्यांतून उठविला गेला तसे आम्हीही जीवनाच्या नवीनपणात चालावे.
5ܐܢ ܓܝܪ ܐܟܚܕ ܐܬܢܨܒܢ ܥܡܗ ܒܕܡܘܬܐ ܕܡܘܬܗ ܗܟܢܐ ܐܦ ܒܩܝܡܬܗ ܢܗܘܐ ܀
5कारण जर त्याच्या मरणाच्या प्रतिरुपाने आपण त्याच्याशी जोडलो आहोत, तर त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रतिरुपाने त्याच्याशी जोडले जाऊ.
6ܝܕܥܝܢܢ ܓܝܪ ܕܒܪܢܫܢ ܥܬܝܩܐ ܐܙܕܩܦ ܥܡܗ ܕܢܬܒܛܠ ܦܓܪܐ ܕܚܛܝܬܐ ܕܬܘܒ ܠܐ ܢܫܡܫ ܠܚܛܝܬܐ ܀
6आपणांला हे माहीत आहे की, आपल्यातील जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळला गेला यासाठी की आपल्या पापमय शरीराचा नाश व्हावा व यापुढे आपण पापाचे दास होऊ नये.
7ܐܝܢܐ ܕܡܝܬ ܓܝܪ ܐܬܚܪܪ ܠܗ ܡܢ ܚܛܝܬܐ ܀
7कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.
8ܐܢ ܗܟܝܠ ܡܝܬܢ ܥܡ ܡܫܝܚܐ ܢܗܝܡܢ ܕܥܡܗ ܥܡ ܡܫܝܚܐ ܢܚܐ ܀
8आणि जर आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर आम्ही विश्वास धरतो की, त्याच्याबरोबर जिवंतही राहू.
9ܝܕܥܝܢܢ ܓܝܪ ܕܡܫܝܚܐ ܩܡ ܡܢ ܒܝܬ ܡܝܬܐ ܘܬܘܒ ܠܐ ܡܐܬ ܘܡܘܬܐ ܠܐ ܡܫܬܠܛ ܒܗ ܀
9कारण आम्हांस माहीत आहे की, ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला तो यापुढे मरणार नाही. मरणाची त्याच्यावर सत्ता चालणार नाही.
10ܕܡܝܬ ܓܝܪ ܠܚܛܝܬܐ ܗܘ ܡܝܬ ܚܕܐ ܙܒܢ ܘܕܚܝ ܚܝ ܗܘ ܠܐܠܗܐ ܀
10जे मरण तो मेला ते एकदाच पापासाठी मेला, परंतु जे जीवन तो जगतो ते तो देवासाठी जगतो.
11ܗܟܢܐ ܐܦ ܐܢܬܘܢ ܚܫܘܒܘ ܢܦܫܟܘܢ ܕܡܝܬܐ ܐܢܬܘܢ ܠܚܛܝܬܐ ܘܚܝܐ ܐܢܬܘܢ ܠܐܠܗܐ ܒܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
11त्याच रीतीने तुम्ही स्वत:ला पापाला मेलेले पण ख्रिस्त येशूमध्ये व देवासाठी जिवंत असे समजा.
12ܠܐ ܗܟܝܠ ܬܡܠܟ ܚܛܝܬܐ ܒܦܓܪܟܘܢ ܡܝܬܐ ܐܝܟ ܕܬܫܬܡܥܘܢ ܠܪܓܝܓܬܗ ܀
12यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करु नये.
13ܘܐܦ ܠܐ ܬܛܝܒܘܢ ܗܕܡܝܟܘܢ ܙܝܢܐ ܕܥܘܠܐ ܠܚܛܝܬܐ ܐܠܐ ܛܝܒܘ ܢܦܫܟܘܢ ܠܐܠܗܐ ܐܝܟ ܐܢܫܐ ܕܡܢ ܡܝܬܐ ܚܝܝܬܘܢ ܘܗܕܡܝܟܘܢ ܙܝܢܐ ܢܗܘܘܢ ܠܟܐܢܘܬܗ ܕܐܠܗܐ ܀
13आणि अनीतिची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करु नका. त्याऐवाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते आपणांला देवाच्या स्वाधीन करा. आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा.
14ܘܚܛܝܬܐ ܠܐ ܡܫܬܠܛܐ ܥܠܝܟܘܢ ܠܐ ܓܝܪ ܐܝܬܝܟܘܢ ܬܚܝܬ ܢܡܘܤܐ ܐܠܐ ܬܚܝܬ ܛܝܒܘܬܐ ܀
14पाप तुम्हांवर राज्य करणार नाही. कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात.
15ܡܢܐ ܗܟܝܠ ܢܚܛܐ ܕܠܐ ܗܘܝܢ ܬܚܝܬ ܢܡܘܤܐ ܐܠܐ ܬܚܝܬ ܛܝܒܘܬܐ ܚܤ ܀
15तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय?
16ܠܐ ܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܕܠܡܢ ܕܡܛܝܒܝܢ ܐܢܬܘܢ ܢܦܫܟܘܢ ܕܬܫܬܡܥܘܢ ܠܗ ܠܥܒܕܘܬܐ ܕܝܠܗ ܐܢܬܘܢ ܥܒܕܐ ܕܗܘ ܕܡܫܬܡܥܝܢ ܐܢܬܘܢ ܠܗ ܐܢ ܠܚܛܝܬܐ ܘܐܢ ܠܡܫܡܥ ܐܕܢܐ ܕܟܐܢܘܬܐ ܀
16खात्रीने नाही. तुम्हांला माहीत नाही काय की जेव्हा तुम्ही स्वत:ला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते. पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हांला नीतिमत्व मिळते.
17ܛܝܒܘ ܕܝܢ ܠܐܠܗܐ ܕܥܒܕܐ ܗܘܝܬܘܢ ܕܚܛܝܬܐ ܘܐܫܬܡܥܬܘܢ ܡܢ ܠܒܐ ܠܕܡܘܬܐ ܕܝܘܠܦܢܐ ܕܐܫܬܠܡܬܘܢ ܠܗ ܀
17पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता. पाप तुम्हांला काबूत ठेवीत होते. पण देवाचे उपकार मानू या की, ज्या गोष्टी तुम्हांला शिकविल्या गेल्या त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या.
18ܘܟܕ ܐܬܚܪܪܬܘܢ ܡܢ ܚܛܝܬܐ ܐܫܬܥܒܕܬܘܢ ܠܟܐܢܘܬܐ ܀
18तुम्हांला पापांपासून मुक्त केले गेले. आणि नीतिमत्वाचे गुलाम करण्यात आले.
19ܐܝܟ ܕܒܝܬ ܒܢܝܢܫܐ ܐܡܪ ܐܢܐ ܡܛܠ ܟܪܝܗܘܬܐ ܕܒܤܪܟܘܢ ܕܐܝܟܢܐ ܕܛܝܒܬܘܢ ܗܕܡܝܟܘܢ ܠܥܒܕܘܬܐ ܕܛܢܦܘܬܐ ܘܕܥܘܠܐ ܗܟܢܐ ܐܦ ܗܫܐ ܛܝܒܘ ܗܕܡܝܟܘܢ ܠܥܒܕܘܬܐ ܕܟܐܢܘܬܐ ܘܕܩܕܝܫܘܬܐ ܀
19तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे. कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेच्या आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला नीतिमत्वाचे गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा.
20ܟܕ ܥܒܕܐ ܗܘܝܬܘܢ ܓܝܪ ܕܚܛܝܬܐ ܡܚܪܪܐ ܗܘܝܬܘܢ ܠܟܐܢܘܬܐ ܀
20कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता, तेव्हा नीतिमत्वासंबंधाने मोकळे होता.
21ܘܡܢܐ ܐܕܫܐ ܐܝܬ ܗܘܐ ܠܟܘܢ ܗܝܕܝܢ ܐܝܢܐ ܕܝܘܡܢܐ ܒܗܬܝܢ ܐܢܬܘܢ ܒܗ ܚܪܬܗ ܓܝܪ ܐܝܬܝܗ ܡܘܬܐ ܀
21आणि त्यावेळेला तुम्हांला काय फळ मिळाले, त्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते, ज्याचा शेवट मरण आहे.
22ܘܗܫܐ ܕܐܬܚܪܪܬܘܢ ܡܢ ܚܛܝܬܐ ܘܗܘܝܬܘܢ ܥܒܕܐ ܠܐܠܗܐ ܐܝܬ ܠܟܘܢ ܦܐܪܐ ܩܕܝܫܐ ܕܚܪܬܗܘܢ ܚܝܐ ܕܠܥܠܡ ܀
22परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त करुन देवाचे गुलाम केले आहे. देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हांला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.
23ܬܐܓܘܪܬܐ ܕܝܢ ܕܚܛܝܬܐ ܡܘܬܐ ܗܘ ܘܡܘܗܒܬܗ ܕܐܠܗܐ ܚܝܐ ܕܠܥܠܡ ܒܡܪܢ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܀
23कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.