Turkish: New Testament

Marathi

Ezra

10

1एज्रा प्रार्थना करत असताना आणि पापांची कबुली देत असताना मंदिरापुढे पडून आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते ही सर्वजण आक्रंदन करत होते
2त्यावेळी एलाम वंशातल्या यहिएलचा मुलगा शखन्या एज्राला म्हणाला, “आपण देवाचे वचन पाळले नाही आपल्या आसपास राहणाऱ्या लोकांमध्ये आपण विवाह केले. पण एवढे करुनही इस्राएलींच्या बाबतीत अजून आशा जागा आहे.
3तर आता, एज्रा आणि देवाच्या धर्मशास्त्राचा धाक असलेले लोक यांच्या उपदेशानुसार आपण त्या बायका आणि त्यांची संतती यांना देशाबाहेर घालवून देण्याची आपल्या देवासमोर शपथ वाहू या. परमेश्वराने घालून दिलेले नियम पाळू या
4एज्रा, आता ऊठ ही तुझी जबाबदारी आहे. आमच्या पाठिंब्याने तू ती धैर्याने पार पाड.”
5तेव्हा एज्रा उठला, प्रमुख यजाक, लेवी आणि सर्व इस्राएली लोक यांच्याकडून त्याने आपल्या म्हणण्यानुसार वागण्याची शपथ घेतली.
6मग एज्रा मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबचा मुलगा यहोहानान याच्या दालनात गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. यरुशलेमहून परत आलेल्या इस्राएलींचा पापांनी तो व्यथित झाला होता.
7त्याने मग यहुदा आणि यरुशलेमच्या प्रत्येक ठिकाणी दवंडी पिटवली. बंदिवासातून आलेल्या समस्त यहुदी लोकांना त्याने यरुशलेममध्ये जमायला सांगितले
8आणि जो कोणी तीन दिवसाच्या आत यरुशलेमला येणार नाही त्याची सर्व मालमत्ता जप्त होईल आणि अशा व्यक्ति आपल्या जातीत वाळीत सदस्य म्हणून राहू शकणार नाही असेही अधिकाऱ्यांनी आणि वडीलधाऱ्यांनी एकमताने ठरवले.
9त्यानुसार यहुदा आणि बन्यामीन यांच्या घराण्यातील सर्व पुरुषमंडळी तीन दिवसांच्या आत यरुशलेममध्ये जमली. हे लोक मंदिराच्या चौकात एकत्र आले. तो नवव्या महिन्याचा विसावा दिवस होता. एकत्र येण्यामागचे कारण आणि प्रचंड पाऊस यांच्यामुळे सर्वजण अतिशय कंपित झाले होते.
10एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलच्या पापात तुम्ही भर टाकली आहे
11आता देवासमोर आपले अपराध कबूल करा. आपल्या पूर्वजांच्या देवाची आज्ञा तुम्ही पाळली पाहिजे. तुमच्या मध्ये राहणारे लोक आणि आपल्या परक्या बायका यांच्यापासून वेगळे व्हा.”
12यावर त्या जमावाने एज्राला खणखणीत आवाजात उत्तर दिले की, “एज्रा, तू म्हणतोस ते खरे आहे. तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्हाला वागले पाहिजे.
13पण आम्ही पुष्कळजण आहोत शिवाय हा पावसाळा आहे त्यामुळे आम्ही बाहेर थांबू शकत नाही. आमचा अपराध फार तीव्र असल्यामुळे हा एकदोन दिवसात सुटण्यासारखा प्रश्न नाही.
14या समुदायाच्या वतीने आमच्यातूनच काहींना मुखत्यार नेमावे प्रत्येक नगरातल्या ज्या रहिवाश्यांनी परकीय बायकांशी लग्ने केली आहेत त्यांनी यरुशलेमला नेमलेल्या वेळी यावे त्या त्या नगरातील न्यायाधीश आणि वडीलधारी मंडळी यांनीही त्यांच्याबरोबर यावे. असे झाले की मग देवाचा आमच्यावरचा क्रोध मावळेल.”
15असएलचा मुलगा योनाथान आणि तिकवाचा मुलगा यहज्या तसेच मशुल्लाम व शब्बथई लेवी अशा मोजक्याच लोकांनी या योजनेला विरोध केला.
16यरुशलेमला आलेल्या बाकी सर्व इस्त्राएली लोकांनी या योजनेला संमती दिली. एज्राने प्रत्येक घराण्यातून एकेका प्रमुख व्यक्तीची नेमणूक केली. त्या प्रत्येकाच्या नावाने निवडले गेली. हे नियुक्त केलेले सर्वजण दहाच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक प्रकरणाचा बारकाईने विचार करायला बसले
17आणि पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी मिश्रविवाहांची चौकाशी समाप्त झाली.
18याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढील प्रमाणे: योसादाकचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.
19यासर्वांनी आपापल्या बायकांना घटस्फोट द्यायचे कबूल केले आणि दोषमुक्तीखातर कळपातला एकएक एडका अर्पण केला.
20इम्मेरच्या वंशातले हनानी व जबद्या,
21हारीमच्या वंशातले मासेया, एलीया, शमाया, यहीएल व उज्जीया,
22पशहूरच्या वंशातले एल्योवेनय, मासेया, इश्माएल, नथनेल, योजाबाद, एलासा,
23लेव्यांपैकी योजाबाद, शिमी, कलाया उर्फ-कलीटा, पूथह्या, यहूदा आणि अलियेजर,
24गायकांपैकी एल्याशीब, द्वारपालांमधले, शल्लूम, तेलेम, ऊरी,
25इस्राएलीमंधले परोशाच्या वंशातले रम्या व यिज्जीया, मल्कीया, मियानीन, एलाजार, मल्कीया, बनाया,
26एलामच्या वंशातले मत्तन्या, जखऱ्या, यहीएल, अब्दी, यरेमोथ व एलीया,
27जत्तूच्या वंशातले एल्योवेनय, एल्याशीब, मत्तन्या, यरेमोथ, जाबाजाबाद, अजीजा,
28बेबाईच्या वंशातील यहोहानान, इनन्या, जब्बइ, अथलइ
29बानीच्या वंशातील मशुल्लाम, मल्लूख, आदाया, याशूब, शाल आणि रामोथ,
30पहथ-मवाबच्या वंशातील अदना, कलाल, बनाया, मासेया, मत्तन्या, बसलेल, विन्नूई, मनश्शे,
31आणि हारीमच्या वंशातील अलीयेजर, इश्शीया, मल्कीया, शमाया, शिमोन,
32बन्यामीन, मल्लूख, शमऱ्या,
33हाशूमच्या वंशातील मत्तनई, मत्तथा, जाबाद, अलीफलेट, यरेमई, मनश्शे, शिमी,
34बानीच्या वंशातले मादइ, अम्राम, ऊएल
35बनाया, बेदया, कलूही,
36बन्या मरेमोथ, एल्याशीब,
37मत्तन्या, मत्तनइ, व यासू
38बानी व बिन्नूइ, शिमी,
39शेलेम्या, नाथान, अदाया,
40मखनदबइ, शाशइ, शारइ,
41अजरएल, शेलोम्या, शमऱ्या
42शल्लूम, अमऱ्या, योसेफ,
43नबोच्या वंशातील ईयेल, मत्तिथ्या, जाबाद, जबिना, इद्दो, योएल, बनाया.
44वरील सर्वांनी परकीय बायकांशी लग्ने केली होती. त्यापैकी काहींना या संबंधातून संतती झाली होती.