Marathi

Job

20

1नंतर नामाथीचा शोफर म्हणाला:2“ईयोब, तुझे त्रस्त झालेले विचार मला तुला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत. माझ्या मनात कोणते विचार चालले आहेत ते मी तुला लगेच सांगायला हवे.3तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस परंतु मी शहाणा आहे. उत्तर कसे द्यायचे ते मला माहीत आहे.4[This verse may not be a part of this translation]5[This verse may not be a part of this translation]6दुष्ट माणसाचा अहंकार गगनाला जाऊन भिडेल आणि त्याचे मस्तक ढगांपर्यत पोहोचू शकेल.7परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा मात्र नाश झालेला असेल. जे लोक त्याला ओळखतात ते विचारतील, ‘तू कुठे आहे?’8तो एखाद्या स्वप्नासारखा उडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्रासारखा तो विसरलाही जाईल. 9ज्या लोकांनी त्याला पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही. त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,10दुष्ट माणसाने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील. दुष्ट माणसाचे स्वत:चे हातच त्याची संपत्ती परत करतील.11तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती. परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.12“दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात. तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.13दुष्ट माणसाला वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही. गोडगोळीसारखं तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.14परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील. त्याच्या आत त्याचे सर्वाच्या विषासारखे कडू जहर होईल.15दुष्ट माणसाने श्रीमंती गिळली तरी तो ती ओकून टाकेल. देव त्याला ती ओकायला भाग पाडेल.16दुष्ट माणसाचे पेय म्हणजे सर्पाचे विष. सर्पाचा दंशच त्याला मारुन टाकील.17नंतर दुष्ट मनुष्य मधाने आणि दुघाने भरुन वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य अनुभवू शकणार नाही.18दुष्ट माणसाला त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्याला मिळणार नाही.19का? कारण त्याने गरीबांना कष्ट दिले. त्यांना वाईट वागवले. त्याने त्यांची काळजी घेतली नाही. त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या. दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्यानी बळकावली.20“दुष्ट माणूस कधीही समाधानी नसतो. त्याची श्रीमंती त्याला वाचवू शकत नाही.21तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही. त्याचे यश टिकणार नाही.22दुष्ट मनुष्याकडे जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटांनी दबून जाईल. त्याच्या समस्या त्याच्यावर कोसळतील.23दुष्ट माणसाने त्याला हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल. देव दुष्टावर शिक्षेचा पाऊस पाडेल.24दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल. परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.25पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील आणि तो भयभीत होईल.26त्याच्या खजिन्याचा नाश होईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्री त्याचा नाश करेल. अग्री त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.27दुष्ट माणूस अपराधी आहे हे स्वर्ग सिध्द करेल. पृथ्वी त्याच्याविरुध्द साक्ष देईल.28देवाच्या क्रोधाने निर्माण झालेल्या पुरात त्याच्या घरातली चीजवस्तू वाहून जाईल.29दुष्ट माणसाच्या बाबतीत हे करायचे असे देवाने ठरवले आहे. देवाने ठरवलेले हे त्याचे प्रारब्ध आहे.”