Marathi

Psalms

101

1मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.2मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन. परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?3मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही. जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो. मी तसे करणार नाही.4मी प्रामाणिक राहीन. मी वाईट कृत्ये करणार नाही.5जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.6ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन. जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.7मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.8मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.