Marathi

Psalms

114

1इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला.2यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले.3लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली.4पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.5लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस?6पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?7पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली.8देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.