Marathi

Psalms

134

1परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.2सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.3आणि परमेश्वर तुम्हाला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.