Marathi

Psalms

70

1देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर.2लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर. लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे.3लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.4जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.5मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.