King James Version

Marathi

1 John

4

1Beloved, believe not every spirit, but try the spirits whether they are of God: because many false prophets are gone out into the world.
1प्रिय मित्रांनो, प्रत्येक संदेष्ट्याचा आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका. त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते (खरोखर) देवापासून आहेत का ते पाहा. मी हे तुम्हांला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
2Hereby know ye the Spirit of God: Every spirit that confesseth that Jesus Christ is come in the flesh is of God:
2अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखू शकता: प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो कबूल करतो की, “येशू ख्रिस्त या जगात मानवी रुपात आला.” तो देवापासून आहे.
3And every spirit that confesseth not that Jesus Christ is come in the flesh is not of God: and this is that spirit of antichrist, whereof ye have heard that it should come; and even now already is it in the world.
3आणि प्रत्येक संदेष्ट्याचा आत्मा जो येशूविषयी कबुली देत नाही तो देवापासून नाही. अशी व्यक्ति म्हणजे ख्रिस्तविरोधी होय. ज्याच्या येण्याविषयी तुम्ही ऐकले आहे. तो अगोदरच जगात आला आहे.
4Ye are of God, little children, and have overcome them: because greater is he that is in you, than he that is in the world.
4माझ्या मुलांनो, तुम्ही देवाचे आहात, म्हणून तुम्ही ख्रिस्तविरोध्याच्या अनुयायांना जिंकले आहे, कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे.
5They are of the world: therefore speak they of the world, and the world heareth them.
5ते लोक म्हणजे ख्रिस्ताचे शत्रू जगाचे आहेत यासाठी की ते जगापासूनच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते.
6We are of God: he that knoweth God heareth us; he that is not of God heareth not us. Hereby know we the spirit of truth, and the spirit of error.
6पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो.
7Beloved, let us love one another: for love is of God; and every one that loveth is born of God, and knoweth God.
7प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीति करु या, कारण प्रीती देवाकडून येते, आणि प्रत्येकजण
8He that loveth not knoweth not God; for God is love.
8जो प्रीति करतो तो देवाचे मूल होतो आणि देवाला ओळखतो. जो प्रीति करीत नाही, त्याची देवाशी ओळख झालेलीच नाही. कारण देव प्रीति आहे.
9In this was manifested the love of God toward us, because that God sent his only begotten Son into the world, that we might live through him.
9अशा प्रकारे देवाने त्याची आम्हावरील प्रीति दर्शविली : त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.
10Herein is love, not that we loved God, but that he loved us, and sent his Son to be the propitiation for our sins.
10आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्च्त्ति म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे.
11Beloved, if God so loved us, we ought also to love one another.
11प्रिय मित्रांनो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आम्ही एकमेकांवर प्रीति केलीच पाहिजे.
12No man hath seen God at any time. If we love one another, God dwelleth in us, and his love is perfected in us.
12देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीति करीत राहिलो तर देव आमच्यामध्ये राहतो व त्याची आम्हांवरील प्रीति पूर्णत्वास आणलेली आहे.
13Hereby know we that we dwell in him, and he in us, because he hath given us of his Spirit.
13अशा प्रकारे आम्हांला समजू शकते की देव आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो: त्याने त्याचा आत्मा आमच्यात राहू दिला आहे.
14And we have seen and do testify that the Father sent the Son to be the Saviour of the world.
14ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा होण्यासाठी पित्याने पुत्राला पाठविले आहे.
15Whosoever shall confess that Jesus is the Son of God, God dwelleth in him, and he in God.
15जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर देव त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि ती व्यक्ति देवामध्ये रहाते.
16And we have known and believed the love that God hath to us. God is love; and he that dwelleth in love dwelleth in God, and God in him.
16आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जो देवाने आमच्यावर केली. देव प्रीति आहे. आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो
17Herein is our love made perfect, that we may have boldness in the day of judgment: because as he is, so are we in this world.
17अशा प्रकारे आमच्याबाबतीत प्रीति पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढविश्वास प्राप्त व्हावा. अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे कारण या जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ताच्या जीवनासारखे आहे.
18There is no fear in love; but perfect love casteth out fear: because fear hath torment. He that feareth is not made perfect in love.
18प्रीतीमध्ये कोणतीही भिति नसते. उलट पूर्ण प्रीति भीतीला घालवून देते. प्रीति शिक्षेशी संबंधित आहे. आणि जो भीतीमय जीवन जगतो तो प्रीतीत पूर्ण झालेला नाही.
19We love him, because he first loved us.
19आम्ही प्रीति करतो कारण देवाने आमच्यावर पहिल्यांदा प्रीति केली.
20If a man say, I love God, and hateth his brother, he is a liar: for he that loveth not his brother whom he hath seen, how can he love God whom he hath not seen?
20जर एखादा म्हणतो, “मी देवावर प्रीति करतो,” पण त्याच्या भावाचा द्वेष करतो, तर तो खोटे बोलतो. मी हे म्हणतो कारण ज्याला त्याने पाहिलेले आहे अशा भावावर जर एखादा प्रीति करीत नाही. तर ज्या देवाला त्याने पाहिले नाही त्याच्यावर तो प्रीति करु शकत नाही!
21And this commandment have we from him, That he who loveth God love his brother also.
21आम्हांला ख्रिस्ताकडून ही आज्ञा मिळाली आहे: जो देवावर प्रीति करतो त्याने त्याच्या भावावर प्रीति केलीच पाहिजे.