Young`s Literal Translation

Marathi

Habakkuk

3

1A prayer of Habakkuk the prophet concerning erring ones:
1ही संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथ प्रार्थना आहे
2O Jehovah, I heard thy report, I have been afraid, O Jehovah, Thy work! in midst of years revive it, In the midst of years Thou makest known In anger Thou dost remember mercy.
2परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली. परमेश्वर तू भूतकाळात केलेल्या सामर्थ्यशाली गोष्टीने मी विस्मयचकित झालो आहे. आता, आमच्या काळातही तू अशाच मोठ्या गोष्टी घडवाव्यास म्हणून मी प्रार्थना करतो. कृपया आमच्या आयुष्यातच त्या घडव. पण तुझ्या खळबळजनक घटनांच्या वेळीही, आमच्यावर दया करण्यास विसरु नकोस.
3God from Teman doth come, The Holy One from mount Paran. Pause! Covered the heavens hath His majesty, And His praise hath filled the earth.
3तेमानहून देव येत आहे. पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे. परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.
4And the brightness is as the light, He hath rays out of His hand, And there — the hiding of His strength.
4ते तेज तेजस्वी, चमकदार प्रकाशाप्रमाणे आहे त्याच्या हातातून किरण निघतात. त्या हातात मोठे सामर्थ्य लपले आहे.
5Before Him goeth pestilence, And a burning flame goeth forth at His feet.
5आजार त्याच्या आधी गेला. आणि नाश करणारा त्याच्यामागून गेला.
6He hath stood, and He measureth earth, He hath seen, and He shaketh off nations, And scatter themselves do mountains of antiquity, Bowed have the hills of old, The ways of old [are] His.
6परमेश्वराने स्वत: उभे राहून, पृथ्वीला न्याय दिला त्याने राष्ट्रांतील लोकांवर नजर टाकली आणि त्या लोकांचा भीतीने थरकाप झाला. पुष्काळ वर्षे पर्वत घटृपणे उभे होते पण त्यांचा चक्काचूर झाला. अती प्राचीन टेकड्या खाली कोसळल्या देवाचे नेहमीच हे असे असते.
7Under sorrow I have seen tents of Cushan, Tremble do curtains of the land of Midian.
7कूशानची गावे संकटात असलेली मी पाहिली. मिद्यानची घरे भीतीने कापली
8Against rivers hath Jehovah been wroth? Against rivers [is] Thine anger? Against the sea [is] Thy wrath? For Thou dost ride on Thy horses — Thy chariots of salvation?
8परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू संतापला होतास का? विजयसाठी तुझ्या घोड्यांवर स्वार होताना किंवा रथांवर आरुढ होताना तू रागावला होतास का?
9Utterly naked Thou dost make Thy bow, Sworn are the tribes — saying, `Pause!` [With] rivers Thou dost cleave the earth.
9[This verse may not be a part of this translation]
10Seen thee — pained are mountains, An inundation of waters hath passed over, Given forth hath the deep its voice, High its hands it hath lifted up.
10तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
11Sun — moon — hath stood — a habitation, At the light thine arrows go on, At the brightness, the glittering of thy spear.
11चंद्र-सूर्याचे तेज लोपले. तुझ्या विजांचा तेजस्वी लखलखाट पाहून त्यांनी चमकणे सोडून दिले त्या विजा म्हणजे जणू काही हवेत फेकलेले बाण व भाले होते.
12In indignation Thou dost tread earth, In anger Thou dost thresh nations.
12रागाच्या भरात, तू पृथ्वी पायाखाली तुडविलीस आणि राष्ट्रांना शिक्षा केलीस.
13Thou hast gone forth for the salvation of Thy people, For salvation with Thine anointed, Thou hast smitten the head of the house of the wicked, Laying bare the foundation unto the neck. Pause!
13तू, तुझ्या माणसांच्या, रक्षणासाठी आलास. तू निवडलेल्या राजाला, विजयकाडे नेण्यासाठी आलास. रंकापासून रावापर्यंतच्या, प्रत्येक दुष्ट घरातील प्रमुखाला तू ठार मारलेस. सेला
14Thou hast pierced with his staves the head of his leaders, They are tempestuous to scatter me, Their exultation [is] as to consume the poor in secret.
14शत्रू-सैनिकांना थोपविण्यासाठी तू मोशेच्या काठीचा उपयोग केलास. ते सैनिक, प्रचंड वादळाप्रमाणे, आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले. गरीब माणसाला एकांतात लुटावे, तसा सहज आमचा पाडाव करता येईल असे त्यांना वाटले.
15Thou hast proceeded through the sea with Thy horses — the clay of many waters.
15पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
16I have heard, and my belly trembleth, At the noise have my lips quivered, Rottenness doth come into my bones, And in my place I do tremble, That I rest for a day of distress, At the coming up of the people, he overcometh it.
16ही गोष्ट ऐकताच, मला कंप सुटला. मी मोठ्याने किंचाळलो मी अतिशय दुर्बल झाल्याचे मला जाणवले. मी जागच्या जागी नुसताच थरथर कापत उभा राहिलो. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची वाट पाहीन शत्रू आमच्यावर हल्ला करील.
17Though the fig-tree doth not flourish, And there is no produce among vines, Failed hath the work of the olive, And fields have not yielded food, Cut off from the fold hath been the flock, And there is no herd in the stalls.
17कदाचित् अंजिराच्या झाडांना अंजिरे लागणार नाहीत. वेलीना द्राक्षे लागणार नाहीत. जैतूनाच्या झाडांना फळे लागणार नाहीत. शेतांत धान्य उगवणार नाही, गोठ्यात शेळ्या मेंढ्या, गाईगुरे राहणार नाहीत,
18Yet I, in Jehovah I exult, I do joy in the God of my salvation.
18तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन. माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.
19Jehovah the Lord [is] my strength, And He doth make my feet like hinds, And on my high-places causeth me to tread. To the overseer with my stringed instruments!
19परमेश्वर, माझा प्रभू मला शक्ती देतो. हरिणाप्रमाणे जलद धावायला मदत करोत देवच मला सुरक्षितपणे पर्वतांवर नेतो. माझ्या तारा लावलेल्या वाद्यांत असलेल्या त्या संगीत दिग्दर्शकाला.