1A word of Jehovah that hath been unto Zephaniah son of Cushi, son of Gedaliah, son of Amariah, son of Hezikiah, in the days of Josiah son of Amoz, king of Judah:
1हा परमेश्वराने सफन्याला दिलेला संदेश आहे. योशीयाच्या कारकिर्दीत सफन्याला हा संदेश मिळाला. योशीया हा यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा होता. सफन्या हा कूशींचा मुलगा होता. कूशी हा गदल्याचा, गदल्या अमऱ्याचा व अमऱ्या हिज्कीयाचा मुलगा होता.
2I utterly consume all from off the face of the ground, An affirmation of Jehovah.
2देव म्हणतो, “पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा मी नाश करीन.
3I consume man and beast, I consume fowl of the heavens, and fishes of the sea, And the stumbling-blocks — the wicked, And I have cut off man from the face of the ground, An affirmation of Jehovah,
3सर्व प्राणिमात्रांचा मी नाश करीन. सर्व पक्षी व जलचर मी नष्ट करीन. मी पापी आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व गोष्टी याचा नाश करीन मी पृथ्वीवरच्या सर्व लोकांना पृथ्वीवरुन दूर करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
4And stretched out My hand against Judah, And against all inhabiting Jerusalem, And cut off from this place the remnant of Baal, The name of the idolatrous priests, with the priests,
4[This verse may not be a part of this translation]
5And those bowing themselves On the roofs to the host of the heavens, And those bowing themselves, Swearing to Jehovah, and swearing by Malcham,
5[This verse may not be a part of this translation]
6And those removing from after Jehovah, And who have not sought Jehovah, nor besought Him.
6काही लोकांनी परमेश्वराकडे पाठ केली. त्यांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडले. मदतीसाठी परमेश्वराला हाक मारायचे बंद केले, अशांना मी त्या ठिकाणाहून उठवीन.”
7Hush! because of the Lord Jehovah, For near [is] a day of Jehovah, For prepared hath Jehovah a sacrifice, He hath sanctified His invited ones.
7परमेश्वर माझ्या, प्रभूसमोर शांत रहा! का? कारण लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा परमेश्वराने ठरविलेला दिवस लवकरच येत आहे. परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे त्याने त्याच्या निमंत्रित पाहुण्यांना तयार रहायला सांगितले आहे,
8And it hath come to pass, In the day of the sacrifice of Jehovah, That I have laid a charge on the heads, And on sons of the king, And on all putting on strange clothing.
8परमेश्वर म्हणाला, “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, मी राजाचे मुलगे व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन. परदेशीय वस्त्रे घातलेल्यांना पण मी सजा देईन.
9And I have laid a charge on every one Who is leaping over the threshold in that day, Who are filling the house of their masters [With] violence and deceit.
9त्या वेळी, उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि धन्याचे घर असत्य व हिंसाचाराने भरणाऱ्यांना मी शिक्षा ठोठावीन.”
10And there hath been in that day, An affirmation of Jehovah, The noise of a cry from the fish-gate, And of a howling from the Second, And of great destruction from the hills.
10परमेश्वरा असेही म्हणाला त्या वेळेला, लोक यरुशलेमच्या मासळी दाराशी मदतीसाठी हाका मारीत असतील. गावाच्या इतर भागांत लोक रडत असतील. नगरीभोवतीच्या टेकड्यांवरुन लोकांना वस्तूंचा नाश होत असताना येथो, तसा मोठा धडधडाट ऐकू येईल.
11Howl, ye inhabitants of the hollow place, For cut off hath been all the merchant people, Cut off have been all bearing silver.
11गावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही रडाल. का? कारण सर्व उद्योगपतींचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा नाश होईल.
12And it hath come to pass, at that time, I search Jerusalem with lights, And I have laid a charge on the men Who are hardened on their preserved things, Who are saying in their heart: Jehovah doth no good, nor doth He evil.
12“तेव्हा मी एक दिवा घेऊन यरुशलेममधून शोध करीन. जे लोक स्वत:च्या मनाप्रमाणे जगण्यात समाधान मानतात अशा सर्वांना मी शोधीन. ‘परमेश्वर काहीच करीत नाही. तो मदतही करीत नाही आणि दुखापतही करीत नाही’ त्यांना वाटते. अशा लोकांना शोधून काढून मी त्यांना शिक्षा करीन.
13And their wealth hath been for a spoil, And their houses for desolation, And they have built houses, and do not inhabit, And they have planted vineyards, And they do not drink their wine.
13मग इतर लोक त्यांची संपत्ती बळकावतील आणि त्यांच्या घरांचा नाश करतील. त्या वेळी, ज्यांनी घरे बांधली, ते त्या घरात राहणार नाहीत आणि ज्यांनी द्राक्षमळे लावले, त्यांना त्या द्राक्षांचा द्राक्षारस मिळणार नाही. ह्या गोष्टी दुसऱ्यांनाच मिळतील.”
14Near [is] the great day of Jehovah, Near, and hasting exceedingly, The noise of the day of Jehovah, Bitterly shriek there doth a mighty one.
14परमेश्वराने ठरविलेला न्यायदानाचा दिवस लवकरच येत आहे तो दिवस जवळच आहे, आणि वेगाने येत आहे. देवाच्या न्यायदानाच्या दिवशी. लोकांना मोठा आक्रांत ऐकू येईल. वीरसुध्दा रडतील.
15A day of wrath [is] that day, A day of adversity and distress, A day of waste and desolation, A day of darkness and gloominess, A day of cloud and thick darkness.
15देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ व वादळी दिवस असेल.
16A day of trumpet and shouting against the fenced cities, And against the high corners.
16तो काळ युध्दकाळासारखा असेल. युध्दकाळात लोक सुरक्षित गावांतून व संरक्षक बुरुजांवरुन शिंग आणि तुतारी फुंकल्याचे आवाज ऐकतात.
17And I have sent distress to men, And they have walked as the blind, For against Jehovah they have sinned, And poured out is their blood as dust, And their flesh [is] as dung.
17परमेश्वर म्हणाला, “मी लोकांना जगणे कठीण करीन. अंधळ्यांना ज्याप्रमाणे आपण कोठे जात आहोत हे कळत नाही, तशी लोकांची स्थिती होईल का? कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले. खूप लोक मारले जातील. त्याचे रक्त जमिनीवर सांडेल. त्यांची प्रेते शेणासारखी जमिनीवर पडतील.
18Even their silver, even their gold, Is not able to deliver them in a day of the wrath of Jehovah, And in the fire of His jealousy consumed is the whole land, For only a hastened end doth He make Of all the inhabitants of the land!
18त्यांच्या सोन्या-चांदीची त्यांना मदत होणार नाही. त्या वेळी, परमेश्वर खूपच कोपलेला व रागावलेला असेल. परमेश्वर सर्व जगाचा नाश करील. परमेश्वर पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाश करील. “