الكتاب المقدس (Van Dyke)

Marathi

1 Chronicles

16

1وادخلوا تابوت الله واثبتوه في وسط الخيمة التي نصبها له داود وقربوا محرقات وذبائح سلامة امام الله.
1लेवींनी करारकोश आत आणून दावीदाने उभाररलेल्या तंबूमध्ये तो ठेवला. मग त्यांनी देवाला होमार्पणे आणि शांती अर्पणे वाहिली.
2ولما انتهى داود من اصعاد المحرقات وذبائح السلامة بارك الشعب باسم الرب.
2हे झाल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला.
3وقسم على كل آل اسرائيل من الرجال والنساء على كل انسان رغيف خبز وكاس خمر وقرص زبيب
3मग त्याने एकूनएक इस्राएल स्त्री-पुरुषांना एकएक भाकर, खजूर आणि किसमिस एवढे दिले.
4وجعل امام تابوت الرب من اللاويين خداما ولاجل التذكير والشكر وتسبيح الرب اله اسرائيل
4दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते.
5آساف الراس وزكريا ثانيه ويعيئيل وشميراموث ويحيئيل ومتثايا واليآب وبنايا وعوبيد ادوم ويعيئيل بآلات رباب وعيدان. وكان آساف يصوّت بالصنوج.
5आसाफ हा पहिल्या गाटाचा मुख्य होता. त्याचा गट झांजा वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गाटाचा प्रमुख होता. इतर लेवी पुढीलप्रमाणे: उज्जियेल, शमिरामोथ, यहिएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत
6وبنايا ويحزيئيل الكاهنان بالابواق دائما امام تابوت عهد الله.
6बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी करार कोशापुढे रणशिंगे वाजवत.
7حينئذ في ذلك اليوم اولا جعل داود يحمد الرب بيد آساف واخوته
7परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
8احمدوا الرب. ادعوا باسمه. اخبروا في الشعوب باعماله.
8परमेश्वराचे स्तवन करा. त्याला हाक मारा. परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
9غنوا له. ترنموا له. تحادثوا بكل عجائبه.
9परमेश्वराची स्तोत्रे गा. त्यांचे स्तवन म्हणा. त्याचे चमत्कार इतरांना सांगा.
10افتخروا باسم قدسه. تفرح قلوب الذين يلتمسون الرب.
10परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो.
11اطلبوا الرب وعزّه. التمسوا وجهه دائما.
11परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.
12اذكروا عجائبه التي صنع. آياته واحكام فمه.
12देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा. त्याने केलेले न्याय आणि चमत्कारची कृत्ये यांचे स्मरण करा.
13يا ذرية اسرائيل عبده وبني يعقوب مختاريه.
13इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत. याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
14هو الرب الهنا. في كل الارض احكامه
14परमेश्वर आमचा देव आहे. त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.
15اذكروا الى الابد عهده. الكلمة التي اوصى بها الى الف جيل.
15त्याच्या कराराचे स्मरण असू द्या. त्याने दिलेल्या आज्ञा पुढील हजारो पिढ्यांसाठी आहेत.
16الذي قطعه مع ابراهيم. وقسمه لاسحق.
16परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
17وقد اقامه ليعقوب فريضة ولاسرائيل عهدا ابديا.
17याकोबासाठी परमेश्वराने तोच नियम केला. इस्राएलशी त्याने तसाच निरंतर करार केला.
18قائلا لك اعطي ارض كنعان حبل ميراثكم.
18इस्राएलला परमेश्वर म्हणाला, “मी तुम्हाला कनानचा प्रदेश देईन. ते वतन तुमचे असेल.”
19حين كنتم عددا قليلا قليلين جدا وغرباء فيها.
19त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, परक्या प्रदेशात उपरे होता.
20وذهبوا من امة الى امة ومن مملكة الى شعب آخر.
20तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता.
21لم يدع احدا يظلمهم بل وبّخ من اجلهم ملوكا.
21पण परमेश्वराने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. परमेश्वराने राजांना तशी ताकीद दिली.
22لا تمسّوا مسحائي ولا تؤذوا انبيائي
22परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका. माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
23غنّوا للرب يا كل الارض. بشّروا من يوم الى يوم بخلاصه.
23पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.
24حدّثوا في الامم بمجده وفي كل الشعوب بعجائبه.
24परमेश्वराच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा तो किती अद्भूत आहे ते सर्वांना सांगा.
25لان الرب عظيم ومفتخر جدا. وهو مرهوب فوق جميع الآلهة.
25परमेश्वर थोर आहे. त्याची स्तुती केली पाजिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.
26لان كل آلهة الامم اصنام واما الرب فقد صنع السموات.
26का बरे? कारण जगातले इतर सगळी दैवते म्हणजे नुसत्या क्षुद्र मूर्ती पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
27الجلال والبهاء امامه. العزّة والبهجة في مكانه.
27परमेश्वराला महिमा आणि सन्मान आहे. देव तेजस्वी लखलखीत प्रकाशाप्रमाणे आहे.
28هبوا الرب يا عشائر الشعوب هبوا الرب مجدا وعزّة.
28लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.
29هبوا الرب مجد اسمه. احملوا هدايا وتعالوا الى امامه. اسجدوا للرب في زينة مقدسة.
29त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
30ارتعدوا امامه يا جميع الارض. تثبّتت المسكونة ايضا لا تتزعزع.
30परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला. हे जग असे हलणार नाही.
31لتفرح السموات وتبتهج الارض ويقولوا في الامم الرب قد ملك.
31पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
32ليعج البحر وملؤه ولتبتهج البرية وكل ما فيها.
32समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो.
33حينئذ تترنم اشجار الوعر امام الرب لانه جاء ليدين الارض.
33अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल.
34احمدوا الرب لانه صالح لان الى الابد رحمته.
34लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंतन आहे.
35وقولوا خلّصنا يا اله خلاصنا واجمعنا وانقذنا من الامم لنحمد اسم قدسك ونتفاخر بتسبيحك.
35परमेश्वराला सांगा, “देवा, तूच आमचा त्राता आहेस. आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर. मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु. तुझा माहिमा गाऊ.”
36مبارك الرب اله اسرائيل من الازل والى الابد. فقال كل الشعب آمين وسبحوا الرب
36इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते. त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत. सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
37وترك هناك امام تابوت عهد الرب آساف واخوته ليخدموا امام التابوت دائما خدمة كل يوم بيومها
37आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांना करार कोशाच्या नित्य दैनंदिन सेवेसाठी दावीदाने नेमले.
38وعوبيد ادوم واخوتهم ثمانية وستين وعوبيد ادوم بن يديثون وحوسة بوابين.
38त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम आणि आणखी 68 लेवी यांना ठेवले. ओबेद-अदोम आणि होसा हे द्वाररक्षक होते. ओबेद - अदोम यदूथूनचा मुलगा.
39وصادوق الكاهن واخوته الكهنة امام مسكن الرب في المرتفعة التي في جبعون
39सादोक हा याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांना दावीदाने गिबोन येथील उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर नेमले.
40ليصعدوا محرقات للرب على مذبح المحرقة دائما صباحا ومساء وحسب كل ما هو مكتوب في شريعة الرب التي أمر بها اسرائيل.
40दररोज सकाळी आणि संध्याकाळी सादोक आणि इतर याजक होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर होमार्पणे करत असत. परमेश्वराने इस्राएलला जे नियमशास्त्र दिले होते त्यातील नियमांचे पालन करण्यासाठी ते असे करत होते.
41ومعهم هيمان ويدوثون وباقي المنتخبين الذين ذكرت اسماؤهم ليحمدوا الرب لان الى الابد رحمته.
41परमेश्वराची कृपा निरंतर राहावी म्हणून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यासाठी हेमान, यदूथून व इतर लेवी यांची नेमणूक केली.
42ومعهم هيمان ويدوثون بابواق وصنوج للمصوّتين وآلات غناء لله وبنو يدوثون بوابون.
42हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे व कर्णे फुंकणे हे काम होते. देवाची स्तुतिगीत गाईली जात असताना इतर वाद्ये वाजवण्याचेही काम त्यांच्याकडे होते. यदूथूनचे मुलगे द्वाररक्षक होते.
43ثم انطلق كل الشعب كل واحد الى بيته ورجع داود ليبارك بيته
43हा कार्यक्रम संपल्यावर सर्व लोक घरोघरी गेले. दावीदही आपल्या घराण्याला आशीर्वाद द्यायला घरी परतला.