الكتاب المقدس (Van Dyke)

Marathi

1 Chronicles

17

1وكان لما سكن داود في بيته قال داود لناثان النبي. هانذا ساكن في بيت من ارز وتابوت عهد الرب تحت شقق.
1दावीद आपल्या घरी राहायला गेल्यावर एकदा नाथान या संदेष्ट्यास म्हणाला, “मी गंधसरुच्या लाकडाच्या घरात राहत असलो तरी परमेश्वराचा करारकोश मात्र अजूनही एका तंबूतच आहे. देवासाठी मंदिर बांधावे असा माझा विचार आहे.”
2فقال ناثان لداود افعل كل ما في قلبك لان الله معك.
2तेव्हा नाथान म्हणाला, “तुझ्या मनात आहे ते कर, देवाची तुला साथ आहे.”
3وفي تلك الليلة كان كلام الله الى ناثان قائلا
3पण त्याच रात्री देवाचे वचन नाथानच्या स्वप्नात आले.
4اذهب وقل لداود عبدي هكذا قال الرب. انت لا تبني لي بيتا للسكنى.
4देव त्याला म्हणाला, “माझा सेवक दावीद याला सांग: ‘परमेश्वर म्हणतो दावीदा, मला घर बांधून देण्याचे काम तुझे नव्हे
5لاني لم اسكن في بيت منذ يوم اصعدت اسرائيل الى هذا اليوم بل سرت من خيمة الى خيمة ومن مسكن الى مسكن.
5[This verse may not be a part of this translation]
6في كل ما سرت مع جميع اسرائيل هل تكلمت بكلمة مع احد قضاة اسرائيل الذين امرتهم ان يرعوا شعبي اسرائيل قائلا لماذا لم تبنوا لي بيتا من ارز.
6[This verse may not be a part of this translation]
7والآن فهكذا تقول لعبدي داود. هكذا قال رب الجنود انا اخذتك من المربض من وراء الغنم لتكون رئيسا على شعبي اسرائيل.
7“शिवाय, माझा सेवक दावीद याला हे ही सांग की, सर्वशक्तिमान परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, ‘तू कुरणात मेंढपाळ होतास त्यातून मी तुला मुक्त केले हे तू माझ्या इस्राएल लोकांचा राजा व्हावेस म्हणून.
8وكنت معك حيثما توجهت وقرضت جميع اعدائك من امامك وعملت لك اسما كاسم العظماء الذين في الارض.
8तुला मी सर्वत्र साथ दिली. तुझ्या पुढे जाऊन तुझ्या शंत्रूंचे पारिपत्य केले. आता मी तुला थोर लोकांच्या रांगेत नेऊन बसवणार आहे.
9وعيّنت مكانا لشعبي اسرائيل وغرسته فسكن في مكانه ولا يضطرب بعد ولا يعود بنو الاثم يبلونه كما في الاول
9माझ्या इस्राएल लोकांना मी एक कायमची जागा देणार आहे. म्हणजे झाडांनी मुळे पसरावीत त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी पाय रोवून राहतील. त्यांना कसलाही त्रास होणार नाही. दुष्ट लोकांपासून त्यांना आता कुठलीही पीडा होणार नाही.
10ومنذ الايام التي فيها اقمت قضاة على شعبي اسرائيل. واذللت جميع اعدائك. واخبرك ان الرب يبني لك بيتا
10पूर्वी काही तापदायक गोष्टी घडल्या, पण मी माझ्या झस्राएल लोकांच्या रक्षणासाठी पुढारी नेमले होते. आता मी सर्व शत्रूंचा बीमोड करीन. “मी सांगतो की परमेश्वर तुझे घराणे चिरस्थायी करील.
11ويكون متى كملت ايامك لتذهب مع آبائك اني اقيم بعدك نسلك الذي يكون من بنيك واثبت مملكته.
11तुझ्या मृत्यूनंतर तू आपल्या पूर्वजांच्या रांगेत जाऊन बसलास की तुझ्या मुलालाच मी राजा करीन. तुझाच मुलगा राजा होईल. त्याचे राज्य मी बळकट करीन.
12هو يبني لي بيتا وانا اثبت كرسيه الى الابد.
12तुझ्या मुलगा माझ्यासाठी मंदिर बांधेल. त्याचे धराणे सर्वकाळ राज्य करील.
13انا اكون له ابا وهو يكون لي ابنا ولا انزع رحمتي عنه كما نزعتها عن الذي كان قبلك.
13मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझ्याआधी शौल राजा होता. पण मी त्याला दिलेला पाठिंबा काढून घेतला. तुझ्या मुलावरचे माझे प्रेम मात्र कधीच आटणार नाही.
14واقيمه في بيتي وملكوتي الى الابد ويكون كرسيه ثابتا الى الابد.
14माझे राज्य आणि निवासस्थान यांचा तोच उत्तराधिकारी राहील. त्याची सत्ता निरंतर चालेल.”‘
15فحسب جميع هذا الكلام وحسب كل هذه الرؤيا كذلك كلم ناثان داود
15देवाची ही सर्व वचने आणि साक्षात्कार याविषयी नाथानने दावीदाला सर्व काही सांगितले.
16فدخل الملك داود وجلس امام الرب وقال. من انا ايها الرب الاله وماذا بيتي حتى اوصلتني الى هنا.
16राजा दावीद नंतर पवित्र निवासमंडपात जाऊन परमेश्वरासमोर बसला, आणि म्हणाला, “परमेश्वरदेवा, मी आणि माझे घराणे यांच्यासाठी तू खूप केलेस. ते का हे मला अजिबात समजत नाही.
17وقلّ هذا في عينيك يا الله فتكلمت عن بيت عبدك الى زمان طويل ونظرت اليّ من العلاء كعادة الانسان ايها الرب الاله.
17शिवाय, माझ्या घराण्याचा भविष्यकाळही तू माझ्यापुढे उभा केला आहेस. महत्वाच्या व्यक्ति प्रमाणे तू मला लेखीत आहेस.
18فماذا يزيد داود بعد لك لاجل اكرام عبدك وانت قد عرفت عبدك.
18आणखी काय म्हणू? तू माझ्यासाठी खूप केलेस. मी आपला तुझा एक सेवक आहे, हे तू जाणतोसच.
19يا رب من اجل عبدك وحسب قلبك قد فعلت كل هذه العظائم لتظهر جميع العظائم
19परमेश्वरा तुझ्या मनोदयाखातर तू हा आश्चर्यकारक गोष्ट माझ्यासाठी घडवून आणलीस.
20يا رب ليس مثلك ولا اله غيرك حسب كل ما سمعناه بآذاننا.
20परमेश्वरा तुझ्यासारखा खरोखरच कोणी नाही. तुझ्याशिवाय कोणीच देव नाही. अशा अद्भूत गोष्टी दुसऱ्या कुठल्या दैवताने केल्याचे आमच्या ऐकिवात नाही.
21وايّة امة على الارض مثل شعبك اسرائيل الذي سار الله ليفتديه لنفسه شعبا لتجعل لك اسم عظائم ومخاوف بطردك امما من امام شعبك الذي افتديته من مصر.
21इस्राएलसारखे दुसरे कुठले राष्ट्र असेल का? जगाच्या पाठीवर फक्त इस्राएल साठीच तू या महान गोष्टी घडवून आणल्यास. आम्हाला मिसरमधून बाहेर काढून तू मुक्त केलेस. तुझ्या कीर्तीत तू भर घातलीस. आपल्या लोकांच्या अग्रभागी राहून तू इतरांना या भूमीतून हुसकून लावलेस.
22وقد جعلت شعبك اسرائيل لنفسك شعبا الى الابد وانت ايها الرب صرت لهم الها.
22इस्राएल लोकांना आपल्या छत्राखाली सर्वकाळासाठी घेऊन, परमेश्वरा तू त्यांचा देव झालास.
23والآن ايها الرب ليثبت الى الابد الكلام الذي تكلمت به عن عبدك وعن بيته وافعل كما نطقت.
23“परमेश्वरा, मला आणि माझ्या घराण्याला तू हे वचन दिले आहेस. ते सर्वकाल अबाधित राहो. तुझ्या म्हणण्याप्रमाणे होवो.
24وليثبت ويتعظم اسمك الى الابد فيقال رب الجنود اله اسرائيل هو الله لاسرائيل وليثبت بيت داود عبدك امامك.
24तुझ्यावरचा विश्वास सार्थ ठरो. तुझ्या नावाबद्दल लोकांना आदर राहो. म्हणजे मग लोक म्हणतील, ‘सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलचा देव आहे.’ मी तुझा सेवक आहे. माझा वंश वाढून तुझ्या सेवेत मग्न असो : हे माझे मागणे आहे.
25لانك يا الهي قد اعلنت لعبدك انك تبني له بيتا لذلك وجد عبدك ان يصلّي امامك.
25“देवा, तू आपल्या सेवकाशी हे बोललास. माझे घराणे हे राजघराणे ठरेल असे तू स्पष्ट केलेस. त्यामुळेच धीर येऊन मी हे मागणे मागत आहे.
26والآن ايها الرب انت هو الله وقد وعدت عبدك بهذا الخير.
26परमेश्वरा, तूच खरा देव आहेस आणि माझे भले व्हावे म्हणून तू स्वत: अभिवचन दिले आहे.
27والآن قد ارتضيت بان تبارك بيت عبدك ليكون الى الابد امامك لانك انت يا رب قد باركت وهو مبارك الى الابد
27परमेश्वरा माझ्या घराण्याला तू दयाळूपणे आशीर्वादित केलेस. तसेच माझे घराणे सर्वदा तुझी सेवा करेल असे तूच अभिवचन दिले आहे. तू स्वत: माझ्या घराण्याला आशीर्वाद दिला आहेस. त्यामुळे माझे घराणे सदोदित आशीर्वादीत होईल.”