1De woorden van Agur, den zoon van Jake; een last. De man spreekt tot Ithiel, tot Ithiel en Uchal.
1ही याकोहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकाल यांना निरोप आहे.
2Voorwaar, ik ben onvernuftiger dan iemand; en ik heb geen mensenverstand;
2मी पृथ्वीवरचा सगळ्यात वाईट माणूस आहे, मी जितके समजून घ्यायला हवे होते तितके मी समजू शकत नाही.
3En ik heb geen wijsheid geleerd, noch de wetenschap der heiligen gekend.
3मी शहाणा व्हायला शिकलो नाही, आणि मला देवाबद्दल काहीही माहीत नाही.
4Wie is ten hemel opgeklommen, en nedergedaald? Wie heeft den wind in Zijn vuisten verzameld? Wie heeft de wateren in een kleed gebonden? Wie heeft al de einden der aarde gesteld? Hoe is Zijn Naam, en hoe is de Naam Zijns Zoons, zo gij het weet?
4स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?
5Alle rede Gods is doorlouterd; Hij is een Schild dengenen, die op Hem betrouwen.
5देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते.
6Doe niet tot Zijn woorden, opdat Hij u niet bestraffe, en gij leugenachtig bevonden wordt.
6म्हणून देव ज्या गोष्टी सांगतो त्या बदलण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तो तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही खोटे बोलता हे सिध्द करेल.
7Twee dingen heb ik van U begeerd, onthoud ze mij niet, eer ik sterve:
7देवा मी मरण्यासाठी तुला दोन गोष्टी करायला सांगणार आहे.
8Ijdelheid en leugentaal doe verre van mij; armoede of rijkdom geef mij niet; voed mij met het brood mijns bescheiden deels;
8खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे.
9Opdat ik, zat zijnde, U dan niet verloochene, en zegge: Wie is de HEERE? of dat ik, verarmd zijnde, dan niet stele, en den Naam mijns Gods aantaste.
9माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल. पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन. त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन.
10Achterklap niet van den knecht bij zijn heer, opdat hij u niet vloeke, en gij schuldig wordt.
10सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.
11Daar is een geslacht, dat zijn vader vervloekt, en zijn moeder niet zegent;
11काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत.
12Een geslacht, dat rein in zijn ogen is, en van zijn drek niet gewassen is;
12काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात.
13Een geslacht, welks ogen hoog zijn, en welks oogleden verheven zijn;
13काही लोक स्वत:ला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते.
14Een geslacht, welks tanden zwaarden, en welks baktanden messen zijn, om de ellendigen van de aarde en de nooddruftigen van onder de mensen te verteren.
14असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.
15De bloedzuiger heeft twee dochters: Geef, geef! Deze drie dingen worden niet verzadigd; ja, vier zeggen niet: Het is genoeg!
15काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायाला आवडते. ते फक्त ‘मला दे,’ ‘मला दे’ एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्याना कधीही पुरेसे मिळत नाही.
16Het graf, de gesloten baarmoeder, de aarde, die van water niet verzadigd wordt, en het vuur zegt niet: Het is genoeg!
16मृत्यूची जागा, वांझ स्त्री, पाऊस हवा असलेली कोरडी जमीन आणि रुद्र भीषण, न विझवता येणारी आग.
17Het oog, dat den vader bespot, of de gehoorzaamheid der moeder veracht, dat zullen de raven der beek uitpikken, en des arends jongen zullen het eten.
17जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
18Deze drie dingen zijn voor mij te wonderlijk, ja, vier, die ik niet weet:
18तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
19De weg eens arends in den hemel; de weg ener slang op een rotssteen; de weg van een schip in het hart der zee; en de weg eens mans bij een maagd.
19आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष
20Alzo is de weg ener overspelige vrouw; zij eet en wist haar mond, en zegt: Ik heb geen ongerechtigheid gewrocht!
20जी स्त्री नवऱ्याशी एकनिष्ठ नसते ती तिने काहीही चूक केलेली नाही असे वागते. ती खाते, आंघोळ करते आणि तिने काहीही चूक केली नाही असे म्हणते.
21Om drie dingen ontroert zich de aarde, ja, om vier, die zij niet dragen kan:
21तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.
22Om een knecht, als hij regeert; en een dwaas, als hij van brood verzadigd is;
22राजा होणारा सेवक, मूर्ख माणूस ज्याच्याकडे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत.
23Om een hatelijke vrouw, als zij getrouwd wordt; en een dienstmaagd, als zij erfgenaam is van haar vrouw.
23प्रेम न मिळालेली तरीही नवरा मिळवणारी स्त्री आणि मालकिणीवर सत्ता गाजवणारी नोकर असलेली मुलगी
24Deze vier zijn van de kleinste der aarde; doch dezelve zijn wijs, met wijsheid wel voorzien.
24पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
25De mieren zijn een onsterk volk; evenwel bereiden zij in de zomer haar spijs.
25मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात पण तरी ही त्या उन्हाळाभर अन्न साठवतात.
26De konijnen zijn een machteloos volk; nochtans stellen zij hun huis in den rotssteen.
26ससा अगदी लहान प्राणी आहे. पण ते खडकात आपले घर करतात.
27De sprinkhanen hebben geen koning; nochtans gaan zij allen uit, zich verdelende in hopen.
27टोळांना राजा नसतो पण तरीही ते एकत्र काम करु शकतात.
28De spinnekop grijpt met de handen, en is in de paleizen der koningen.
28पाली हाताने पकडण्याइतक्या लहान असतात. पण तुम्ही त्यांना राजाच्या घरातदेखील पाहू शकता.
29Deze drie maken een goeden tred; ja, vier zijn er, die een goeden gang maken;
29तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार.
30De oude leeuw geweldig onder de gedierten, die voor niemand zal wederkeren;
30सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे. त्याला कशाचीही भीती वाटत नाही.
31Een windhond van goede lenden, of een bok; en een koning, die niet tegen te staan is.
31गर्वाने चालणारा कोंबडा, बकरी आणि त्याच्या लोकांमध्ये असलेला राजा.
32Zo gij dwaselijk gehandeld hebt, met u te verheffen, en zo gij kwaad bedacht hebt, de hand op den mond!
32जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा.
33Want de drukking der melk brengt boter voort, en de drukking van den neus brengt bloed voort, en de drukking des toorns brengt twist voort.
33जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.