Dutch Staten Vertaling

Marathi

Psalms

65

1Een psalm van David, een lied, voor den opperzangmeester.
1सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो. मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
2De lofzang is in stilheid tot U, o God! in Sion; en U zal de gelofte betaald worden.
2तू केलेल्या गोष्टींबद्दल आम्ही लोकांना सांगतो. आणि तू आमची प्रार्थना ऐकतोस. तू तुझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची प्रार्थना ऐकतोस.
3Gij hoort het gebed; tot U zal alle vlees komen.
3जेव्हा आमची पापे आम्हांला खूप जड होतात तेव्हा तू माफ करतोस आणि त्यांची भरपाई करतोस.
4Ongerechtige dingen hadden de overhand over mij; maar onze overtredingen, die verzoent Gij.
4देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.
5Welgelukzalig is hij, dien Gij verkiest, en doet naderen, dat hij wone in Uw voorhoven; wij zullen verzadigd worden met het goed van Uw huis, met het heilige van Uw paleis.
5देवा, आम्हाला वाचव. चांगले लोक तुझी प्रार्थना करतात आणि तू त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतोस. तू त्यांच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतोस. सर्व जगभरचे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात.
6Vreselijke dingen zult Gij ons in gerechtigheid antwoorden, o God onzes heils! o Vertrouwen aller einden der aarde, en der verre gelegenen aan de zee!
6देवाने त्याच्या शक्तीने पर्वत निर्माण केले. आपण त्याची शक्ती आपल्या भोवती सर्वत्र पाहतो.
7Die de bergen vastzet door Zijn kracht, omgord zijnde met macht.
7देवाने उन्मत्त झालेल्या खवळलेल्या समुद्राला शांत केले. देवाने पृथ्वीवर लोकांचे “महासागर” निर्माण केले.
8Die het bruisen der zeeen stilt, het bruisen harer golven, en het rumoer der volken.
8सर्व जगातील लोक तू केलेल्या विस्मयजनक गोष्टींनी आश्चर्यचकित झाले आहेत. सूर्योदय आणि सुर्यास्त आम्हाला खूप आनंदी बनवतात.
9En die op de einden wonen, vrezen voor Uw tekenen; Gij doet de uitgangen des morgens en des avonds juichen.
9तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.
10Gij bezoekt het land, en hebbende het begerig gemaakt, verrijkt Gij het grotelijks; de rivier Gods is vol waters; wanneer Gij het alzo bereid hebt, maakt Gij hunlieder koren gereed.
10तू नांगरलेल्या जमिनीवर पाऊस पाडतोस. तू शेतजमीन पाण्याने भिजवतोस. तू जमीन पावसाने भुसभुशीत करतोस. आणि तू त्यावर छोट्या रोपट्यांना उगवू देतोस.
11Gij maakt zijn omgeploegde aarde dronken; Gij doet ze dalen in zijn voren; Gij maakt het week door de druppelen; Gij zegent zijn uitspruitsel.
11तू नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या हंगामाने करतोस तू भरपूर पिकांनी गाड्या भरतोस.
12Gij kroont het jaar Uwer goedheid; en Uw voetstappen druipen van vettigheid.
12वाळवंट आणि डोंगर गवताने भरले आहेत.
13Zij bedruipen de weiden der woestijn; en de heuvelen zijn aangegord met verheuging. [ (Psalms 65:14) De velden zijn bekleed met kudden, en de dalen zijn bedekt met koren; zij juichen, ook zingen zij. ]
13आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत. दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.